फोटो – ट्विटर

रोहित शर्माची (Rohit Sharma) आक्रमक बॅट्समन म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ओळख आहे. रोहितला फटकेबाजीचं नैसर्गिक वरदान आहे. ओपनिंगला येऊ लागल्यापासून तर रोहितनं सातत्याने रन केले आहेत. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये (India vs England Test Series) देखील रोहितनं त्याच्या बॅटींगमुळे टीम इंडियाला वाचवले. स्पिनला मदत करणाऱ्या खेळपट्टीवर चांगली बॅटींग केली. नुकत्यातच संपलेल्या वन-डे सीरिजमध्ये मात्र रोहितच्या नावावर एक आश्चर्यकारक रेकॉर्डची (Rohit Record) नोंद झाली आहे.       

हे पहिल्यांदाच घडलं

रोहित शर्मानं या वन-डे सीरिजमधील पहिल्या मॅचमध्ये 42 बॉलमध्ये 28 रन काढले. या खेळीत त्याला एकही सिक्स लगावता आला नाही. दुसऱ्या मॅचमध्ये पाच फोरच्या मदतीनं 25 रन काढले. पण त्याला पुन्हा एकदा सिक्स लगावण्यात अपयश आले. तिसऱ्या मॅचमध्ये रोहित सेट झाला आहे, असं वाटत असताना 37 रन काढून आऊट झाला. विशेष म्हणजे तिसऱ्या मॅचमध्येही त्याला सिक्स लगावण्यात अपयश आले.

या वन-डे मालिकेत 100 पेक्षा जास्त बॉल खेळून एकही सिक्स रोहितला मारता आला नाही. रोहित ओपनिंगला खेळू लागल्यापासून पहिल्यांदाच त्याला सिक्स मारण्यासाठी 100 पेक्षा जास्त बॉल खेळून अपयश आले आहे. रोहितच्या नावावर या आश्चर्यकारक रेकॉर्ड (Rohit Record) ची नोंद झाली आहे.

( वाचा : IND vs ENG : चेन्नईच्या फिरत्या पिचवर, रोहित शर्माच्या सेंच्युरीनं टीम इंडियाची आघाडी )

रोहितच्या तीन डबल सेंच्युरी

रोहित शर्मा हा वन-डे क्रिकेटमध्ये तीन डबल सेंच्युरी झळकावणारा एकमेव बॅट्समन ( Rohit Record) आहे. त्याने नोव्हेंबर 2013 मध्ये सर्वात प्रथम ऑस्ट्रेलियाविरुद्ध बंगळुरुत 209 रन काढले होते. त्यानंतर 2014 साली श्रीलंकेविरुद्ध कोलकातामध्ये 264 रन्सची विशाल खेळी केली. हा रोहित शर्माची वन-डे क्रिकेटमधील सर्वोच्च स्कोअर आहे. रोहितनं तिसरी डबल सेंच्युरी 2017 साली मोहालीमध्ये झळकावली. श्रीलंकेविरुद्धच्या त्या मॅचमध्ये रोहितनं नाबाद 208 रन काढले होते.

भारतानं सीरिज जिंकली

रोहितला या सीरिजमध्ये एकही सिक्स मारता आला नाही. पण सुदैवानं याचा टीम इंडियाच्या विजयावर काही प्रतिकूल परिणाम झाला नाही. तिसऱ्या मॅचमध्ये भारतानं इंग्लंडचा 7 रननं निसटता पराभव केला. इंग्लंडकडून सॅम करनने (Sam Curran) नाबाद 95 रनची खेळी करत एकाकी प्रतिकार केला. सॅमच्या या संघर्षामुळे शेवटपर्यंत तिसरी वन-डे रंगली. पण हार्दिक पांड्या आणि नटराजन यांनी शेवटच्या दोन ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग केल्यानं भारतानं अखेर मालिका 2-1 ने जिंकली.

( वाचा : IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्सच्या वाटचालीचा सविस्तर रिपोर्ट )

भारताने इंग्लंड विरुद्धची टेस्ट सीरिज 3-1, T20 सीरिज 3-2 ने जिंकली होती. त्यापाठोपाठ वन-डे सीरिज देखील 2-1 ने जिंकत तिन्ही सीरिजमध्ये इंग्लंडवर वर्चस्व गाजवले.  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: