फोटो – ट्विटर/@toisports

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील तिसरी टेस्ट संपून आता चार दिवस उलटले आहेत. दोन दिवसांमध्ये संपलेल्या या टेस्टच्या शॉकमधून अनेक माजी क्रिकेटपटू अजून बाहेर पडलेले नाहीत. मायकल वॉन, डेव्हिड लॉईड, अ‍ॅलेस्टर कुक आणि शोएब अख्तर यांनी या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम (Narendra Modi Stadium) पिचला नावं ठेवली आहेत. त्याचवेळी इंग्लंडचा फास्ट बॉल जोफ्रा आर्चर (Jofra Archer on Pitch)  याने मात्र या मुद्यावर इंग्लंडला घरचा आहेर दिला आहे.

काय म्हणाला जोफ्रा?

भारताच्या बाहेरचे क्रिकेटपटू आराडओरड करत असले तरी जो रुटच्या (Joe Root) इंग्लंड टीममधील एकाही खेळाडूनं या पिचवर जाहीर नाराजी व्यक्त केलेली नाही. इंग्लंडचा स्पिनर जॅक लीच (Jack Leach) नंतर आता जोफ्रा आर्चरनंही पिच हा मुख्य मुद्दा नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

‘कोणत्या पिचवर (Jofra Archer on Pitch) खेळ होतो हे माझ्यासाठी फार महत्त्वाचे नाही. माझ्या आयुष्यात एक खराब वाय-फाय (Wi -Fi) वगळता एकही नावं ठेवायला जागा नाही.’ असे जोफ्रा आर्चरनं सांगितलं आहे. त्याचबरोबर आपण इंग्लिश कौंटी खेळलो त्यावेळी तेथील दोन मॅच देखील दोन दिवसांमध्येच संपल्या होत्या. त्यामुळे इंग्लंडमध्येही मॅच झटपट संपतात याची आठवण देखील जोफ्रानं करुन दिली आहे.  

( वाचा : खेळता येईना पिच वाकडे : चेन्नईला नावं ठेवण्यापूर्वी जरा ‘या’ महान पिचवरील रेकॉर्ड्सही पाहा )

जो रुटनं दिला सल्ला

इंग्लंडचा कॅप्टन जो रुटनं सहकाऱ्यांना दिलेला सल्ला देखील जोफ्रानं यावेळी सांगितला. ‘आम्ही भारतामध्ये आहोत त्यामुळे इथं बॉल स्पिन होणार याची अपेक्षा ठेवली पाहिजे. कॅप्टन रुटनं आम्हाला सांगितलं आहे, निर्भिडपणे खेळा. आता आपल्याकडं हरण्यासारखं काहीही नाही.’ तिसऱ्या टेस्टसमध्ये 10 विकेट्सनं पराभूत झाल्यानं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप (World Test Championship) मधून इंग्लंडचं आव्हान संपुष्टात आलं आहे.

इंग्लंडला वचपा काढण्यासाठी संधी

इंग्लंडला मागील दोन टेस्टमधील मोठ्या पराभवाचा वचपा काढण्याची मोठी संधी चौथ्या टेस्टमध्ये आहे. भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल गाठण्यासाठी ही मॅच कोणत्याही परिस्थितीमध्ये हरुन चालणार नाही. त्यामुळे जर इंग्लंडनं चौथी टेस्ट जिंकली तर भारतही इंग्लंडप्रमाणे या स्पर्धेतून बाहेर जाईल आणि न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही फायनल मॅच लॉर्ड्सवर होईल.

( वाचा : IND vs ENG : वेलकम टू इंडिया (फायनली) इंग्लंड! )

चार टेस्टच्या या सीरिजमध्ये भारताकडं सध्या 2-1 अशी आघाडी आहे. चौथी आणि शेवटची टेस्ट मॅच गुरुवारपासून (4 मार्च 2021) अहमदाबादमध्येच सुरु होणार आहे.  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: