फोटो – ट्विटर

वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेला अंडर 19 वर्ल्ड कप (Under 19 World Cup 2022) आता अंतिम टप्प्यात आला आहे. अफगाणिस्तान विरूद्ध इंग्लंड (Afghanistan vs England) आणि भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) या टीममध्ये आता सेमी फायनल होणार आहे. त्याचबरोबर पहिल्या फेरीत बाद झालेल्या टीममध्येही मॅच सुरू आहेत. अशाच एका मॅचमधील घटनेनं क्रिकेट विश्वातील Spirit of Cricket चा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यावेळी टीम इंडियाचा माजी ऑल राऊंडर युवराज सिंह आणि दक्षिण आफ्रिकेचा स्पिनर तरबेज शम्सी (Yuvraj vs Shamsi) आमने-सामने आहेत.

नेमके काय घडले?

युगांडा विरूद्ध पापूआ न्यू गिनी (Uganda U19 vs Papua New Guinea U19, 13th Place Playoff Semi-Final1) यांच्यातील मॅचमध्ये झालेल्या एका रन-आऊट नंतर हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. PNG टीमची बॅटींग सुरू असताना 16 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. यावेळी युगांडाचा स्पिनर जोसेफ बगूमा याने नॉन स्ट्रायकरवरील जॉन कोरीकोला रन आऊट (Run out, Mankading) केले.

आयसीसीने या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये बगूमानं बॉल टाकण्याच्यापूर्वीच कोरीको क्रिझ सोडून पुढे गेला होता. त्यावेळी बगूमानं प्रसांगवधान राखत कोरिकोला रन आऊट केले.  

रिकी पॉन्टिंगच्या Spirit of Cricket ला कमिन्सचा ठेंगा, इंग्लिश बॉलरची रोखली hat-trick

युवराज वि. शम्सी

आयसीसीने हा व्हिडीओ शेअर करताच त्यावर पुन्हा एकदा खेळभावनेशी संबंधित (Spirit of Cricket) चर्चा सुरू झाली. ‘हे एकदम चुकीचे आहे’ अशी प्रतिक्रिया युवराजने दिली. तर शम्सीनं बॉलरच्या बाजूने मत दिले आहे.

एखादा बॅटर बॉल टाकण्यापूर्वी क्रिझच्या बाहेर जातो तर त्याला बॉलरनं आऊट केलं तर त्यामध्ये काहीही चूक नाही. बॉलरनं चुकून लाईन ओलांडली तर तो ‘नो बॉल’ जाहीर करत त्याला शिक्षा दिली जाते. पुढच्या बॉलवर फ्री हिट दिली जाते. तर बॅटर्सनीही क्रिझच्या आत उभं राहिलं पाहिजे.’ अशी प्रतिक्रिया शम्सीनं (Yuvraj vs Shamsi) दिली आहे.

नियम काय सांगतो?

‘क्रिकेटमधील नियम क्रमांक 41.16 नुसार बॉलरने बॉल टाकल्याशिवाय नॉन स्ट्रायकर एन्डचा बॅट्समन क्रिज सोडू शकत नाही. जर बॅट्समननं क्रिज सोडलं आणि बॉलरनं स्टंप उडवले तर त्या बॅट्सनमनला रन आऊट घोषित केलं जातं.’ युगांडाच्या बॉलरनंही याच नियमाच्या आधारावर रन आऊट केले. त्यानंतर नेहमी प्रमाणे चर्चा (Yuvraj vs Shamsi) सुरू झाली.

काहीही झालं तरी ‘Spirit of Cricket’ जपलं पाहिजे!

मॅचचा निकाल काय लागला?

युगांडानं या मॅचमध्ये PNG चा 35 रननं पराभव केला. युगांडानं पहिल्यांदा बॅटींग करत 123 रन केले होते. PNG ला 50 ओव्हर्समध्ये 124 रनचे आव्हान देखील पेलवले नाही. त्यांची संपूर्ण टीम 19.3 ओव्हर्समध्ये 88 रनवर ऑल आऊट झाली.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading