
नॉटिंघम टेस्टच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडिया चांगल्या स्थितीमध्ये होती. चार सेशनच्या खेळात भारतीय टीमचं वर्चस्व होते. आदल्या दिवशी भारतीय फास्ट बॉलर्सनी यजमान टीमला 183 रनमध्ये गुंडाळले होते. रोहित शर्मा आणि केएल राहुल (Rohit Sharma & KL Rahul) या ओपनिंग जोडीनं दुसऱ्या दिवशी सकाळचं आव्हानात्मक सेशन खेळून काढलं. त्यांनी 97 रनची पार्टनरशिप केली. त्यामुळे भारतीय टीम मोठी आघाडी घेण्यासाठी सज्ज झाली होती. त्यानंतर अचानक परिस्थिती बदलली. टीम इंडियाच्या सर्वात मोठ्या डोकेदुखीनं (Team India Problem) डोकं वर काढलं.
सर्वात मोठी डोकेदुखी
रोहित-राहुल यांची जमलेली जोडी रोहित शर्मा आऊट झाल्यानं तुटली. त्यानंतर इंग्लंडनं मॅचमध्ये कमबॅक केले. दुसऱ्या दिवशी पावसामुळे खेळ थांबला त्यावेळी इंग्लंडचं वर्चस्व होतं. जेम्स अँडरसन (James Anderson) आणि ओली रॉबिन्सन (Ollie Robinson) या फास्ट बॉलर्सचा अचूक मारा याला कारणीभूत होताच. त्याचबरोबर चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara), विराट कोहली (Virat Kohli) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) या टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरनं केलेली निराशा टीम इंडियासाठी काळजीचा विषय आहे.
पुजारा-विराट-अजिंक्य हे त्रिकूट टीम इंडियाच्या बॅटींग ऑर्डरचा कणा आहे. देशात भरपूर रन काढणे किंवा विदेशात मॅच जिंकणे या गोष्टी भारतीय टीमच्या यशातील मुख्य घटक आहेत. या तिघांच्या जोरावरच भारतीय बॅटींग ऑर्डर ही जगातील सर्वात शक्तीशाली बॅटींग ऑर्डर मानली जाते. मात्र 2020 पासून विशेषत: विदेशात ही परिस्थिती बदलत (Team India Problem) आहे.
आकडेवारी काय सांगते?
पुजारा-विराट-अजिंक्य या जोडीनं एकत्र खेळलेल्या 15 इनिंगमध्ये त्यांना लौकिकानुसार खेळ करण्यात अपयश आलं आहे. भारतीय कॅप्टनची मागील 15 इनिंगमधील सरासरी ही 23 आहे. टीम इंडियाची वॉल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेतेश्वर पुजारानं 25.28 च्या सरासरीनं रन काढले आहेत. अजिंक्य रहाणेची सरासरी या दोघांपेक्षा किंचित जास्त म्हणजे 27 आहे.
या तिघांची गेल्या 15 इनिंगमधील एकूण सरासरी देखील काळजीचा विषय आहे. जागतिक क्रिकेटमधील नंबर 1 बॅट्समन असलेल्या विराटची सरासरी ही 23 आहे. तर पुजारा आणि राहणे यांची सरासरी 20.2 आणि 20.93 इतकी (Team India Problem) घसरलीय.
‘टीम इंडियाला इंग्लंडमध्ये जिंकण्यासाठी बॅट्समनची कामगिरी निर्णायक ठरणार’
पुजारा-रहाणेचं प्रेशर, विराटवर भार!
चेतेश्वर पुजाराचा भारतीय टेस्ट टीममधील रोल हा एक बाजू भक्कम लावून धरणे आणि बॉल जास्तीत जास्त ब्लॉक करत प्रतिस्पर्धी बॉलर्सना दमवणे हा आहे. त्याच्या याच शैलीवर त्यानं रन काढले आहे. गेल्या दोन वर्षात त्याच्या बॅटमधील रन आटलेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलनंतर विराटनं उघडपणे रन न काढण्याच्या पद्धीतवर टीका केल्यानं पुजाराचं टेन्शन वाढलं आहे.
नॉटिंघम टेस्टमध्ये पुजारानं काही एकेरी धावा धोका पत्कारुन खेळल्या. त्यानं एरवी जे बॉल सहज सोडले असते त्या बॉलवरही त्यानं मारण्याचा प्रयत्न केला. ओली रॉबिन्सनच्या अशाच एका बॉलवर तो DRS मुळे वाचला. टीम इंडियाचा नंबर 3 चा बॅट्समन ज्या भक्कम तंत्र आणि निग्रहासाठी ओळखला जातो. ती गोष्ट नॉटिंघम टेस्टमधील पहिल्या इनिंगमध्ये दिसली नाही.
अजिंक्य रहाणे तर टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा व्हाईस कॅप्टन आहे. तो मैदानात उतल्यापासून टेन्शनमध्ये होता. त्यामध्ये तो काही वेळा रन आऊट होताना वाचला. आणि अखेर 5 रनवर असताना एक रन काढण्याच्या प्रयत्नात रन आऊट झाला. रन निघत नसल्यानं गमालेल्या आत्मविश्वासामुळेच अजिंक्यकडून या चुका (Team India Problem) झाल्या.
पुजारा आणि अजिंक्यची साथ मिळत नसल्यानं विराटवरील भार वाढला आहे. त्यातच टीम इंडियाच्या कॅप्टनची सेंच्युरीची प्रतीक्षा ही लांबत चालली आहे. मिडल ऑर्डरमधील दोन्ही सहकारी फॉर्मात नसल्यानं विराट देखील सध्या अधिक बचावात्मक खेळण्याचा प्रयत्न करतोय याचा परिणाम त्याच्या खेळावर झाला आहे.
अन्य खेळाडूंवर अन्याय
पुजारा-विराट आणि अजिंक्य हे त्रिकूट फॉर्मात नसल्यानं टीम इंडियाच्या अन्य खेळाडूंवर अपेक्षांचं ओझं वाढलं आहे. हे तिघं फ्लॉप होत असल्यानं पंत, जडेजा, अश्विन आणि सुंदर यांच्यावर सातत्यानं टीमला अडचणीतून बाहेर काढण्याची जबाबदारी आली आहे.
नॉटिंघम टेस्टमध्ये याच कारणामुळे बॅटिंगची खोली वाढवण्यासाठी जडेजा आणि शार्दुल ठाकूर यांचा टीममध्ये समावेश करण्यात आला. त्यामुळे टीम इंडियाचा टेस्टमधील सर्वात यशस्वी बॉलर असलेल्या आर. अश्विनला बाहेर बसावं लागलं. आगामी काळात देखील टीम इंडियाला हीच पद्धत वापरावी लागण्याची शक्यता आहे.
WTC Final 2021 : टीम इंडियाच्या पराभवाची 5 मुख्य कारणं
नॉटिंघमध्ये जडेजानं तळाच्या बॅट्समनच्या मदतीनं टीम इंडियाला चांगली आघाडी मिळवून दिली. पण, हे नेहमी होईल याची खात्री नाही. टीम इंडियाची ही सर्वात मोठी डोकेदुखी (Team India Problem) दूर झाली नाही तर इंग्लंडमध्ये सीरिज जिंकण्याचं स्वप्न आणखी लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.