फोटो – ट्विटर, आयसीसी

संपूर्ण स्पर्धेत एकही मॅच न हारणाऱ्या टीम इंडियानं (India U19 Team) फायनलमध्येही सातत्य कायम ठेवले. भारताने 24 वर्षांनी फायनलमध्ये आलेल्या इंग्लंडला 4 विकेट्सनं पराभूत करत अंडर 19 वर्ल्ड कप (Under 19 World Cup 2022) विजेतेपद पटकावले आहे. राज बावा (Raj Bawa) आणि रवी कुमार (Ravi Kumar) या फास्ट बॉलर्सनी 10 पैकी 9 विकेट्स घेतल्या. त्यानंतर भारतीय विकेट किपरनं परंपरा जपत सिक्स लगावून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. भारतीय टीमनं 2018 नंतर या स्पर्धेचं विजेतेपद (U19 WC 2022 Champion) मिळवले आहे.

दोन ओव्हर्समध्येच ठरली दिशा

फायनल मॅचमधील महत्त्वाचा टॉस इंग्लंडचा कॅप्टन टॉम प्रेस्टनं (Tom Prest) जिंकत बॅटींगचा निर्णय घेतला. आदल्या दिवशी रात्री झालेल्या पावसामुळे पिच बॉलिंगला मदत करत होते. डावखुरा फास्ट बॉलर रवी कुमारनं त्याचा फायदा घेतला. त्याने पहिल्याच ओव्हरमध्ये डावखुऱ्या जेकेब बेथेलला आऊट केले.

पहिल्या धक्क्यातून श्वास घेण्याची संधी रवीनं इंग्लंडला दिली नाही. त्यानं पुढच्याच ओव्हरमध्ये या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडकडून सर्वात जास्त रन करणाऱ्या कॅप्टन प्रेस्टला आऊट केले. रवीने त्याला शून्यावरच परत पाठवले. पहिल्या दोन ओव्हर्समध्ये रवीनं इंग्लंडला दोन मोठे धक्के देत फायनल मॅचची दिशा स्पष्ट केली. त्यानंतर प्रत्येक टप्प्यात टीम इंडिया इंग्लंडपेक्षा आघाडीवर (U19 WC 2022 Champion) होती.

मिडल ऑर्डरची पडझड

भारतीय बॉलर्सनी इंग्लंडच्या मिडल ऑर्डरला सेटल होऊ दिले नाही. सेमी फायनलमध्ये हाफ सेंच्युरी झळकावणारा इंग्लंडचा ओपनर जॉर्ज थॉमसनं राजवर्धन हंगरगेकरच्या एकाच ओव्हरमध्ये 16 रन काढत प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याला राज बावानं पहिल्याच ओव्हरमध्ये आऊट केले. त्याच्या पुढच्याच ओव्हरमध्ये त्याने आणखी दोन विकेट घेतल्या.

रेहान अहमदनं प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण त्यालाही राजनं आऊट करत इंग्लंडची अवस्था 17 व्या ओव्हरमध्येच 6 आऊट 61 अशी केली. त्यावेळी इंग्लंड 100 रनचा टप्पा गाठणार का? हा प्रश्न होता.

टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजेतेपदामध्ये इंग्लंडच्या 4 क्रिकेटपटूंचा अडथळा

इंग्लंडचा प्रतिकार

इंग्लंडच्या मिडल ऑर्डरमधील बॅटर जेम्स रियू (James Rew) याने एक बाजू लावून धरली होती. त्याने इंग्लंडला संकटातून बाहेर काढले. नवव्या क्रमांकावर आलेल्या जेम्स सेल्सनं (James Sales) त्याला खंबीर साथ दिली. या दोघांनी आठव्या विकेटसाठी 93 रनची पार्टनरशिप केली. दोन जेम्सच्या या पार्टनरशिपमध्ये रियू अधिक आक्रमक होता. त्याने भारताचा या स्पर्धेतील सर्वात यशस्वी स्पिनर विकी ओस्तवालच्या बॉलिंगवर 5.16 च्या इकोनॉमी रेटनं रन काढले.

रियूची सेंच्युरी फक्त 5 रननं हुकली. रवी कुमारच्या बॉलिंगवर कौशल तांबेनं त्याचा सुंदर कॅच पकडला. रियू आऊट होताच भारतीय बॉलर्सनी कमबॅक केले. उर्वरित दोन विकेट्स त्यांनी झटपट उडवल्या. राज बावा सर्वात यशस्वी बॉलर ठरला. त्याने 31 रन देत 5 विकेट्स घेतल्या. अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये 5 विकेट्स घेणारा राज हा पहिलाच बॉलर (U19 WC 2022 Champion) आहे. त्याला रवी कुमारने 4 विकेट्स देत भक्कम साथ दिला. कौशल तांबेला 1 विकेट मिळाली.

खराब सुरूवातीनंतर, सावरले

संपूर्ण स्पर्धेत इंग्लंडला चांगली सुरूवात करून देणाऱ्या जोश बोयडेननं अंगक्रिश रघुवंशीला शून्यावर आऊट केले. हरनूर सिंग आणि शेख रशिद (Shaik Rasheed) यांनी कोणतीही घाई न करता सुरूवातीच्या ओव्हर्स खेळून काढल्या. इंग्लंडच्या बॉलर्सनी देखील अचूक मारा करत त्यांना जखडून ठेवले होते. हरनूर 21 रनवर आऊट झाल्यानंतर ही जोडी फुटली.

हरनूर आऊट झाल्यानंतर कॅप्टन यश ढूल (Yash Dhull) मैदानात उतरला. यश-रशिद जोडीनं सेमी फायनलमध्ये 204 रनची पार्टनरशिप केली होती. या जोडीनं टीम इंडिया मॅचमध्ये पुढे राहिल याची काळजी घेतली. रशिदनं सेमी फायनलनंतर फायनलमध्येही हाफ सेंच्युरी (U19 WC 2022 Champion) झळकावली. त्यानंतर लगेच तो आऊट झाला. त्यापाठोपाठ यश देखील आऊट झाला. जेम्स सेल्सनं या दोघांनाही आऊट करत मॅचमध्ये रंगत निर्माण केली.

IPL 2022 Mega Auction: पालघर ते तुळजापूर महाराष्ट्रातील 5 खेळाडूंना लिलावात मिळणार मोठा भाव!

शिक्कामोर्तब

भारताची 28 व्या ओव्हरमध्ये अवस्था 4 आऊट 97 अशी होती. त्यावेळी एखादी चूक देखील मॅचचं चित्र बदलण्यास पुरेशी ठरली असती. निशांत सिंधू आणि पाच विकेट घेणाऱ्या राज बावानं तसं होऊ दिलं नाही. या दोघांनी विकेट वाचवण्याबरोबरच इंग्लंडच्या बॉलर्सवर प्रतिहल्ला केला. राजनं 2 तर निशांतनं 1 सिक्स लगावत रन रेट वाढणार नाही याची काळजी घेतली.

राज 35 रनवर आऊट झाला. तर कौशल तांबे देखील झटपट परतला. निशांतनं त्याची हाफ सेंच्युरी 54 बॉलमध्येच पूर्ण केली. त्यानंतर विकेट किपर दिनेश बानानं जास्त वेळ वाया न घालवता दोन सिक्स लगावत भारताच्या पाचव्या विजेतेपदावर (U19 WC 2022 Champion) शिक्कामोर्तब केले.

5 विकेट्स आणि 35 रन अशी ऑल राऊंड कामगिरी करत इंग्लंडच्या टीमवर राज करणाऱ्या राज बावाला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कार जाहीर झाला. तर, संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक 506 रन करणारा दक्षिण आफ्रिकेचा डेवाल्ड ब्रेविस (Dewald Brevis) ‘प्लेयर ऑफ द सीरिज’ ठरला. मोहम्मद कैफ, विराट कोहली, उन्मुक्त चंद आणि पृथ्वी शॉ या वर्ल्ड कप विजेत्या कॅप्टनच्या यादीत (U19 WC 2022 Champion) आता यश ढूलनं देखील एन्ट्री केली आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: