फोटो – NDTV

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील दुसऱ्या टेस्टचा दुसरा दिवस बॉलर्सनी गाजवला. सुरुवातीला भारताच्या चार विकेट्स झटपट गेल्या. त्यानंतर इंग्लंडच्या बॅट्समनला 60 ओव्हरही पूर्ण खेळता आल्या नाहीत. इंग्लंडच्या पिचवर (England Pitch) शेर असणाऱ्या या टीमची अगदी पहिल्या ओव्हरपासून घसरगुंडी सुरु झाली. भारतीय उपखंडातील हवामानाचा अभ्यास करण्यासाठी या वर्षाच्या सुरुवातीपासून इंग्लंडचा मुक्काम उपखंडात आहे. उपखंडातील पहिल्या तीन टेस्ट देखील त्यांनी जिंकल्या. रविवारी त्यांचा अभ्यास कमी पडला.

इंग्लंडची घसरगुंडी उडताच चेन्नईचं पिच कसं खराब आहे, हे सांगण्याचा ट्रेंड सुरु झाला. मायकल वॉन (Michael Vaughan) आणि मार्क वॉ (Mark Waugh) हे नेहमीचे यशस्वी खेळाडू आघाडीवर आहेत. भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनीही चेन्नईच्या पिचवर टीका केली होती.

आता आपण भारताच्या मागील दोन इंग्लंड दौऱ्यातील (India Tour Of England) चार टेस्ट मॅचचे रेकॉर्ड्स केस स्टडी म्हणून पाहूया

भारत विरुद्ध इंग्लंड – लॉर्ड्स 2018

क्रिकेट विश्वातील काशी, मक्का किंवा व्हॅटिकन (आपआपल्या सोयीनं हवं ते म्हणा) समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर (Lords Test). इंग्लंडनं टॉस जिंकून भारताला बॅटिंगचं निमंत्रण दिलं.

भारताची पहिली इनिंग फक्त 35.2 ओव्हर्समध्ये 107 रनवर आटोपली. भारताकडून आर. अश्विननं (R. Ashwin) सर्वात जास्त 29 रन काढले होते. इंग्लंडनं त्याला उत्तर देताना ख्रिस वोक्सच्या (Chris Wokes) सेंच्युरीच्या जोरावर 88.1  ओव्हर्समध्ये 7 आऊट 396 रन काढत इनिंग घोषित केली. भारताची दुसरी इनिंग (England Pitch) 47 ओव्हरमध्ये 130 रनवर आटोपली.

( वाचा : IND vs ENG : ‘या’ कारणामुळे दुसऱ्या टेस्टच्या पहिल्याच दिवशीच भारताचा विजय पक्का! )

इंग्लंडनं एक इनिंग आणि 159 रननं विजय मिळवला. लॉर्ड्सवरील ही टेस्ट 170.3 ओव्हर झाली.

भारत विरुद्ध इंग्लंड – ओल्ड ट्रॅफर्ड 2014

या टेस्टमध्ये भारतानं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग घेतली होती. भारताची पहिली इनिंग (England Pitch) 46.4 ओव्हर्समध्ये 152 रनवर आटोपली. महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) 71 रन काढत लढत देण्याचा प्रयत्न केला. त्याला आर. अश्विन (40)  वगळता एकानंही साथ दिली नाही.

इंग्लंडची पहिली इनिंग 105.3 ओव्हरमध्ये 367 रनवर आटोपली. भारताची दुसरी इनिंग 43 ओव्हरमध्ये 161 वर संपुष्टात आली. इंग्लंडनं ओल्ड ट्रॅफर्ड टेस्ट (Old Trafford Test) एक इनिंग आणि 54 रननं जिंकली. ही टेस्ट एकूण 195.1 ओव्हर झाली.

भारत विरुद्ध इंग्लंड – ओव्हल 2014

ओल्ड ट्रॅफर्डनंतरची पुढचीच टेस्ट. इंग्लंडनं टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. भारताची पहिली इनिंग 61.1 ओव्हरमध्ये 148 वर आटोपली. भारताकडून महेंद्रसिंह धोनीनं सर्वात जास्त 82 रन केले.

( वाचा : IND vs ENG: कुणाची आकडेवारी आहे सरस, विराट कोहली की जो रुट? )

इंग्लंडनं पहिल्या इनिंगमध्ये जो रुटच्या (Joe Root) शतकाच्या जोरावर 116.3 ओव्हरमध्ये 486 रन केले. भारताची दुसरी इनिंग तर फक्त 29.2 ओव्हरमध्ये 94 रनवर आटोपली. ओव्हलवर (Oval Test) झालेली ही टेस्ट इंग्लंडनं एक इनिंग आणि 244 रननं जिंकली. ओव्हलवरची ही टेस्ट 207 ओव्हर झाली.

भारत विरुद्ध इंग्लंड – एजबस्टन 2018

भारताच्या मागील इंग्लंड दौऱ्यातील पहिली टेस्ट. ठिकाण एजबस्टन (Edgbaston Test). इंग्लंडनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग घेतली. इंग्लंडची पहिली इनिंग 89.4 ओव्हरमध्ये 287 रनवर आटोपली. भारताची पहिली इनिंग 76 ओव्हर आणि 274 रन इतकीच टिकली.

इंग्लंडची दुसरी इनिंग 53 ओव्हरमध्ये 180 वर संपुष्टात आली. भारताला चौथ्या इनिंगमध्ये मॅच जिंकण्यासाठी 194 रनचं टार्गेट होतं. टीम इंडिया 54.2 ओव्हरमध्ये 162 पर्यंतच जाऊ शकली. ही टेस्ट इंग्लंडनं 31 रननं जिंकली. एजबस्टन टेस्ट 273 ओव्हर चालली.

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात इंग्लंडध्ये झालेल्या (England Pitch) या चार टेस्ट आहेत. चारही टेस्ट इंग्लंडनं जिंकलेल्या आहेत. टेस्टमध्ये एका दिवशी 90 ओव्हर्सचा खेळ अपेक्षित असतो. त्या हिशेबाने 5 दिवसामध्ये 450 ओव्हर्स होतात. यापैकी एकही टेस्ट 275 ओव्हर्सही चालली नाही. विशेष म्हणजे हा इंग्लंडमधील फक्त एकाच पिचचा रेकॉर्ड नाही तर जगभर सतत नावाजल्या चाणाऱ्या चार वेगळ्या पिचचा रेकॉर्ड आहे.

( वाचा : IND vs ENG : T20 सीरिजसाठी इंग्लंडची टीम जाहीर, फॉर्मातील खेळाडूकडं पुन्हा दुर्लक्ष )

या टेस्टसाठी बनवलेले पिच खराब होते. त्यांचा दर्जा टेस्ट मॅच क्रिकेटसाठी चांगला नव्हता. या प्रकारची लंगडी कारणं इंग्लंड-ऑस्ट्रेलियाच्या सोडा भारताच्याही कोणत्या माजी क्रिकेटपटूनं दिली नाहीत. जी टीम त्या टेस्टमध्ये चांगली खेळली ती जिंकली असा सरळ साधा हिशेब होता.

इंग्लंडनंही ‘खेळता येईना पिच वाकडे’ संस्कृतीचा त्याग करुन भारतामध्ये चांगला खेळ केला तरच ते इथं टेस्ट जिंकू शकतात. इंग्लंडप्रमाणेच भारतात क्रिकेट खेळण्यासाठी येणाऱ्या सर्व गोऱ्या टीमला हा नियम लागू आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.error: