फोटो: ट्विटर, ऑस्ट्रेलिया वुमेन्स क्रिकेट टीम

न्यूझीलंडमध्ये सुरू असलेली महिला वर्ल्ड कपची स्पर्धा (Women’s World Cup 2022) आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. टीम इंडिया या वर्ल्ड कपमधून दुर्दैवी पद्धतीनं आऊट झाली. त्यानंतर आता शेवटच्या 4 टीम वर्ल्ड कप विजेतेपदाच्या शर्यतीमध्ये उरल्या आहेत. महिला वर्ल्ड कपची पहिली सेमी फायनल सहा वेळा वर्ल्ड कप जिंकणारी ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या पराभवानं फायदा झालेल्या वेस्ट इंडिजमध्ये (Australia Women vs West Indies Women) बुधवारी (30 मार्च 2022) होणार आहे. या सेमी फायनलच्या काही तास आधी ऑस्ट्रेलियन टीमला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाची मॅच विनिंग ऑल राऊंडर एलिस पेरी दुखापतीमुळे सेमी फायनलमधून आऊट (Ellyse Perry ruled out) झाली आहे.

फिटनेस टेस्टमध्ये फेल

ऑस्ट्रेलियाची कॅप्टन मेग लॅनिंगनं (Meg Lanning) पेरी सेमी फायनल खेळणार नसल्याचं जाहीर केलं आहे. ‘एलिस फिटनेस सिद्ध करू शकली नाही. दुर्दैवानं फिटनेस सिद्ध करण्याची मुदत आता संपली आहे,’ असे लॅगिंगनं सांगितलं. या वर्ल्ड कपमधील दक्षिण आफ्रिका विरूद्ध झालेल्या मॅचमध्ये पेरीची पाठ दुखावली होती. त्यानंतर ती बांगलादेश विरूद्धची मॅच खेळली नाही. ऑस्ट्रेलियन टीमनं लीगमधील सर्व मॅच जिंकत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

ऑस्ट्रेलियाची अनुभवी ऑल राऊंडर असलेली पेरी दुसऱ्यांदा सेमी फायनल मिस करणार आहे. यापूर्वी 2020 साली झालेल्या T20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्येही ती दुखापतीमुळे (Ellyse Perry ruled out) खेळू शकली नव्हती.

सेमी फायनलच्या एक दिवस आधी मेग म्हणाली, ‘ आम्हाला सेमी फायनलमध्ये एलिस पेरीशिवाय खेळावे लागणार आहे. आम्हाला फायनलमध्ये जाण्यापूर्वी तिच्या फिटनेसवर विशेष लक्ष द्यावे लागेल. हा तिच्यासाठी आणि टीमसाठी दुर्दैवी क्षण आहे. पेरी नसल्यानं टीम बॅलन्सला धक्का बसला असला तरी आमच्याकडे वेगवेगळे पर्याय आहेत. त्यामुळे पेरीची कमतरता जाणवणार नाही. 3 एप्रिल रोजी होणाऱ्या फायनलपूर्वी पेरी फिट होईल,’ अशी आशा मेगनं व्यक्त केली आहे.

Women’s World Cup: एका चुकीची मोठी किंमत, टीम इंडिया वर्ल्ड कपमधून बाहेर

कोण आहे पेरी ?

एलिस पेरी ही ऑस्ट्रेलियाच नाही तर महिला क्रिकेटमधील एक प्रमुख ऑल राऊंडर आहे. 2007 साली तिने वयाच्या 17 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यावेळी ती ऑस्ट्रेलियन महिला टीममध्ये पदार्पण करणारी सर्वात लहान खेळाडू होती. गेल्या 15 वर्षात तिने बॅट आणि बॉल या दोन्ही माध्यमातून मैदान गाजवले आहे. 127 वन-डे नंतरही तिची बॅटींगमधील सरासरी 50. 02 इतकी तसंच तिनं 161 विकेट्सही घेतल्या आहेत. पेरीनं या वर्ल्ड कपमध्येही 6 मॅचमध्ये 146 रन केले असून 5 विकेट्स (Ellyse Perry ruled out) घेतल्या आहेत.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.

error: