
भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात होणाऱ्या चार टेस्ट मॅचच्या सीरिजमधील पहिल्या दोन टेस्ट मॅचसाठी आज (19 जानेवारी 2021) टीम इंडियाची (Team India) निवड होणार (Team Selection) आहे. चेतन शर्मा (Chetan Sharma) यांच्या अध्यक्षतेखालील नव्या निवड समितीची ही पहिलीच बैठक आहे. या बैठकीला निवड समितीच्या सर्व सदस्यांसह टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि कोच रवि शास्त्री (Ravi Shastri) देखील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहणार आहेत. या टीममध्ये युजवेंद्र चहलचा (Yuzvendra Chahal) पहिल्यांदाच टेस्ट टीममध्ये समावेश होऊ शकतो
दुखापतींमुळे प्रमुख खेळाडू आऊट
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात (India tour of Australia) भारतीय टीमला दुखापतींचं ग्रहण लागलं आहे. इशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमार हे दोघं दुखापतीमुळे दौऱ्यावर येऊ शकले नाहीत. रोहित शर्मा देखील फक्त शेवटच्या दोन टेस्ट खेळू शकला. त्याशिवाय या दौऱ्यात मोहम्मद शमी, उमेश यादव, के.एल. राहुल. रवींद्र जडेजा, हनुमा विहारी, रविचंद्रन अश्विन आणि जसप्रीत बुमराह हे सात खेळाडू जखमी झाले.
( वाचा : ‘त्याला रात्रभर त्रास होत होता,’ अश्विनच्या बायकोनं सांगितलं नवऱ्याचं सत्य! )
बुमराह आणि अश्विन यांनी ब्रिस्बेन टेस्टचा चौथा दिवस संपल्यानंतर नेटमध्ये बॉलिंग केली. या दोघांचाही टीममधील समावेश नक्की मानला जात आहे. शमी, जडेजा, विहारी आणि उमेश यादव यांच्या दुखापती गंभीर असून या चारही खेळाडूंची पहिल्या दोन टेस्टसाठी आराम मिळण्याची शक्यता आहे. के.एल. राहुलचा फिटनेस रिपोर्ट पाहिल्यानंतर निवड समितीच्या बैठकीत अंतिम निर्णय होईल.
टॉप ऑर्डर (Top order)
मुंबईकर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) साठी ऑस्ट्रेलिया सीरिज निराशाजनक ठरली. यापूर्वी झालेल्या IPL 2020 मध्येही तो फॉर्मात नव्हता. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यातील टीममधून त्याला वगळले जाऊ शकते. पृथ्वीला देशांतर्गत क्रिकेट खेळून स्वत:चा फॉर्म सिद्ध करावा लागेल.
रोहित शर्मा आणि शुभमन गिल हे पहिल्या दोन टेस्टसाठी टीम इंडियाचे ओपनर्स असतील. तर मयांक अग्रवाल हा राखीव ओपनर असेल.
( वाचा : SL vs ENG: इंग्लंडचा कॅप्टन जो रुटची डबल सेंच्युरी, नव्या रेकॉर्ड्सची नोंद! )
मीडल ऑर्डर (Middle order)
विराट कोहली पितृत्वाच्या रजेमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तीन टेस्ट खेळला नव्हता. इंग्लंड दौऱ्यासाठी तो परत येतोय. तोच टीमचा कॅप्टन असेल. कोहलीसह चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांची मीडल ऑर्डरमधील जागा नक्की आहे. के.एल. राहुल उपलब्ध असल्यास एक राखीव बॅट्समन म्हणून त्याची टीममध्ये निवड होऊ शकते.
विकेटकिपर (Wicket Keeper)
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या टेस्टमध्ये ऋद्धीमान साहा तर नंतरच्या तीन टेस्टमध्ये ऋषभ पंतनं विकेटकिपिंग केली होती. पंतनं या दौऱ्यात समाधानकारक बॅटिंग केली आहे. तसेच भविष्यातील विचार करता तोच टीम इंडियाचा पहिला विकेट किपर असेल. मात्र स्पिन बॉलिंगच्या विरुद्ध पंतच्या विकेटकिपिंगमधील तंत्र वारंवार उघडं पडलं आहे. त्यामुळे ऋद्धीमान साहाचा राखीव विकेटकिपर म्हणून टीममध्ये समावेश होऊ शकतो.
( वाचा : वाढदिवस स्पेशल : विनोद कांबळी, हरवलेला सुपरस्टार! )
ऑलराऊंडर (Allrounder)
रवींद्र जडेजाच्या अनुपस्थितीमध्ये टीममधील एकमेव ऑलराऊंडर म्हणून वॉशिंग्टन सुंदरची निवड पक्की आहे. सुंदरनं ब्रिस्बेन टेस्टमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याचबरोबर इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या दोन्ही टेस्ट या सुंदरच्या होम गाऊंडवर म्हणजेच चेन्नईमध्ये (Chennai) होणार आहेत. ही बाब देखील त्याच्या टीम निवडीसाठी फायदेशीर आहे.
चहल नवा चेहरा?
भारतीय स्पिनर्सच्या यादीमध्ये रविचंद्रन अश्विनचं नाव नक्की आहे. चेन्नई पिचवर भारताकडून अंतिम 11 मध्ये तीन स्पिनर खेळतील असा अंदाज आहे. त्यामुळे अश्विन आणि सुंदर या स्थानिक स्पिनर्ससह तिसऱ्या जागेसाठी शादाब नदीम आणि युजवेंद्र चहल यांच्यात चुरस आहे.
नदीम दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2019 साली झालेली टेस्ट सीरिज खेळला होता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याचा भक्कम अनुभव आणि भरपूर विकेट्स त्याच्या पाठीशी आहेत. नदीमला युजवेंद्र चहलचं आव्हान असेल. चहलला आयपीएल आणि मर्यादीत ओव्हर्सच्या क्रिकेटचा चांगला अनुभव आहे. इंग्लंड टीमविरुद्धही त्याचा रेकॉर्ड चांगला आहे. त्यामुळे जडेजाच्या अनुपस्थितीमध्ये एक लेग स्पिनर म्हणून निवड समिती त्याला टेस्ट पदार्पणाची संधी देण्याची शक्यता आहे. कुलदीप यादव टीममधील राखीव स्पिनर असेल.
फास्ट बॉलर (Fast Bowler)
जसप्रीत बुमराह आणि इंशांत शर्मा या अनुभवी फास्ट बॉलर्सची निवड नक्की आहे. अंतिम 11 मध्ये खेळण्यासाठी इंशात. राखीव फास्ट बॉलर म्हणून शार्दुल ठाकूर, टी. नटराजन आणि नवदीप सैनी हे राखीव फास्ट बॉलर असतील. निवड समितीसमोर पर्याय वाढल्यानं मुश्ताक अली स्पर्धेत (Syed Mushtaq Ali Trophy 2021) चांगली कामगिरी करुनही भुवनेश्वर कुमारला प्रतिक्षा करावी लागू शकते.
( वाचा : मोहम्मद सिराजची संघर्षगाथा : वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘तो’ सर्व संकटात ठाम उभा होता! )
इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या दोन टेस्टसाठी अशी असेल टीम इंडिया
विराट कोहली (कॅप्टन), अजिंक्य रहाणे (व्हाईस कॅप्टन), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (विकेटकिपर), वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज आणि शादाब नदीम
राखीव खेळाडू – मयंक अग्रवाल, वृद्धीमान साहा, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी, टी. नटराजन आणि कुलदीप यादव
फिटनेस रिपोर्टनंतर निर्णय – के.एल. राहुल
संभाव्य नवा चेहरा – युजवेंद्र चहल
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.
You must be logged in to post a comment.