फोटो – ट्विटर, बीसीसीआय

अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये (Under 19 World Cup 2022) टीम इंडियाने विजयी सुरूवात केली आहे. ग्रुप B मधील पहिल्या मॅचमध्ये भारतीय टीमनं दक्षिण आफ्रिकेचा (India U19 vs South Africa U19) 45 रनने पराभव केला. कॅप्टन यश ढूलचे 82 रन (Yash Dhul) आणि पुणेकर विकी ओस्तवालच्या 5 विकेट्स (Vicky Ostwal 5 Wickets) हे या विजयाचे मुख्य वैशिष्ट्य ठरले.

कॅप्टन यश चमकला

वेस्ट इंडिजमधील गयानामध्ये झालेल्या या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियाची सुरूवात खराब झाली. हरनूर सिंग (1) आणि अंगक्रिश रघुवंशी (5) हे ओपनर झटपट परतले. त्यानंतर कॅप्टन यश ढूल (Yash Dhull) आणि व्हाईस कॅप्टन एसके रशिद (Shaik Rasheed) यांनी टीम इंडियाला सावरले. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 71 रनची पार्टनरशिप केली.

रशिद 31 रन काढून आऊट झाला. त्यानंतर निशांत सिंधूने 25 बॉलमध्ये 27 रनची झटपट इनिंग खेळली. दुसऱ्या बाजूने विकेट पडत असताना कॅप्टन यश मात्र एका बाजूने उभा होता. त्याने कॅप्टन म्हणून वर्ल्ड कपमधील पहिल्याच मॅचमध्ये हाफ सेंच्युरी झळकावली. यशने 100 बॉलमध्ये 11 फोरसह 82 रन काढले.

यशला पुण्याच्या कौशल तांबेने (Kaushal Tambe) 35 रन काढत साथ दिली. या दोघांच्या प्रयत्नामुळे टीम इंडियाने पहिल्या इनिंगमध्ये 232 पर्यंत मजल मारली.

U19 World Cup: 4 भारतीय बॅटर जे होतील उद्याचे रोहित आणि विराट

विकीची कमाल

238 रनचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची स्थिती एकवेळेस 3 आऊट 138 अशी भक्कम होती. त्यावेळी पुणेकर लेफ्ट आर्म स्पिनर विकी ओस्तवालने (Vicky Ostwal 5 Wickets) त्याची कमाल दाखवली. विकीने आफ्रिकेच्या बॅटींगला खिंडार पाडले. त्याने 10 ओव्हर्समध्ये अवघ्या 2.80 च्या इकोनॉमी रेटने 5 विकेट्स घेत आफ्रिकेच्या पराभवात निर्णायक भूमिका बजावली. अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात एका मॅचमध्ये 5 विकेट घेणारा विकी हा सातवा भारतीय आहे.

विकीला राज बावाने (Raj Bawa) चांगली साथ दिली. त्याने 47 रन देत 4 विकेट्स घेतल्या. तर राजवर्धन हंगरगेकर (Rajvardhan Hangargekar) याने 1 विकेट घेतली. दक्षिण आफ्रिकेची इनिंग 45.4 ओव्हर्समध्ये 187 रनवर संपुष्टात आली.

कोरोनामुळे वडील गेले, पण जिद्द नाही… तुळजापूरच्या पोरावर जग जिंकण्याची जबाबदारी

कोण आहे विकी ओस्तवाल?

पुण्यात जन्मलेल्या विकीने 2018 साली झालेल्या 16 वर्षांखालील मुलांच्या विजय हजारे स्पर्धेत चमकदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले होते. त्या स्पर्धेतील प्रि क्वार्टर फायनलमध्ये विकीने 5 विकेट्स घेत ‘मॅन ऑफ द मॅच’चा पुरस्कार पटकावला होता. विकीने त्यानंतरही वेगवेगळ्या स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करत भारतीय टीममध्ये जागा पटकावली.

अंडर 19 वर्ल्ड कपपूर्वी यूएईमध्ये झालेल्या अंडर 19 आशिया कप स्पर्धेच्या फायनलमध्येही विकीने चमकदार कामगिरी केली. श्रीलंकेविरुद्ध झालेल्या त्या फायनलमध्ये विकीने 8 ओव्हरमध्ये अवघ्या 1.37 च्या इकोनोमी रेटनं 11 रन देत 3 विकेट्स घेतल्या. या कामगिरीबद्दल फायनलमध्येही तो ‘मॅन ऑफ द मॅच’चा मानकरी ठरला. विकीने आशिया कप स्पर्धेत फक्त 2.50 च्या इकोनॉमी रेटनं 6 विकेट्स घेतल्या होत्या. आता वर्ल्ड कपमध्ये त्याच्यावर (Vicky Ostwal 5 Wickets) टीम इंडियाची मोठी भिस्त आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: