फोटो – BCCI

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये ऐतिहासिक विजय मिळवून टीम इंडिया (Team India) भारतामध्ये परतली. या सीरिजनंतर झालेल्या पहिल्याच टेस्टमध्ये भारतीय टीमनं फॅन्सना जमिनीवर आणलं. इंग्लंड विरुद्ध झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा 227 रन्सनं दणदणीत पराभव झाला. ऑस्ट्रेलियातील विजयी अभियानात अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) कॅप्टन होता. तर चेन्नईतील पहिल्या टेस्टमध्ये विराट कोहलीनं (Virat Kohli) नेतृत्त्व केलं. त्यामुळे आता साहजिकच अनेक फॅन्सच्या मनात अजिंक्य आणि विराटच्या कॅप्टनसीची तुलना सुरु झाली आहे. दुसऱ्या टेस्टपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत अजिंक्यनं विराटच्या कॅप्टनसीवर (Ajinkya on Virat) त्याचं मत व्यक्त केलं आहे.

काय म्हणाला अजिंक्य?

अजिंक्य रहाणेला या पत्रकार परिषदेत अनेक प्रश्न विचारण्यात आले. पहिल्या टेस्टमधील पराभवानंतर विराटनं भारतीय प्लेयर्सच्या शारीरिक भाषेबद्दल मत व्यक्त केलं होतं. त्यावरही अजिंक्यला एक प्रश्न विचारण्यात आला.

( वाचा : IND vs ENG : ‘या’ कारणांमुळे झाला टीम इंडियाचा चेन्नई टेस्टमध्ये मोठा पराभव! )

या प्रश्नाला उत्तर देताना अजिंक्य म्हणाला, “तुम्ही प्रत्येक वेळी एकाच प्रकारच्या एनर्जीनं मैदानात उतराल हे शक्य नसतं. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये अनेकदा भारतीय खेळाडूंमध्ये एनर्जी कमी जाणवली. हे विराट कोहलीच्या पुनरागमनामुळे झालं नाही. अनेकदा आम्हाला मैदानावर एनर्जी कमी जाणवते. विराट कोहली हा आमचा कॅप्टन आहे. तोच कॅप्टन असेल. तुम्हाला इथं काहीही मसाला मिळणार नाही.’’ (Ajinkya on Virat) असं ठाम उत्तर अजिंक्यनं दिलं.

विराटनं केली होती टीका

पहिल्या टेस्टमध्ये झालेल्या मोठ्या पराभवानंतर विराटनं भारतीय खेळाडूंच्या शारीरिक भाषेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. टीममधील खेळाडूंचा अप्रोच आणि शारीरिक भाषा नीट नव्हती, असं मत विराटनं व्यक्त केलं होतं.

( वाचा : IND vs ENG: कुणाची आकडेवारी आहे सरस, विराट कोहली की जो रुट? )

खराब फॉर्मवर काय म्हणाला अजिंक्य?

अजिंक्य रहाणेला त्याच्या खराब फॉर्मबद्दलही यावेळी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर “आम्ही घरच्या मैदानावर दोन वर्षांनी खेळत आहोत. हा संपूर्ण टीमचा प्रश्न आहे, कोणत्याही एका खेळाडूचा नाही. तुम्ही माझ्या मागील 10-15 टेस्ट मॅचचा रेकॉर्ड पाहिला तर मी रन काढले आहेत, हे तुमच्या लक्षात येईल’ असं उत्तर अजिंक्यनं दिलं.

आकडे काय सांगतात?

अजिंक्य रहाणेनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न टेस्टमध्ये (Melbourne Test) 112 रन्सची खेळी केली होती. अजिंक्यच्या सेंच्युरीचा टीम इंडियाच्या विजयात मोलाचा वाटा होता. मात्र त्यानंतर तो सतत फेल होत आहे.

( वाचा : IND vs AUS: रहाणेच्या सेंच्युरीमुळे टीम इंडिया मेलबर्न टेस्टच्या दुसऱ्या दिवशी ‘अजिंक्य’ )

मागील तीन टेस्टमधील सहा इनिंगमध्ये अजिंक्यनं 4, 22, 24, 37, 1 आणि 0 असे रन केले आहेत. या खराब फॉर्ममुळे सध्या अजिंक्यवर टीका होत आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading