फोटो – ट्विटर, बीसीसीआय वूमन

आयसीसी महिला वर्ल्ड कप 2022 स्पर्धेत (Women’s World Cup 2022) भारत 5 मॅचमध्ये दोन विजय मिळवून चौथ्या स्थानावर आहे. 5 मॅचमध्ये भारताचे 4 पॉइंट आहेत. मंगळवारी (22 मार्च 2022) भारताची बांगलादेशविरूध्द हॅमिल्टनमध्ये मॅच (India Women vs Bangladesh Women) होणार आहे. पुढच्या दोन्ही मॅचेस भारतीय टीम साठी ‘करो या मरो’ स्वरूपाच्या असणार आहेत. सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताला उर्वरित दोन्ही मॅचेस जिंकणं जरूरीचे आहे. त्यामुळे टीम मॅनेजमेंट बांगलादेश विरूद्ध भारतीय टीमची ट्रम्प कार्ड असलेल्या पूनम यादवचा प्लेईंग इलेव्हनमध्ये (Poonam Yadav vs Bangladesh) समावेश करू शकते.

हुकुमाची राणी का?

30 वर्षीय पूनमने तिच्या स्पिन बॉलिंगच्या जोरावर टीम इंडियाला अनेक विजय मिळवून दिले आहेत. आता वर्ल्ड कप स्पर्धा निर्णायक अवस्थेत आल्यानंतर भारतीय टीमला तिच्या कौशल्याची आणि अनुभवाची गरज आहे. त्यामुळे बांग्लादेश विरूद्ध पूनमला मैदानात उतरवण्यासाठी टीम मॅनेजमेंट विचार करत आहे. T20 मध्ये भारताकडून (पुरुष व महिला दोन्ही) सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड पूनमचा नावावर आहे

Women’s World Cup: टीम इंडियासाठी वाढला धोका, पाहा मिताली राजची सेना सेमी फायनलमध्ये कशी पोहचणार?

वनडे विश्वचषकात 11 विकेट्स

भारताकडून खेळताना पूनमने 57 वनडेमध्ये 79 विकेट्स घेतल्या आहेत. आत्तापर्यंत तिला आयसीसी विश्वचषकातील 9 मॅचेसमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. या 9 मॅचेसमध्ये तिने 26 च्या सरासरीनं आणि 3.86 च्या इकोनॉमी रेटने एकूण 11 विकेट्स काढल्या आहेत. गेल्या वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिज विरूद्ध 19 रन्स देऊन तिने 2 विकेट्स घेतल्या होत्या. ही तिची वर्ल्ड कपमधील सर्वोत्तम कामगिरी आहे.

पूनमने बांगलादेश विरूद्ध विरूद्ध 2 वनडे खेळल्या आहेत. त्यात तिनं 13.66 च्या सरासरीनं 3 विकेट्स घेतल्या आहेत. न्यूझीलंडच्या पिचवर पूनमला 6 वनडे खेळण्याचा अनुभव आहे. त्यामध्ये पूनमनं 27.11 च्या सरासरीनं 9 विकेट्स मिळवल्यात. वर्ल्ड कप स्पर्धेतलं टीम इंडियाचं आव्हान कायम ठेवण्यासाठी तिच्या अनुभवाची, दमदार स्पेलची (Poonam Yadav vs Bangladesh) भारतीय टीमला गरज आहे.

टीम इंडियाच्या आता बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका विरूद्धच्या मॅच शिल्लक आहेत. सेमी फायनलमध्ये थेट प्रवेश मिळवण्यासाठी या दोन्ही मॅच चांगल्या फरकानं जिंकणे मिताली राजच्या टीमला आवश्यक आहे. दक्षिण आफ्रिकेनं या स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे त्या मॅचमध्ये भारतीय टीमला संघर्ष करावा लागू शकतो. ती शक्यता विचारात घेऊन बांगलादेशविरुद्ध जास्तीत जास्त मोठा विजय मिळवणे आवश्यक आहे. बांगलादेशला स्पिनच्या जाळ्यात अडकवण्यासाठी या स्पर्धेत एकही मॅच न खेळलेली पण आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा मोठा अनुभव असलेली पूनम हुकुमाची राणी (Poonam Yadavs vs Bangladesh) ठरू शकते.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: