फोटो – मिड डे

वेस्ट इंडिजमध्ये अंडर 19 वर्ल्ड कपला (U19 World Cup 2022) सुरूवात झाली आहे. टीम इंडियाची पहिली मॅच शनिवारी (15 जानेवारी) दक्षिण आफ्रिकेशी (India vs South Africa) आहे. टीम इंडिया या वर्ल्ड कपमध्ये ग्रुप B मध्ये आहे. भारतीय टीम विजेतेपदाची प्रबळ दावेदार आहे. टीम इंडियाला हा वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर तुळजापूरच्या राजवर्धन हंगरगेकरला (Rajvardhan Hangargekar) मोठी जबाबदारी पार पाडावी लागेल.

दुर्मिळ प्रकारातील खेळाडू

प्रती तास 140 किलोमीटर पेक्षा जास्त वेग आणि लोअर ऑर्डरमध्ये आक्रमक बॅटींग या भारतीय खेळाडूंमधील दुर्मिळ प्रकारच्या तुळजापूरच्या राजवर्धन हंगरगेकरचा समावेश होता. राजवर्धन सुरुवातील ऑफ स्पिनर होता. अंडर 14 स्पर्धेत खेळताना त्याच्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या टीमला फास्ट बॉलरची गरज होती. त्यामुळे तो फास्ट बॉलर बनला.

राजवर्धन सुरूवातीला प्रचंड वेगाने बॉलिंग करत असे. त्या वेगाला योग्य दिशा देण्याचे काम त्याच्या पुण्यातील अकादमीचे प्रशिक्षक मोहन जाधव आणि फिटनेस ट्रेनर तेजस मातापूरकर यांनी केले. त्यांनी त्याच्या रन अपवर देखील काम केले आणि त्याचा खेळ सुधारला.

राजवर्धनने विनू मंकड ट्रॉफी आणि चॅलेंजर ट्रॉफी स्पर्धेतील 11 मॅचमध्ये 23 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर 236 च्या स्ट्राईक रेटने 11 सिक्सच्या मदतीने 135 हून जास्त रन काढले. बहुतेक वेळेस आठव्या क्रमांकावर खेळायला येणाऱ्या कोणत्याही खेळाडूसाठी हे रन नक्कीच कमी नाहीत. या कामगिरीमुळेच त्याची (Rajvardhan Hangargekar) वर्ल्ड कप टीममध्ये निवड झाली.

U19 World Cup: 4 भारतीय बॅटर जे होतील उद्याचे रोहित आणि विराट

हा प्रवास सोपा नव्हता…

राजवर्धनसाठी हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. मागच्या वर्षी कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत त्याने वडिलांना गमावले. अगदी कोवळ्या वयात त्याच्यावर मोठा आघात झाला. त्याने काही काळ क्रिकेट खेळणे थांबवले होते. पण, त्याच्या कोचनी राजवर्धनला पुन्हा तयार केले. त्याने क्रिकेटपटू होण्याची वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी राजवर्धनने (Rajvardhan Hangargekar) पुन्हा एकदा खेळण्यास सुरूवात केली.

स्वत: पिच तयार केले…

राजवर्धनने तुळजापूरमध्येच क्रिकेटची प्रॅक्टीस सुरू केली. तिथे त्याला खेळण्यासाठी योग्य पिच नव्हते. तर राजवर्धनने स्वत: पिच तयार करण्यासाठी मातीत घाम गाळला. स्वत: रोलर फिरवून पिच तयार केले. राजवर्धन हा एक उत्तम स्प्रिंटर आहे, त्याचबरोबर त्याच्या बॉलिंगमधील वैविध्य प्रतिस्पर्धी टीमला अडचणीत आणते. त्यामुळेच त्याची महाराष्ट्राच्या T20 आणि लिस्ट A टीममध्ये त्याची निवड झाली आहे.

वर्ल्ड कपमध्ये जबाबदारी

राजवर्धनने आशिया कप अंडर 19  स्पर्धेत पाकिस्तान विरुद्धच्या लढतीत आक्रमक बॅटींग करत सर्वांचे लक्ष वेधले होते. त्याने 10 व्या क्रमांकावर बॅटींगला येत फक्त 20 बॉलमध्ये 33 रन काढले होते. त्याच्या फटकेबाजीमुळेच टीम इंडियाने 225 चा टप्पा ओलांडला होता.

आशिया कप स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या राजवर्धनवर वर्ल्ड कप स्पर्धेतही मोठी अपेक्षा आहे. चांगला क्रिकेटपटू होण्याचं वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो देखील (Rajvardhan Hangargekar) या स्पर्धेत सर्वस्व पणाला लावणार आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: