
भारताविरुद्ध होणाऱ्या पाच T20 मॅचच्या सीरिजसाठी इंग्लंडची टीम (England T20 Team) जाहीर झाली आहे. 16 सदस्यांच्या इंग्लंडच्या टीमचा कॅप्टन इऑन मॉर्गन (Eoin Morgan) असेल. तर या टीममध्ये ऑल राऊंडर बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि फास्ट बॉलर जोफ्रा आर्चर (Jofra Archer) यांचा समावेश करण्यात आला आहे. श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सीरिजमध्ये त्यांना विश्रांती देण्यात आली होती. जोस बटलर (Jos Buttler) आणि जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) यांचाही टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. बटलरला भारताविरुद्ध झालेल्या पहिल्या टेस्टनंतर विश्रांती देण्यात आली आहे. तर बेअरस्टोचा भारताविरुद्धच्या पहिल्या दोन टेस्टमध्ये समावेश करण्यात आलेला नाही.
फॉर्मातील खेळाडूकडं दुर्लक्ष
इंग्लंडच्या 16 सदस्यांच्या भक्कम टीममध्ये (England T20 Team) सध्या फॉर्मात असलेला ओपनर अॅलेक्स हेल्सकडं (Alex Hales) पुन्हा एकदा दुर्लक्ष करण्यात आलं आहे.ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या बिग बॅश लीग स्पर्धेत हेल्सनं सिंडनी थंडरकडून खेळताना सर्वात जास्त 543 रन केले आहेत. ज्यामध्ये 51 बॉलमध्ये काढलेल्या एका सेंच्युरीचाही समावेश आहे. तसंच बिग बॅश लीगमध्ये सर्वात जास्त सिक्स मारण्याचा रेकॉर्डही यंदा हेल्सनं नोंदवला आहे. हेल्सकडं पुन्हा एकदा दुर्लक्ष करत इंग्लंडच्या निवड समितीनं त्याच्यावरचा राग कायम असल्याचं दाखवून दिलं आहे.
चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) ऑल राऊंडर सॅम करनचाही टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. करनला IPL नंतर विश्रांती देण्यात आली होती. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमधील सध्या नंबर 1 बॅट्समन डेव्हिड मलानही पहिल्यांदाच भारतामध्ये आंतरराष्ट्रीय T20 मॅच खेळणार आहे.
भारत दौऱ्यासाठी निवड आलेली टीम 26 फेब्रुवारी रोजी रवाना होणार असल्याची माहिती इंग्लड क्रिकेट बोर्डानं (ECB) दिली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच T20 मॅचची सीरिज 12 ते 20 मार्चच्या दरम्यान अहमदाबादमध्ये खेळवली जाणार आहे.
इंग्लंडची टीम
इऑन मॉर्गन (कॅप्टन), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, टॉम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिविंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल रशिद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रेईस टॉप्ले आणि मार्क वूड
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.
You must be logged in to post a comment.