फोटो – जागरण

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील चार टेस्ट मॅचच्या सीरिजमधील शेवटच्या दोन टेस्ट अहमदाबादमध्ये (Ahmedabad) होत आहेत. गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या मालकीचे (GCA) असलेले हे सरदार पटेल स्टेडियम (Sardar Patel Stadium) क्रिकेट विश्वात मोटेरा (Motera) नावानं देखील ओळखले जाते. आज हे क्रिकेट विश्वातील सर्वाधिक प्रेक्षक संख्येचे स्टेडियम आहे. 1982 साली बांधण्यात आलेल्या या स्टेडियममध्ये नुतनीकरणानंतर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय मॅच होत आहे. मात्र यापूर्वी अनेक अविस्मरणीय आठवणीचं अहमदाबादचं हे स्टेडियम (Ahmedabad Records) साक्षीदार आहे.

भारताचा फास्ट बॉलर इशांत शर्मा (Ishant Sharma) त्याच्या कारकीर्दीमधील 100 वी टेस्ट अहमदाबादमध्ये खेळणार आहे. ही मैदानावरची सर्वात ताजी आठवण असेल. यापूर्वी सुनील गावसकर, कपिल देव, सचिन तेंडुलकर, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग आणि हरभजन सिंग या दिग्गज भारतीय खेळाडूंच्या आठवणी याच मैदानाशी निगडीत आहेत. तसंच भारतानं एक खूप मोठी मॅच देखील या ठिकाणी जिंकली आहे.

गावसकरांचा पहिला विक्रम

भारताचे माजी कॅप्टन सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी याच मैदानावर 1987 साली टेस्ट क्रिकेटमध्ये 10 हजार रनचा टप्पा पार केला होता. हा विक्रम करणारे तेंव्हा ते पहिलेच क्रिकेटपटू होते. पाकिस्तान विरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये (India – Pakistan Cricket) गावसकरांनी हा पराक्रम केला होता.

भारत पाकिस्तान यांच्यातील त्या टेस्टमध्ये पाकिस्ताननं पहिल्यांदा बॅटिंग करताना 395 रन केले. भारतानं 323 रन करत त्या इनिंगला उत्तर दिलं. भारताकडून सुनील गावसकर यांनी 63 तर दिलीप वेंगसरकर यांनी 109 रन काढले होते. गावसकर यांनी 58 रन पूर्ण करताच 10 हजार रन पूर्ण करण्याचा विक्रम (Ahmedabad Records)  केला. ती टेस्ट पुढे ड्रॉ झाली.  

कपिलनं मोडला रेकॉर्ड

भारताचा आणखी एक महान खेळाडू कपिल देव (Kapil Dev) यांनी याच मैदानावर 1994 साली एक मोठा रेकॉर्ड मोडत नवा इतिहास रचला. श्रीलंकेविरुद्ध झालेल्या त्या टेस्टमध्ये कपिल देवने हसन तिलकरत्नेला संजय मांजेरकरकडं कॅच देऊन आऊट केलं.

या विकेटबरोबरच कपिलनं न्यूझीलंडच्या रिचर्ड हॅडलीचा (Richard Hadlee)  टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जास्त 431 विकेट घेण्याचा रेकॉर्ड (Ahmedabad Records) मोडला. त्यावेळी मैदानात 432 फुगे सोडून कपिल देवला मानवंदना देण्यात आली. व्यंकटपती राजूच्या 11 विकेट्सच्या जोरावर भारतानं ती टेस्ट जिंकली. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेण्याचा हा विक्रम कपिलच्या नावावर पुढे जवळपास दहा वर्ष होता. ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्ननं तो विक्रम मोडला.

( वाचा : कपिल देव का जबाब नही’ – पेन किलर घेत मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाला केले होते पराभूत! )

सचिनचे खास रेकॉर्ड्स

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) देखील अहमदाबादमध्ये निगडीत अशी एक खास आठवण आहे. याच मैदानावर 2009 साली श्रीलंकेविरुद्ध झालेल्या टेस्टमध्ये सचिननं 30 हजार आंतरराष्ट्रीय रन करणारा पहिला बॅट्समन असा रेकॉर्ड केला होता.

श्रीलंकेविरुद्ध पाचव्या दिवशी सचिननं हा विक्रम केला. सचिननं चौथ्या इनिंगमध्ये नाबाद 100 रन करत ती मॅच ड्रॉ करण्यात मोठी भूमिका बजावली होती.  त्याचबरोबर सचिननं त्याच्या टेस्ट करियरमधील पहिली डबल सेंच्युरी आणि वन-डे क्रिकेटमधील 18 हजार रन देखील याच मैदानावर पूर्ण केले आहेत.

( VIDEO : सिडनी टेस्टच्या आठवणी, सचिन तेंडुलकर नाबाद 241! )

लक्ष्मण आणि हरभजनचे रेकॉर्ड

भारताचा स्टायलीश बॅट्समन व्ही.व्ही.एस लक्ष्मण (VVS Laxman) याने 1996 साली याच मैदानावर टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या त्या टेस्टमध्ये लक्ष्मणनं पहिल्या इनिंगमध्ये 11 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 56 रन केले होते.

भारताचा ऑफ स्पिनर हरभजन सिंग (Harbhajan Singh) यानं याच मैदानावर टेस्ट क्रिकेटमधील पहिली सेंच्युरी झळकावली. न्यूझीलंड विरुद्ध 2010 साली झालेल्या त्या टेस्टमध्ये हरभजननं 115 रन केले होते.

 कुंबळेचा रेकॉर्ड, सेहवागची कॅप्टनसी

  भारताचा सर्वाधिक यशस्वी बॉलर असलेल्या अनिल कुंबळेनं (Anil Kumble) 2005 साली अहमदाबादमध्येच त्याच्या कारकीर्दीमधील 100 वी टेस्ट खेळली होती. श्रीलंकेविरुद्ध झालेल्या त्या मॅचमध्ये कुंबळेनं पहिल्या इनिंगमध्ये 2 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 5 विकेट्स घेत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती.

विशेष म्हणजे वीरेंद्र सेहवागनं (Virender Sehwag) त्या टेस्टमध्ये पहिल्यांदाच भारताची कॅप्टनसी केली होती. भारतानं ती मॅच 259 रननं जिंकली. पण, सेहवाग बॅट्समन म्हणून त्यामध्ये फार चालला नाही. पहिल्या इनिंगमध्ये 20 रन काढणारा सेहवाग दुसऱ्या इनिंगमध्ये शून्यावर आऊट झाला होता.

( वाचा : जेंव्हा वीरेंद्र सेहवागच्या आक्रमक प्रतिहल्ल्यानंतर भारतानं चेन्नई टेस्ट जिंकली होती! )

वन-डे मधील मोठा पराक्रम !

टेस्ट क्रिकेट प्रमाणेच वन-डे क्रिकेटमध्येही भारताची एक अविस्मरणीय आठवण (Ahmedabad Records) अहमदाबादशी निगडीत  आहे. 2011 च्या क्रिकेट वर्ल्ड कप (Cricket World Cup) मधील भारत – ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्वार्टर फायनलची मॅच अहमदाबादमध्येच झाली होती. सलग तीन वर्ल्ड कप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा भारतानं पराभव करत वर्ल्ड कप सेमी फायनल गाठली होती. पुढे टीम इंडियानं तो वर्ल्ड कप देखील जिंकला.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: