फोटो – ट्विटर, आयसीसी

वेस्ट इंडिजमध्ये 14 जानेवारीपासून अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धा (Under 19 World Cup 2022) सुरू होत आहे. 1998 पासून दर दोन वर्षांनी ही वर्ल्ड कप स्पर्धा होत असते. टीम इंडियाने 2000 साली सर्वप्रथम हा वर्ल्ड कप जिंकला होता. भारतीय क्रिकेट  टीम या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी टीम असून त्यांनी आजवर 4 वेळा वर्ल्ड कप जिंकला आहे. टीम इंडियाचे वर्ल्ड कप विजेते कॅप्टन (India U19 Captain) सध्या काय करतात ते पाहूया

मोहम्मद कैफ (U19 World Cup 2000)

मोहम्मद कैफच्या (Mohammad Kaif) कॅप्टनसीमध्ये टीम इंडियाने 2000 साली सर्वप्रथम हा वर्ल्ड कप जिंकला. श्रीलंकेत झालेल्या या स्पर्धेची फायनल टीम इंडियानं श्रीलंकेचा 6 विकेट्सनं पराभव केला. संपूर्ण स्पर्धेत टीमनं एकही मॅच गमावली नाही. याच वर्ल्ड कपमधून युवराज सिंह (Yuvraj Singh) हा सुपरस्टार उदयाला आला.

मोहम्मद कैफ 2002 ते 2006 या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. त्याची टेस्ट कारकिर्द फार बहरली नाही. वन-डेमध्ये लोअर ऑर्डर बॅटर आणि चपळ फिल्डर म्हणून त्याने चांगली छाप पाडली होती. कैफने 125 वन-डेमध्ये 32.01 च्या सरासरीने 2753 रन केले. यामध्ये 2 सेंच्युरी आणि 17 हाफ सेंच्युरींचा समावेश आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये कैफच्या नावावर 10 हजारांपेक्षा जास्त रन आहेत.

लॉर्ड्सवर 2002 साली झालेल्या नेटवेस्ट ट्रॉफी फायनलसाठी कैफ नेहमी लक्षात राहणार आहे. कैफनं त्या फायनलमध्ये युवराज सिंहसोबत अविस्मरणीय पार्टनरशिप केली. नाबाद 87 रन करत विजयावर शिक्कामोर्तब करूनच तो पॅव्हिलियनमध्ये परतला. टीम इंडियाचा कॅप्टन सौरव गांगुलीने त्यावेळी लॉर्ड्सच्या बाल्कनीमध्ये शर्ट काढून सेलिब्रेशन केले होते. कैफ आता निवृत्त झाला असून तो सध्या दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) टीमचा असिस्टंट कोच आहे. तसेच कॉमेंट्रीमध्ये देखील सक्रीय (India U19 Captain) आहे.

विराट कोहली (U19 World Cup 2008)

विराट कोहली (Virat Kohli) टीम इंडियाच नाही तर क्रिकेट विश्वाला अंडर 19 वर्ल्ड कपच्या माध्यमातून मिळालेला सर्वोत्तम बॅटर आहे.  मलेशियात 2008  झालेल्या वर्ल्ड कपमध्ये तो टीम इंडियाचा कॅप्टन होता. त्या वर्ल्ड कपच्या फायनलमधील लो स्कोअरिंग मॅचमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडचा पराभव केला होता.

विराट कोहली त्यानंतर लवकरच टीम इंडियात आला आणि पाहता-पाहता सुपरस्टार बनला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 70 सेंच्युरी झळकावणारा विराट भारतीय टीमचा सर्वात यशस्वी कॅप्टन आहे. विराट (India U19 Captain) आता वन-डे आणि T20 टीमचा कॅप्टन नसला तरी टेस्ट टीमचे नेतृत्त्व त्याच्याकडेच आहे.

159 रन करुनही विराट कोहलीच्या टीमनं जिंकला होता वर्ल्ड कप

उन्मुक्त चंद (U19 World Cup 2012)

टीम इंडियाने उन्मुक्त चंदच्या (Unmukt Chand) कॅप्टनसीखाली 2012 साली तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकला. त्या वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम इंडियाने यजमान ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्सनं पराभव केला. उन्मुक्तनं नाबाद 111 रनची खेळी करत टीम इंडियाच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले होते.

उन्मुक्त पुढे दुर्दैवी ठरला. टीम इंडियात निवड न झालेला तो एकमेव अंडर 19 वर्ल्ड कप विजेता कॅप्टन आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील सुरूवातीच्या यशानंतर त्याची बॅट बराच काळ शांत होती. आयपीएल स्पर्धेतही त्याच्याकडे दुर्लक्ष झाले. वयाच्या 28 व्या वर्षी त्याने भारतीय क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला. आता उन्मुक्त अमेरिकन क्रिकेटमध्ये नशीब (India U19 Captain) आजमावत आहे.

पृथ्वी शॉ (U19 World Cup 2018)

पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) हा अंडर 19 वर्ल्ड कप जिंकणारा पहिला मुंबईकर कॅप्टन आहे. न्यूझीलंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमधील फायनलमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्सने आरामात पराभव केला. पृथ्वीने संपूर्ण स्पर्धेत 65.25 च्या सरासरीने 261 रन केले.

मुंबई आणि भारतीय क्रिकेटमधील भविष्यातील स्टार म्हणून पृथ्वीकडे पाहिले जाते. टेस्ट क्रिकेटमधील पदार्पणात वेस्ट इंडिज विरुद्ध त्याने दमदार सेंच्युरी झळकावली. त्यानंतर त्याच्या कारकिर्दीला काही काळ डोपिंगचे ग्रहण लागले. 8 महिन्यांच्या बंदीनंतर पृथ्वी परतला. त्याला दिल्ली कॅपिटल्सनं आगामी सिझनसाठी रिटेन केले आहे. टीम इंडियामध्ये जागा मिळवण्यासाठी त्याचा संघर्ष (India U19 Captain) सुरू आहे.

5 दिवसांमध्ये बदललं पृथ्वी शॉ चं आयुष्य, तुम्हीही वाचा एका बदलाची गोष्ट!

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: