फोटो – ट्विटर

इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलनं (ICC) 2022 मध्ये न्यूझीलंडमध्ये (New Zealand) होणाऱ्या महिला क्रिकेट वर्ल्ड कपचं (ICC Women Cricket World Cup) वेळापत्रक जाहीर केलं आहे. 4 मार्च ते 3 एप्रिल 2022 या दरम्यान ही वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे.

भारतीय टीमचं वेळापत्रक

भारतीय टीम (Team India Women) या वर्ल्ड कपच्या साखळी मॅचमध्ये एकूण सात मॅच खेळणार आहे. यामध्ये यजमान न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या चार बड्या टीमचा भारतीय टीमचा सामना होणार आहे. तर, अन्य तीन लढती या पात्रता फेरीतून स्पर्धेत येणाऱ्या टीमसोबत होतील.

( वाचा : बिग बॅश लीगचं संपूर्ण वेळापत्रक, वाचा कोणत्या शहरांत होणार कधी मॅच…)

भारताची पहिली मॅच 6 मार्च रोजी क्वालिफायर टीमशी होणार आहे. त्यानंतर 10 मार्च रोजी यजमान न्यूझीलंडशी दुसरी लढत होईल. 12 मार्चला पुन्हा क्वालिफायर टीमशी लढत आहे. त्यानंतर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाशी अनुक्रमे 16 मार्च आणि 19 मार्चला भारतीय टीम भिडणार आहे. 22 मार्चला पुन्हा क्वालिफायर टीमशी गाठ असेल. तर भारताची साखळी फेरीततली शेवटची मॅच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 27 मार्चला होणार आहे.

ही स्पर्धा मूळ वेळापत्रकानुसार फेब्रुवारी-मार्च 2021 मध्ये होणार होती. मात्र, ती स्थगित झाली. त्यानंतर यासाठी निश्चित करण्यात आलेल्या न्यूझीलंडमधील सहा शहरांमध्येच 2022 साली ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत एकूण 31 मॅचेस होणार आहेत. यापैकी पहिली मॅच वेलिंग्टनमध्ये तर फायनल ख्राईस्टचर्चमध्ये होणार आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading