फोटो – ट्विवट /BCCI

भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील तिसऱ्या आणि शेवटच्या वन-डेमध्ये एका खास रेकॉर्डची नोंद झाली आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) या भारताच्या ओपनिंग जोडीनं हा रेकॉर्ड केला आहे. या वन-डे मध्ये रोहित-शिखर (Rohit-Shikhar) जोडीनं पहिल्या विकेटसाठी 103 रनची पार्टनरशिप केली. या जोडीनं पहिल्या विकेटसाठी शतकी पार्टनरशिप करण्याची ही 17 वी वेळ असून या गटामध्ये ही जोडी आता दुसऱ्या क्रमांकावर पोहचली आहे.

कुणाचा रेकॉर्ड मोडला?

रोहित-शिखर जोडीनं (Rohit -Shikhar) ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅडम गिलख्रिस्ट (Adam Gilchrist) आणि मॅथ्यू हेडन (Matthew Hayden) या दिग्गज जोडीचा रेकॉर्ड मोडला आहे. या जोडीनं वन-डे क्रिकेटमध्ये 16 वेळा पहिल्या विकेटसाठी 100 किंवा त्यापेक्षा जास्त रनची पार्टनरशिप केली होती.

पहिल्या विकेटसाठी शतकी पार्टनरशिप

जोडीशतकी पार्टनरशिप
सचिन-गांगुली21
रोहित-धवन17
गिलख्रिस्ट – हेडन16
हेन्स – ग्रिनीच15

पहिल्या विकेटसाठी सर्वात जास्त वेळा शतकी पार्टनरशिप करण्याचा रेकॉर्ड हा सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्या नावावर आहे. भारताच्या दोन माजी कॅप्टनच्या या जोडीनं वन-डे क्रिकेटमध्ये 21 वेळा शतकी पार्टनरशिप केली आहे. आता रोहित-धवन जोडी दुसऱ्या क्रमांकावर आहे. हेन्स-ग्रिनीज ही वेस्ट इंडिजची दिग्गज जोडी चौथ्या क्रमांकावर असून त्यांनी 15 वेळा ही कामगिरी केली आहे.

( वाचा : IND vs ENG : ‘सेंच्युरीनंतर दोन्ही कानात बोटं का घातली?’, केएल राहुलनं सांगितलं कारण… )

वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात जास्त शतकी पार्टनरशिप

वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात जास्त वेळा शतकी पार्टनरशिप करण्याच्या यादीत रोहित-धवन (Rohit – Dhwan) जोडी आता चौथ्या क्रमांकावर आहे. या यादीमध्ये देखील सचिन-गांगुली जोडी (21) नंबर 1 वर आहे. त्यानंतर दिलशान -संगकारा (20) आणि रोहित – कोहली (18) यांचा नंबर आहे. गिलख्रिस्ट-हेडन (16) ही जोडी पाचव्या क्रमांकावर आहे.

एकूण शतकी पार्टनरशिप

जोडीशतकी पार्टनरशिप
सचिन-गांगुली21
दिलशान-संगकारा20
रोहित-कोहली18
रोहित-धवन17
गिलख्रिस्ट – हेडन16

5 हजार रनची पार्टरनरशिप पूर्ण

रोहित-शिखर (Rohit-Shikhar) जोडीनं वन-डे क्रिकेटमध्ये 5 हजार रनची पार्टनरशिप देखील पूर्ण केली आहे. या जोडीनं 112 मॅचमध्ये 45.25 सरासरीनं 5023 रनची पार्टरनरशिप केली आहे. वन-डे क्रिकेटमध्ये पार्टरनरशिप करणाऱ्या बॅट्समनच्या यादीत ही जोडी सातव्या क्रमांकावर आहे.

पार्टनरशिपमधील एकूण रन

जोडीएकूण रन
सचिन-गांगुली8227
जयवर्धने-संगकारा5922
दिलशान – संगकारा5475
अट्टापट्टू-जयसूर्या5462
गिलख्रिस्ट – हेडन5409
हेन्स – ग्रिनिच5206
रोहित – धवन5023

या यादीमध्ये देखील सचिन-गांगुली (8227) पहिल्या क्रमांकावर असून त्यानंतर जयवर्धने-संगकारा (5992), दिलशान-संगकारा (5475), अट्टापट्टू – जयसूर्या (5462), गिलख्रिस्ट-हेडन (5409) आणि हेन्स- ग्रिनीच (5206) यांचा क्रमांक आहे.

टीप – ही सर्व आकडेवारी 28/3/2021 पर्यंतची आहे

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: