फोटो – ट्विटर/ICC

भारताची टेस्ट सीरिज ही दुसऱ्या टेस्टपासूनच सुरु करायला हवी’ असा एक विनोद सध्या व्हॉट्सप आणि अन्य सोशल मीडियावर फिरत आहे. याला कारण म्हणजे ऑस्ट्रेलियानंतर सलग दुसऱ्या सीरिजमध्ये भारतानं दुसऱ्या टेस्टमध्ये मालिकेत कमबॅक केलं. पहिल्या टेस्टच्या पराभवाची परतफेड (India strikes back) केली. चेन्नईतील पहिली टेस्ट 227 रननं गमावल्यानंतर त्याच गावात आणि त्याच मैदानात दुसरी टेस्ट 317 रननं जिंकत भारतानं या मालिकेत बरोबरी साधली आहे.

पंतमुळे आठवला धोनी

ऋषभ पंत (Rishabh Pant) मैदानात असताना एकेकाळी त्याच्या खराब किपिंगमुळे मैदानातून ‘धोनी, धोनी’चा गजर करुन त्याचं ट्रोलिंग करण्यात आलं होतं. दुसऱ्या टेस्टच्या चौथ्या दिवशी पंतनं अश्विनचा (Ravichandran Ashwin) लेग साईडला जाणारा बॉल चपळाईनं अडवत डॅन लॉरेन्सला स्टंप आऊट केलं. त्यामुळे धोनीच्या बालेकिल्ल्यात चेन्नईमध्ये पुन्हा एकदा सर्वांना धोनीची आठवण आली. पंतच्या या जबरदस्त किपिंगमुळे अश्विनला सकाळी त्याच्या पहिल्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली.

अश्विन वि. स्टोक्स =  नेहमीचाच निकाल

लॉरेन्स आऊट झाल्यानंतर जगातील सध्याचा नंबर 1 ऑल राऊंडर बेन स्टोक्स (Ben Stokes) मैदानात आला. स्टोक्स मैदानात येताच अश्विन पुन्हा बॉलिंगला आला. अश्विननं स्टोक्सला 38 बॉल टाकले. त्यापैकी 35 बॉल स्टोक्सनं निर्धाव (मेडन) खेळले. त्या दरम्यान LBW चं एक मोठं अपिलही  फेटाळण्यात आले. 50 बॉलमध्ये 8 रन अशी संयमी खेळी करणारा स्टोक्स 51 व्या बॉलवर फसला.

स्टोक्स अश्विनच्या बॉलिंवर कोहलीकडं कॅच देऊन परतला. या सीरिजमध्ये सलग तिसऱ्यांदा स्टोक्सला अश्विननं आऊट (India strikes back)  केलं आहे. अश्विननं आजवर दहा टेस्टमध्ये दहा वेळा स्टोक्सला आऊट केलं असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्टोक्सला सर्वात जास्त 14 वेळा आऊट करणारा आपला अश्विनच आहे.

( वाचा : IND vs AUS : अश्विनच्या जाळ्यात पुन्हा अडकला स्मिथ, अनेक रेकॉर्ड्सची झाली नोंद )

कुलदीपची एन्ट्री

चेन्नईमध्ये भारतासाठी सर्व जल्लोषी वातावरण असताना कुलदीप यादव (Kuldeep Yadav) शांत होता. दोन वर्षांपूर्वी तो भारताचा परदेशातील नंबर 1 स्पिनर होता. त्यानंतर त्याला दोन वर्ष टेस्ट क्रिकेटमध्ये संधीच मिळाली नाही. पहिल्या इनिंगमध्ये त्यानं फक्त सहा ओव्हर्सच बॉलिंग केली. इंग्लंडच्या टेस्टमध्ये 16 विकेट्स पडलेल्या असताना त्याला त्यामधील एकही विकेट मिळाली नव्हती. दुसऱ्या इनिंगमध्येही त्याला थेट 43 व्या ओव्हरमध्ये बॉल मिळाला.

पुढच्या टेस्टमध्ये संधी मिळेल का? हे कुलदीपला माहिती नव्हतं. इंग्लंडच्या फक्त चार विकेट्स उरल्या होत्या. त्यावेळी कुलदीपच्या बॉलिंगवर सिराजनं जो रुटचा कॅच सोडला. कुलदीप या सेटबॅकनंतर लगेच सावरला. त्यानं लंचपूर्वी या टेस्टमधील पहिली विकेट घेतली.

( वाचा : खेळता येईना पिच वाकडे : चेन्नईला नावं ठेवण्यापूर्वी जरा ‘या’ महान पिचवरील रेकॉर्ड्सही पाहा )

अक्षर पटेलला पुन्हा मोठी विकेट

पहिलीच टेस्ट खेळणारा ‘हिंमतवाला बॉलर’ अक्षर पटेल एका बाजूनं त्याचं काम करत होता. त्यानं लंचनंतर पहिल्या सेशनमध्ये चिकटून बसलेल्या जो रुटला परत पाठवलं. या टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये अक्षरनं रुटची विकेट घेतली. यावर्षी पहिल्या तीन टेस्टमध्ये अजिंक्य वाटणारा जो रुट अक्षरपुढे चालला नाही. अक्षरनं या इनिंगमध्ये पाच विकेट्स घेतल्या. आता घरच्या मैदानावर होणाऱ्या पुढील दोन टेस्टमध्ये त्याला या अनुभवाचा मोठा फायदा होईल.

…आणि पुन्हा कुलदीप!

जो रुट आऊट झाल्यानंतर मोईन अलीनं (Moeen Ali) आक्रमक खेळ करत आयपीएल ऑक्शनपूर्वी त्याचं स्किल दाखवलं. त्यानं अक्षर पटेलला सलग तीन सिक्सर मारले. इंग्लंडकडून टेस्ट क्रिकेटमध्ये 87 वर्षांनी कुणीतरी सलग तीन बॉलवर सिक्स मारले होते.

पाच सिक्ससह 43 वर पोहचलेल्या मोईन अलीची हाफ सेंच्युरी कुलदीपनं होऊ दिली नाही. त्यानं मोईनला आऊट करत दोन वर्षांपूर्वी आयपीएल मॅचमध्ये केलेल्या धुलाईची आयपीएल ऑक्शनपूर्वी परतफेड केली. कुलदीपनं या विकेटसह भारताच्या मोठ्या विजयावर (India strikes back)  शिक्कामोर्तब केलं.  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: