फोटो – ट्विटर/ICC

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील दुसऱ्या टेस्टला प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये सुरुवात झाली. कोरोना व्हायरसच्या सावटाखाली गेले कित्येक महिने भारतामध्ये क्रिकेट फॅन्सना स्टेडियममध्ये परवानगी नव्हती. प्रेक्षकांच्या पुनरागमानाचा पहिला दिवस रोहित शर्मानं (Rohit Sharma) गाजवला. रोहितच्या 161 रन्सच्या (Rohit 161) जोरावर भारतानं पहिल्या दिवसाखेर 6 आऊट 300 रन केले. चेन्नईच्या फिरत्या पिचवर हा उपयुक्त स्कोअर आहे.

भारतावर दडपण

पहिली टेस्ट 227 रननं गमावल्यानं टीम इंडिया या मालिकेत पिछाडीवर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची (World Test Championship) फायनल गाठण्यासाठी टीम इंडियाला आता उर्वरित तीन टेस्टमधील एकही टेस्ट गमावून चालणार नाही.

टीम इंडियानं बऱ्याच दिवसांनी घरच्या मैदानावरील टेस्ट मॅच बॅकफुटवर सुरु केली. रोहित शर्मानं मागील आठ टेस्टमध्ये मोठी खेळी केली नव्हती. लंचपूर्वी त्याचे तीन साथीदार आऊट झाले. चेन्नईचं पिच पहिल्या दिवसापासून स्पिनला साथ देत होतं. मोईन अलीनं त्याच्या कारकीर्दीमधील सर्वोत्तम बॉल टाकत विराट कोहलीला (Virat Kohli) शून्यावर आऊट करत भारताला मोठा धक्का दिला होता.

सेहवागचा शिष्य रोहित

रोहित शर्मावर याचा काहीही परिणाम झाला नाही. तो दुसऱ्या बाजूनं अगदी वीरेंद्र सेहवागच्या (Virendra Sehwag) स्टाईलनं खेळत होता. त्यानं सेहवाग प्रमाणे दिवसाचा अजेंडा सेट केला. सेहवाग प्रमाणेच रोहितला देखील ओपनिंगला पाठवण्याचा निर्णय हा आता यशस्वी झाला आहे. तो खेळतो तो दिवस फक्त रोहितचा असतो. शनिवारचा दिवस देखील रोहितचा होता.

( वाचा : जेंव्हा, वीरेंद्र सेहवागच्या आक्रमक प्रतिहल्ल्यानंतर भारतानं चेन्नई टेस्ट जिंकली होती! )

शुभमन गिल (Shubhman Gill) शून्यावर आऊट झाल्यानंतर रोहित कोषात गेला नाही. त्यानं चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) सोबत चारच्या सरासरीनं भागीदारी केली. रोहित – पुजाराच्या 85 रनच्या पार्टरनरशिपनं टीम इंडियाचा टेंपो सेट केला.

पुजारा आणि त्यानंतर लगेच कोहली आऊट झाल्यानंतरही रोहित थांबला नाही. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) सोबत त्याची जोडी जमली. रोहित-अजिंक्य या मुंबईकर जोडीनं निर्णायक क्षणी टीम इंडियाला सावरणारी पार्टरनरशिप केली. रोहितनं 130 बॉलमध्ये त्याची सातवी टेस्ट सेंच्युरी पूर्ण केली. त्याच्या सर्व सातही टेस्ट सेंच्युरी या घरच्या मैदानावर आहेत.

सेंच्युरीनंतर रोहितचा खेळ हा नेहमीच बहरतो. तसा तो शनिवारी चेन्नईतही बहरला. चेन्नईच्या उष्ण हवामानात मॅच पाहण्यासाठी गर्दी केलेल्या भारतीय फॅन्सना रोहितच्या बॅटींगनं दिलासा मिळाला. भारताचा स्कोअर 248 असताना रोहित शर्मा आऊट झाला. त्यामधील दोन तृतीयांश म्हणजे 161 रन (Rohit 161) रोहितनं केले होते.

( वाचा : Explained: रोहित शर्माच्या एन्ट्रीचा टीम इंडियाला कसा होणार फायदा? )

रोहितनंतर दिवस संपण्यापूर्वी अजिंक्य रहाणे आणि आर. अश्विन या आणखी दोन विकेट्स भारतानं गमावल्या आहेत. दिवसाच्या अखेरीस ऋषभ पंत 33 तर पहिल्यांदाच टेस्टमध्ये खेळणारा अक्षर पटेल 5 रन काढून नाबाद आहेत. चांगली बॅटींग करु शकणारी भारताची ही शेवटची जोडी दुसऱ्या दिवशी किती रन काढते त्यावर भारताचा या इनिंगमधील स्कोअर नक्की होणार आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading