फोटो – ट्विटर/ICC

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील पाच टेस्ट मॅचची सीरिज 4 ऑगस्टपासून सुरू होत आहे. या सीरिजपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या नव्या सिझनला (WTC 2021-23) सुरुवात होत आहे. या सिझनची सुरुवात जोरदार करण्यासाठी टीम इंडियाला ही सीरिज जिंकणे आवश्यक आहे. टीम इंडियानं यापूर्वी 2007 साली इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकली आहे. यावेळी भारतीय टीमला 14 वर्षांचा वनवास संपवण्याची संधी आहे, असं अनेक दिग्गजांचं मत आहे. भारतीय क्रिकेटपटू या सीरिजमध्ये इंग्लंडला पराभूत करण्याबरोबच अनेक रेकॉर्ड (Indian Players Records) करण्याच्या उंबरठ्यावर आहेत.

कोहली टाकणार पॉन्टिंगला मागं!

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीला (Virat Kohli) बॅट्समन म्हणून मागील दोन वर्ष फार चांगले गेलेले नाहीत. त्याच्या सेंच्युरीची प्रतीक्षा लांबली आहे. या सीरिजमध्ये कोहली ती प्रतीक्षा संपवण्याच्या प्रयत्नात आहे. कोहली त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये परतला तर ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पॉन्टिंगला (Ricky Ponting) तो मागे टाकू शकतो.

विराटनं कॅप्टन म्हणून आजवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 41 सेंच्युरी झळकावल्या असून तो सध्या रिकी पॉन्टिंगसह पहिल्या क्रमांकावर आहे. पॉन्टिंगनं 321 आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये ही कामगिरी केली आहे. विराटनं फक्त 201 मॅचमध्ये पॉन्टिंगच्या बरोबरीत आहे. त्यामुळे या सीरिजमध्ये आणखी एक सेंच्युरी केली तरी तो वर्ल्ड क्रिकेटमध्ये सर्वात जास्त सेंच्युरी करणारा कॅप्टन (Indian Players Records) होईल.

IND vs ENG: कुणाची आकडेवारी आहे सरस, विराट कोहली की जो रुट?

विराट कोहलीनं या सीरिजमध्ये 453 रन काढले तर टेस्टमध्ये 8 हजार रनचा टप्पा ओलांडणारा तो सहावा भारतीय बनेल. तर इंग्लंड विरुद्ध इंग्लंडमध्ये 1 हजार रन काढण्यासाठी आणखी 273 रनची आवश्यकता आहे. त्याचबरोबर इंग्लंड विरुद्ध 2000 रन करण्यासाठी विराटला आणखी 258 रनची आवश्यकता आहे. विराटनं हे रन केले तर हा टप्पा पार करणारा सुनील गावसकर आणि सचिन तेंडुलकर यांच्यानंतरचा तिसरा भारतीय बॅट्समन बनेल.

अश्विन आणि इशांत होणार नंबर 2

टीम इंडियाचा प्रमुख स्पिनर आर. अश्विन (R. Ashwin) याला हरभजन सिंग (Harbhajan Singh) पेक्षा जास्त विकेट्स घेण्यासाठी आणखी 5 विकेट्सची आवश्यकता आहे. हरभजन सिंगनं 103 टेस्टमध्ये 417 विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनच्या नावावर सध्या 79 टेस्टमध्ये 413 विकेट्स आहेत. अश्विननं हरभजनला मागं टाकल्यानंतर तो टेस्ट क्रिकेटमध्ये टीम इंडियाकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा नंबर 2 चा स्पिनर (Indian Players Records) बनेल.

अनुभवी फास्ट बॉलर इशांत शर्माला (Ishant Sharma) झहीर खानला (Zaheer Khan) मागं टाकण्यासाठी आणखी 6 विकेट्सची आवश्यकता आहे. झहीरनं त्याच्या कारकिर्दीमध्ये 92 टेस्टमध्ये 311 विकेट्स घेतल्या होत्या. इशांतनं सध्या 102 टेस्टमध्ये 306 विकेट्स घेतल्या आहेत. इशांतनं झहीरला मागं टाकल्यानंतर तो टेस्ट क्रिकेटमध्ये टीम इंडियाकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा नंबर 2 चा फास्ट बॉलर बनेल.

शमी, बुमराहलाही संधी

मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah) या फास्ट बॉलर्सनाही त्यांच्या कारकिर्दीमधील एक टप्पा (Indian Players Records) पूर्ण करण्याची या दौऱ्यात संधी आहे. शमीला 200 टेस्ट विकेट्स घेण्यासाठी आणखी 16 तर बुमराहला 100 टेस्ट विकेट्स घेण्यासाठी आणखी 17 विकेट्सची आवश्यकता आहे.

इंग्लंड दौऱ्याचे वेळापत्रक

टेस्ट क्रमांककालावधीठिकाण
14 ते 8 ऑगस्टनॉटींगहम
212 ते 16 ऑगस्टलॉर्ड्स
325 ते 29 ऑगस्टलीड्स
42 ते 6 सप्टेंबरओव्हल
510 ते 14 सप्टेंबरमँचेस्टर

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: