फोटो – ट्विटर, आयसीसी

महिला क्रिकेटमध्ये (Women’s Cricket) गेल्या 5 वर्षांपासून सुरू असलेलं वर्चस्व ऑस्ट्रेलियानं आणखी उंचीवर नेले. ऑस्ट्रेलियानं वर्ल्ड कप फायनलमध्ये (Women’s World Cup Final) इंग्लंडचा 71 रननं पराभव करत सातव्यांदा विजेतेपद पटकावले. ऑस्ट्रेलियन टीमनं संपूर्ण स्पर्धेत एकही मॅच गमावली नाही. फायनलमध्येही त्यांनी वर्चस्व गाजवलं. दुसरिकडं इंग्लंडनं पहिल्या 3 मॅच गमावून मोठ्या जिद्दीनं कमबॅक करत फायनल गाठली होती. इंग्लिश टीमनं फायनलध्ये केलेल्या 3 चुकांमुळे 2017 नंतर पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्ण (3 Mistakes of England Women) ठरले.

पहिली चूक

इंग्लंडच्या टीमनं पहिली चूक मॅच सुरू होण्यापूर्वी केली. ती चूक समजल्यावर अनेकांना 2003 साली झालेल्या वर्ल्ड कप फायनलमध्ये (Cricket World Cup 2003) टीम इंडियानं केलेली चूक आठवेल. या मॅचमध्ये इंग्लंडची कॅप्टन हेदर नाईटनं (Heather Knight) टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग घेतली.

2003 फायनलमध्ये सौरव गांगुलीनंही असाच प्रकार केला होता. गांगुलीप्रमाणेच हेदरचा निर्णय टीमच्या अंगाशी (3 Mistakes of England Women) आला. बॅटींगला अनुकूल पिचवर मोठा स्कोर करत प्रतिस्पर्धी टीमवर त्या स्कोरचा आणि फायनलचा असा एकत्र दबाव टाकण्याची संधी गांगुलीनं 2003 साली गमावली होती. तसाच प्रकार इंग्लिश महिला टीमनं 19 वर्षांनी केला. योगायोगाची गोष्ट म्हणजे या दोन्ही वेळेस फायदा होणारी टीम ही ऑस्ट्रेलियन होती.

दुसरी चूक

एलिसा हिली (Alyssa Healy) आणि रचेल हेन्स (Rachael Haynes) या जोडीनं ऑस्ट्रेलियाला भक्कम सुरूवात करून दिली.  एका महिला वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक रन करण्याचा न्यूझीलंडच्या डेबी हॉकलेचा 25 वर्ष जुना रेकॉर्ड या दोघींनीही फायनलमध्ये मोडला. हॉकलेनं 1997 साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये 456 रन केले होते. या वर्ल्ड कपमध्ये हेन्सनं 497 तर हिलीनं 509 रन केले.

हिलीला हा रेकॉर्ड करण्यासाठी इंग्लिश फिल्डर्सनी मदत केली. मेट क्रॉसनं टाकलेल्या 21 व्या ओव्हरमध्ये या दोघींनाही जीवदान मिळाले. त्यावेळी हेन्स 47 आणि हिली 41 रनवर खेळत होत्या. तर, ऑस्ट्रेलियन टीमनं 100 रनही केले नव्हते. एकाच ओव्हरमधील दोन जीवदान इंग्लंडला भलतेच महाग (3 Mistakes of England Women) पडले. विशेषत: हिलीनं 138 बॉलमध्ये 170 रन करत कोणत्याही वर्ल्ड कप फायनलमधील सर्वोच्च वैयक्तिक रनचा रेकॉर्ड केला.

ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटच्या रोहित शर्मानं वेस्ट इंडिजला लोळावले

तिसरी चूक

वर्ल्ड कप फायनलमध्ये 357 रनचे टार्गेट यशस्वी करणे हे कोणत्याही टीमसाठी अवघड आव्हान आहे. इंग्लंडची टीम ही त्या आव्हानापासून बरीच दूर राहिली. पण, पिचची परिस्थिती आणि विशेषत: इंग्लंडच्या इनिंगमधील रन रेट पाहाता हे टार्गेट अशक्य नव्हते, असाच अर्थ निघेल.

इंग्लंडनं 250 रन पर्यंतच्या प्रत्येक 50 रनचा टप्पा ऑस्ट्रेलियापेक्षा कमी बॉलमध्ये पूर्ण केला. याचच वेगळा अर्थ म्हणजे ऑस्ट्रेलियापेक्षा त्यांचा या सर्व टप्प्यावर रनरेट चांगला होता. पण, इंग्लंडकडून इथे तिसरी चूक झाली. इंग्लंडच्या विकेट्स ठराविक अंतरानं पडल्या. ऑस्ट्रेलियाकडून 160 रनची ओपनिंग झाली. इंग्लंडनं पहिल्या 15 ओव्हर्समध्येच 3 प्रमुख बॅटर्स गमावल्या होत्या.

इंग्लंडनं विकेट सांभाळून रनरेट कायम ठेवला असता तर कदाचित इंग्लिश टीमनं या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला शेवटच्या बॉलपर्यंत झुंज दिली असती. शेवटच्या बॉलपर्यंत मॅच गेली असती तर मॅचचा निकाल काहीही लागू शकला (3 Mistakes of England Women) असता. इंग्लंडच्या नॅट सिवरनं (Nat Sciver) नाबाद 148 रनची खेळी केली. वर्ल्ड कप फायनलमध्ये 148 रन करूनही टीमच्या चुकांमुळे पराभव सहन करण्याची वेळ नेटवर आली.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.

error: