फोटो- ट्विटर, रिमा मल्होत्रा

टीम इंडियानं महिला वर्ल्ड कपच्या (Women’s World Cup 2022) सेमी फायनलच्या दिशेनं दमदार पाऊल टाकलं आहे. सेमी फायनलची दावेदारी सादर करण्यासाठी भारताला बांगलादेश विरूद्ध मोठा विजय आवश्यक होता. पाकिस्तान विरूद्ध विजय आणि वेस्ट इंडिजला कडवी झुंज दिल्यानं बांगलादेशची टीम फॉर्मात होती. त्यांनी काही काळ भारतीय फॅन्सचं टेन्शन वाढवलं. पण, अनुभवी भारतीय टीमनं ही मॅच 110 रनच्या मोठ्या फरकानं जिंकली. यास्तिका भाटिया (Yastika Bhatia) या विजयाची नायिका ठरली. बडोद्याच्या यास्तिकाचा हा पहिलाच वर्ल्ड कप आहे. पहिल्याच वर्ल्ड कपमध्ये ती भारतीय बॅटींगचा आधार (Yastika Bhatia Story) बनली आहे.

अडचणीतून सावरले

21 वर्षांच्या यास्तिकानं सप्टेंबर 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तिला अजून एक वर्षांचाही अनुभव नाही. या कमी कालावधीमध्ये वर्ल्ड कप सारख्या क्रिकेटच्या सर्वोच्च स्पर्धेत यास्तिकानं ठसा उमटवलाय. बांगलादेश विरूद्ध तर तिनं टीमला संकटातून बाहेर काढलं.

टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींगला आलेल्या टीम इंडियानं सुरूवात दमदार केली. शफाली वर्मा (Shafali Verma) आणि स्मृती मंधाना (Smriti Mandhana) यांनी 74 रनची ओपनिंग पार्टनरशिप केली. त्यानंतर टीम इंडियाची अचानक घसरगुंडी उडाली. बिनबाद 74 वरून 3 आऊट 74 अशा संकटात टीम सापडली. कॅप्टन मिताली राज तर शून्यावर आऊट झाली.

या वर्ल्ड कपमध्ये फॉर्मात असलेल्या हरमनप्रीत कौरलाही (Harmanpreet Kaur) मोठा स्कोअर करण्यात अपयश आले. हरमन 14 रनवर आऊट झाल्यांतर भारतीय टीम 200 पार करणार का? हा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी एका बाजून उभ्या असलेल्या यास्तिकानं खंबीर खेळ केला. तिने वर्ल्ड कप स्पर्धेतील सलग दुसरी हाफ सेंच्युरी (Yastika Bhatia Story) झळकावली. यास्तिकाचे 50 रन आणि लोअर ऑर्डरनं दाखवलेल्या चिकाटीनं भारतीय टीमनं 230 रनचे टार्गेट दिले. हे टार्गेट बांगलादेशसाठी पुष्कळ ठरले.

अडथळ्यांवर जिद्दीनं मात

यास्तिका भाटियाच्या रूपानं टीम इंडियाला वर्ल्ड कपमध्ये नवी स्टार मिळाली आहे. वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी सरावही तितकाच दमदार होणे आवश्यक आहे. मागच्या वर्षी भारतामध्ये झालेल्या दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी यास्तिकाची टीम इंडियात निवड झाली, पण तिला खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतरच्या इंग्लंडच्या दौऱ्यासाठी तिचा विचारच झाला नाही. या दुर्लक्षाच्या काळात यास्तिका थांबली (Yastika Bhatia Story) नव्हती. तिचा क्रिकेटचा सराव सुरू होता.

यास्तिकानं बडोद्यामध्ये टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू किरण मोरे (Kiran More) यांच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरू केला. हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या हे आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव असलेले क्रिकेटपटूही बडोद्याचे आहेत. यास्तिकानं नेट्समध्ये त्यांच्या बॉलिंगवर सराव केला. कोचिंगमधील या बदलाचा फायदा तिला झाला. चॅलेंजर ट्रॉफीमधील चांगल्या कामगिरीच्या जोरावर ती टीम इंडियात परतली. ऑस्ट्रेलियाात तिने पदार्पण केले. ऑस्ट्र्लियाच्या 26 विजयांची मालिका मोडण्यात महत्त्वाचा वाटा उचलला.

पाणीपुरी आणि बिर्याणीचा त्याग

यास्तिकानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी तिच्या आहारातही बदल केला. तिने आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर पाणीपुरी आणि चिकन बिर्याणी हे दोन आवडते पदार्थ खाणे सोडले. विशेषत: पाणीपुरी या आवडत्या फास्ट फूडपासून ती गेली 7 वर्ष दूर आहे.

मुलीला क्रिकेटपटू करण्यासाठी वडिलांनी शेत विकलं, संकटमोचक जिंकून देणार वर्ल्ड कप!

भारतीय महिला टीमचं वर्ल्ड कप विजेतेपदाचं स्वप्न अद्याप अपूर्ण आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक खेळाडूनं उर्वरित मॅचमध्ये सर्वोच्च खेळ करणे आवश्यक आहे. मिताली राज, दीप्ती शर्मा, शफाली वर्मा फॉर्मात नसल्यानं स्मृती आणि हरमनवर दबाव जास्त आहे. तो दबाव कमी करण्याचं काम यास्तिका करत (Yastika Bhatia Story) आहे. वर्ल्ड कपमधील उर्वरित मॅचमध्येही तिच्याकडू यासारख्या नाही तर यापेक्षाही चांगल्या खेळीची संपूर्ण देशाला अपेक्षा आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: