इंग्लंडचा ओपनर जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) याच्या 124 रनच्या जोरावर इंग्लंडनं तीन मॅचच्या वन-डे सीरिजमध्ये 1-1 अशी बरोबरी साधली आहे. भारताच्या 337 रनचा पाठलाग करताना बेअरस्टोनं 112 बॉलमध्ये 11 फोर आणि 7 सिक्सच्या मदतीनं 124 रन काढले. त्याचबरोबर बेन स्टोक्स (Ben Stokes) सोबत 175 रनची आक्रमक पार्टरनरशिप देखील केली. या खेळीनंतर बेअरस्टोनं टीम इंडियाचे माजी कॅप्टन सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांच्या टीकेला उत्तर (Bairstow on Gavaskar) दिलं आहे.  

काय म्हणाले होते गावस्कर?

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टेस्ट सीरिजमध्ये बेअरस्टो शेवटच्या दोन टेस्ट खेळला. या टेस्टमध्ये त्याने 0,0,28, आणि 0 असे एकूण 28 रन काढले होते. चारपैकी तीन इनिंगमध्ये त्याला भोपळा फोडण्यातही अपयश आले होते. त्याच्या या खराब कामगिरीवर सुनील गावस्कर यांनी टीका केली होती. ‘बेअरस्टोला टेस्ट क्रिकेटमध्ये रस नाही’, अशी टीका गावस्कर यांनी केली होती.

कपडे बदलले, फॉर्म परतला

क्रिकेटमधील फॉरमॅट बदलला. पांढरे कपडे जाऊन रंगीत कपडे आले आणि बेअरस्टोची गाडी पुन्हा रुळावर आली. त्याने पाच मॅचच्या T20 सीरिजमध्ये चौथ्या क्रमांकावर येत काही उपयुक्त खेळी केल्या होत्या.

वन-डे मालिकेत तर बेअरस्टो ओपनिंग करत आहे. पहिल्या वन-डेमध्ये त्याची सेंच्युरी फक्त 6 रननं हुकली होती. तर दुसऱ्या मॅचमध्ये लगेच त्याने ती कसर भरुन काढत 124 रन काढले. या सीरिजमध्ये सर्वात जास्त रन बेअरस्टोच्याच नावावर आहेत. विशेष म्हणजे दुसऱ्या वन-डेमध्ये त्याच्या शतकामुळेच इंग्लंडला मॅच जिंकता आली.  

( वाचा : निवड समितीचा रुटला नाही तर मॉर्गनला पाठिंबा, इंग्लंडच्या माजी कॅप्टनचा दावा )

फॉर्म परतला, बेअरस्टो बोलला

बेअरस्टोनं फॉर्ममध्ये परतताच गावस्कर यांच्या टीकेला उत्तर (Bairstow on Gavaskar) दिलं आहे. ‘एखादी व्यक्ती माझ्याशी न बोलता, माझ्यासोबत संपर्क न साधता असं मत कसं बनवू शकते, हे जाणून घ्यायला मला आवडेल. कारण, माझ्यात आणि त्यांच्यामध्ये आजपर्यंत कधीही बोलणे झालेले नाही,’ असे बेअरस्टोनं स्पष्ट केले.

बेअरस्टो इतक्यावरच थांबला नाही तर, ‘ते (गावस्कर) मला कधीही फोन करु शकतात. त्यांचं स्वागत आहे. टेस्ट क्रिकेट चांगलं करण्यासाठी मला त्यांच्याशी चर्चा करायला आवडेल. माझा फोन सुरु आहे.इच्छा असेल तर ते मला फोन करु शकतात, किंवा मेसेजही करु शकतात,’ असे बेअरस्टोने स्पष्ट केले आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: