फोटो – याहू

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील पहिली टेस्ट जिंकून इंग्लंडनं इतिहास घडवला आहे. भारतानं 1999 नंतर पहिल्यांदाच चेन्नईमध्ये टेस्ट मॅच गमावली. या विजयानं आत्मविश्वास वाढलेल्या इंग्लंडनं दुसऱ्या टेस्टसाठी (Second Test) 12 सदस्यांची घोषणा एक दिवस आधीच केली आहे. या टीममध्ये पहिली टेस्ट जिंकणाऱ्या चार खेळाडूंचा या टीममध्ये समावेश नाही. दुसरी टेस्ट 13 फेब्रुवारीपासून चेन्नईत खेळवली जाणार आहे.

काय आहेत बदल?

इंग्लंडचा फास्ट बॉलर जोफ्रा आर्चर (Jofra Archer) हा दुखापतीमुळे दुसरी टेस्ट खेळू शकणार नाही. तर विकेटकिपर जोस बटलरला (Jos Buttler) टीमच्या धोरणानुसार विश्रांती देण्यात आली आहे. आता बटलर थेट T20 सीरिजमध्ये भारताविरुद्ध खेळेल. सर्वात अनुभवी बॉलर जेम्स अँडरसनलाही (James Anderson) विश्रांती देण्यात आली आहे. अहमदाबादमध्ये होणारी तिसरी टेस्ट ही डे-नाईट टेस्ट आहे. या टेस्टसाठी फ्रेश राहावं म्हणून अँडरसनला विश्रांती देण्यात आली आहे. त्याचबरोबर स्पिन बॉलर डॉम बेसला देखील दुसऱ्या टेस्टसाठी आराम देण्यात आला आहे.

( वाचा : IND vs ENG : T20 सीरिजसाठी इंग्लंडची टीम जाहीर, फॉर्मातील खेळाडूकडं पुन्हा दुर्लक्ष )

कुणाचा झाला समावेश?

जोफ्रा आर्चरच्या जागी ख्रिस वोक्स, अँडरसनच्या जागी दुसरा अनुभवी बॉलर स्टुअर्ट ब्रॉड, जोस बटलरच्या जागेवर बेन फोक्स हा नवा विकेटकिपर दुसरी टेस्ट खेळेल. आगामी तिन्ही टेस्टमध्ये फोक्सच विकेट किपर असेल असं इंग्लंडचा कॅप्टन जो रुटनं (Joe Root) स्पष्ट केलं आहे. तर डॉम बेसच्या जागी अनुभवी स्पिनर मोईन अलीला संधी देण्यात आली आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेची (World Test Championship) फायनल गाठण्यासाठी इंग्लंडला या सीरिजमधील उर्वरित तीन टेस्टपैकी किमान दोन टेस्ट जिंकणे आवश्यक आहे. तर भारतीय टीमला (Team India) फायनलसाठीचं आव्हान कायम राखण्यासाठी उर्वरित तीन टेस्टपैकी एकही टेस्ट गमावून चालणार नाही. टीम इंडिया आपला संघ टेस्ट सुरु होण्यापूर्वी जाहीर करेल. पण या टेस्टसाठी अक्षर पटेलचा (Axar Patel) समावेश हा जवळपास नक्की मानला जात आहे.

( वाचा : वाढदिवस स्पेशल : अक्षर पटेल, हिंमतवाला बॉलर! )

इंग्लंडची 12 सदस्यीय टीम : डॉम सिब्ले, रोरी बर्न्स, जो रुट (कॅप्टन), बेन स्टोक्स, ओली पोप बेन फोक्स (विकेटकिपर), मोईन अली, स्टुअर्ट ब्रॉड, ख्रिस वोक्स, जॅक लीच आणि ओली स्टोन

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: