फोटो – ट्विटर

भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात लॉर्ड्सवर सुरु असलेल्या टेस्टमध्ये टीम इंडियाच्या अनपेक्षित जोडीनं प्रतिकार केल्यानं इंग्लंडची टीम बिथरली. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद शमी (Mohammed Shami) या जोडीनं इंग्लिश माऱ्याचा खरपूस समाचार घेतल्यानं इंग्लंडच्या खेळाडूंचा संयम संपला. त्यांनी बुमराहला डिवचले. बुमराहनही त्यांना मैदानात उत्तर (Bumrah vs England) दिले. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

काय घडले प्रकरण?

टीम इंडियाच्या दुसऱ्या इनिंगमधील 92 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. त्यापूर्वी ऋषभ पंत आणि इशांत शर्मा आऊट झाल्यानं इंग्लंडचे बॉलर्स जोरात होते. टीम इंडियाला झटपट गुंडाळण्याच्या त्यांच्या स्वप्नांना बुमराह-शमी जोडीनं सुरुंग लावण्यास सुरुवात केली. शमीनं काही आक्रमक शॉट्स लगावले. भारताची आघाडी वाढू लागताच इंग्लंडच्या खेळाडूंचा संयम संपण्यास सुरुवात झाली.

मार्क वूडच्या ओव्हरमधील पहिल्या बॉलनंतर बुमराह आणि जोस बटलर (Jos Buttler) यांच्यात वादाची ठिणगी पेटली. ‘मी कुणालाही स्लो बॉल टाकण्यास सांगितलं नाही,’ हे बुमराहचे शब्द कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले. जेम्स अँडरसनला (James Anderson) तिसऱ्या दिवशी काही बाऊन्सर बुमराहनं टाकले होते. तो प्रकार इंग्लंडच्या खेळाडूंना आवडला नसल्याचं त्यांनी पाचव्या दिवशी दाखवून दिले.

मैदानातील अंपायरनं हा प्रकार थांबवला. त्यानंतर बुमराहनं मार्क वूडच्या त्या ओव्हरमध्ये फोर लगावत या प्रकारच्या स्लेजिंगमुळे (Bumrah vs England) आपण विचलित होणार नाही, हे दाखवून दिले. मैदानातील वादामुळे टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) देखील तापला होता.

बुमराह-शमीची कमाल

इंग्लंडच्या टीमनं घातलेल्या या वादानंतर बुमराह आणि शमी जोडीनं अधिक जिद्दीनं खेळ केला. या दोघांनी नवव्या विकेटसाठी 89 रनची नाबाद पार्टनरशिप केली. इंग्लंडमधील टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियानं नवव्या विकेटसाठी केलेली ही सर्वोच्च पार्टनरशिप आहे.

WTC फायनलमधील अपयशानंतर काय बदल केला? बुमराहनं सांगितलं यशाचं रहस्य

या दोघांमध्ये मोहम्मद शमी जास्त आक्रमक होता. त्याने 70 बॉलमध्ये 6 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीनं 56 रन काढले. शमीची ही टेस्ट क्रिकेटमधील दुसरी हाफ सेंच्युरी आहे. यापूर्वी त्यानं 2014 साली इंग्लंड विरुद्धच नॉटिंघममध्ये नाबाद 51 रनची खेळी केली होती. तो स्कोअर शमीनं पार केला. बुमराहनं 64 बॉलमध्ये नाबाद 34 रन काढले. हा त्याचा टेस्ट क्रिकेटमधील सर्वोच्च स्कोअर आहे. बुमराहनं यापूर्वीच्या टेस्टमध्ये 28 रन काढले होते. त्यानं (Bumrah vs England) तो रेकॉर्ड मोडला. शमी-बुमराह जोडी नाबाद परतल्यानं त्यांनी इंग्लंडच्या टीमविरुद्धची ही चकमक जिंकली. तसंच लॉर्ड्स टेस्टमध्ये टीम इंडियाचा पराभव होणार नाही, हे देखील निश्चित केले.  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: