फोटो – ट्विटर / @ani_digital

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील चौथी टेस्ट अहमदाबादमध्ये होत असून या टेस्टमध्ये सर्वांचं लक्ष आर. अश्विन (Ravichandran Ashwin) आणि अक्षर पटेल (Axar Patel) या जोडीकडं असेल. या जोडीनं या सीरिजमध्ये इंग्लंडला चांगलंच त्रस्त केलं आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये या जोडीनं इंग्लंडच्या 20 पैकी 19 विकेट्स घेतल्या होत्या. चौथ्या टेस्टमध्येही अहमदाबादचं पिच स्पिन बॉलिंगला मदत करणारं असेल अशी शक्यता आहे. या टेस्टमध्ये अक्षर पटेलला 1988 नंतर कुणालाही न जमलेला रेकॉर्ड (Axar Patel Record) करण्याची संधी आहे.

अक्षरची पहिलीच टेस्ट सीरिज

अक्षर पटेलचा इंग्लंड विरुद्धच्या सीरिजपूर्वी पहिल्यांदाच टेस्ट टीममध्ये समावेश झाला. चेन्नईतील पहिल्या टेस्टममध्ये त्याला दुखापतीमुळे खेळता आलं नाही. दुसऱ्या टेस्टमध्ये अक्षरनं लगेच आपल्या खेळानं स्वत:ची छाप उमटवली. त्यानं इंग्लंडचा कॅप्टन जो रुट (Joe Root) याला आऊट करत टेस्ट क्रिकेटमधील पहिली विकेट घेतली. 2021 मधील टेस्ट क्रिकेटच्या पहिल्या इनिंगमध्ये पहिल्यांदाच रुट 100 च्या आऊट झाला होता. अक्षरनं पहिल्या इनिंगमध्ये 2 विकेट्स घेतल्या. पहिल्या इनिंगमध्ये लक्षवेधी बॉलिंग केलेल्या अक्षरनं नंतर मागं वळून पाहिलं नाही. दुसऱ्या इनिंगमध्ये त्यानं 5 विकेट्स घेत टीम इंडियाला सीरिजमध्ये बरोबरी साधण्यासाठी मोलाची भूमिका बजावली.

भारत-इंग्लंड सीरिजमधील तिसरी टेस्ट ही अहमदाबादमध्ये म्हणजे अक्षरच्या होम ग्राऊंडवर होती. अवघ्या दोन दिवसांमध्ये संपलेल्या या टेस्टमध्ये अक्षरच्या स्पिन बॉलिंगपुढे इंग्लंडचे बॅट्समन अक्षरश: निरक्षर वाटले. अक्षरनं पहिल्या इनिंगमध्ये 38 रन देऊन 6 , तर दुसऱ्या इनिंगमध्ये 32 रन देत 5 अशा एकूण 11 विकेट्स घेतल्या.

( वाचा : IND vs ENG : ‘अक्षर’ पटेलच्या माऱ्यापुढे इंग्लंडचे बॅट्समन ‘निरक्षर’ )

ऐतिहासिक रेकॉर्डची संधी

टेस्ट करियरची स्वप्नवत सुरुवात करणाऱ्या अक्षरला त्याच्या घरच्या मैदानात आणखी काही ऐतिहासिक रेकॉर्ड्स (Axar Patel Record) करण्याची संधी आहे. अक्षर पटेलनं टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर सलग तीन इनिंगमध्ये पाच विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड केला आहे. यापूर्वी ही कामगिरी 1983 साली इंग्लंडच्या टॉम रिचर्डसन यांनी केली होती.

अक्षरनं टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून पहिल्या दोन टेस्टमध्ये 18 विकेट्स घेतल्या आहेत. आता अहमदाबादमध्ये होणाऱ्या चौथ्या टेस्टमध्ये अक्षरनं आणखी 14 विकेट्स घेतल्या तर पदार्पणातील पहिल्या 3 टेस्टमध्ये 31 विकेट्स घेण्याचा भारताचा लेगस्पिनर नरेंद्र हिरवाणीचा (Narendra Hirwani) रेकॉर्ड अक्षरला मोडण्याची (Axar Patel Record) संधी आहे. हिरवाणी यांनी 1988 साली चेन्नई टेस्टमध्ये सनसनाटी पदार्पण केल्यानंतर पहिल्या तीन टेस्टमध्ये 31 विकेट्स घेतल्या होत्या. त्यांचा हा रेकॉर्ड आजवर अबाधित आहे.   

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

  

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading