फोटो – ट्विटर, क्रिकेट वर्ल्ड कप

न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला वर्ल्ड कपमधून (Women’s World Cup 2022) टीम इंडियाचं आव्हान संपुष्टात आले आहे. दक्षिण आफ्रिका विरूद्ध झालेल्या ‘करो वा मरो’ (India Women vs South Africa Women) मॅचमध्ये भारतीय टीमचा 3 विकेट्सनं पराभव झाला. शेवटच्या ओव्हरमध्ये दीप्ती शर्मानं केलेल्या मोठ्या चुकीची किंमत (Deepti Sharma no ball)  टीमला मोजावी लागली.

एका चुकीची मोठी किंमत

दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच जिंकण्यासाठी 7 रनची गरज होती. त्यावेळी कॅप्टन मिताली राजनं (Mithali Raj) दीप्ती शर्माच्या हातामध्ये बॉल दिला. दीप्तीनं पहिल्या बॉलवर एक रन दिला. दुसऱ्या बॉलवर दक्षिण आफ्रिकन खेळाडूनं दोन रन काढण्याचे प्रयत्न केले. त्यावेळी हरमनप्रीत कौरनं (Harmanpreet Kaur) जबरदस्त थ्रो करत त्रिषा चेट्टीला रन आऊट केले. त्यानंतरच्या दोन बॉलवर एक-एक रन निघाला.

दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी शेवटच्या 2 बॉलमध्ये 3 रन आवश्यक होते. त्यावेळी दीप्तीच्या बॉलिंगवर राही डू प्रिझनं हरमनकडं कॅच दिला.संपूर्ण देशात त्यावेळी आनंदाचं वातावरण होतं. पण, एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. दीप्तीनं नो बॉल टाकला असल्याचा निर्णय थर्ड अंपायरनं दिला. दीप्तीच्या या चुकीमुळे (Deepti Sharma no ball)  भारतीय महिला टीमचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न पुन्हा एकदा भंग पावलं. मागील वर्ल्ड कपमध्ये फायनलपर्यंत गेलेल्या भारतीय टीमला यंदा सेमी फायनल देखील गाठता आली नाही.

शेवटच्या ओव्हर्समध्ये निराशा

टीम इंडियाच्या पराभवात दीप्ती शर्मानं टाकलेला ‘नो बॉल’ ही उंटावरची शेवटची काडी ठरला. यापूर्वीही टीमनं काही चूका केल्या. भारताने पहिल्या 40 ओव्हर्समध्ये 3 आऊट 223 रन केले होते. त्यावेळी टीम इंडिया 300 रनपर्यंत पोहचेल असाच अंदाज होता. पण शेवटच्या 10 ओव्हर्समध्ये आपल्या 4 विकेट्स गेल्या. तसंच 60 बॉलमध्ये फक्त 51 रन निघाले. त्यामुळे टीम इंडियाला 280 रनही करता आले नाहीत. दक्षिण आफ्रिकेला मॅचमध्ये कमबॅक करण्याची संधी यामुळे मिळाली.

राजेश्वरी गायकवाडच्या बॉलिंगवर स्मृती मंधानानं एक कॅच सोडला. दक्षिण आफ्रिकेनं सतत धावफलक हलता ठेवला. त्यांनी भारतीय फिल्डर्सवर कायम दबाव टाकला. या दबावातही काही मिस फिल्ड झाले. त्याचाही फटका या अटीतटीच्या लढतीत टीम इंडियाला (Deepti Sharma no ball) बसला.

Women Cricketers Periods Issue जेमिमा रॉड्रीग्सनं सांगितला पीरियड्समध्ये खेळण्याचा अनुभव, VIDEO

सेमी फायनलच्या टीम ठरल्या

टीम इंडियाच्या पराभवाचा थेट फायदा वेस्ट इंडिजला झाला. वेस्ट इंडिज या वर्ल्ड कपमधील सेमी फायनलमध्ये जाणारी चौथी टीम ठरली. आता पहिली सेमी फायनल ऑस्ट्रेलिया विरूद्ध वेस्ट इंडिज तर दुसरी सेमी फायनल दक्षिण आफ्रिका विरूद्ध इंग्लंड यांच्यात होणार आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: