फोटो – ट्विटर

सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) गेल्या काही वर्षांपासून आणि क्रिकेट फॅन्स गेल्या आयपीएलपासून (IPL 2020) ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला. सूर्यकुमार यादवला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बॅटींग करायला मिळाली. सूर्याला त्याच्या करियरमधील पहिल्या मॅचमध्ये बॅटींग करायला मिळाली नव्हती. त्यानंतरच्या मॅचमध्ये त्याला वगळण्यात आले. त्यानंतर त्याला पुन्हा संधी मिळाली आणि थेट विराट कोहलीच्या क्रमांकावर खेळायला मिळाले. तीन मॅचमध्ये तीन भिन्न क्षण अनुभवल्यानंतर सूर्याला बॅटींगची संधी मिळाली. सूर्याने देखील या सर्व शक्यतांचा पूर्वीच विचार केला असावा. कारण, तो ड्रेसिंग रुममधूनच सेट (Suryakumar Yadav Shine) होऊन आला होता.

पहिल्याच बॉलवर सिक्स

सूर्याला पहिलाच बॉल टाकण्यासाठी जोफ्रा आर्चर (Jofra Archer) होता. आर्चर हा एक हुशार बॉलर आहे. T20 क्रिकेटमध्ये तर त्याच्याकडे मोठा अनुभव आहे. पण आर्चरच्या पहिल्याच बॉलवर सुर्याने जणू तो गेल्या 20 ओव्हरपासून बॅटींग करतोय या थाटात सिक्स (Suryakumar Yadav Shine) लगावला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्या सिक्सनंच सूर्याचं पदार्पण झाले.

सूर्यकुमारला मुंबईकडून आणि आयपीएलमध्ये देखील खेळण्याचा अनुभव आहे. त्याच्या अंगावरची जर्सी नवी होती. तो खेळतोय तो क्रिकेटचा फॉरमॅट हा आंतरराष्ट्रीय होता. हाच तो फरक. पण ही परिस्थिती आणि या परिस्थितीमध्ये बॉलिंग करणारे बॉलर हे सूर्याच्या परिचयाचे होते. त्यामुळे त्याने आल्या-आल्या झटपट रन काढत ‘पॉवर प्ले’ चा पूर्ण वापर केला.

केएल राहुल (KL Rahul) या सीरिजमध्ये फॉर्मात नव्हता. रोहित आऊट झाल्यानं आता झटपट रन काढण्याची जबाबदारी त्याने स्वत:च्या खांद्यावर घेतली. राहुलसोबत त्याने दुसऱ्या विकेटसाठी 42 रनची पार्टरनरशिप केली. यात सूर्याचा वाटा मोठा होता. राहुल सेट होतोय असं सर्वांना आणि त्यालाही वाटलं असावं. तो एक सकारात्मक फटका मारताना आऊट झाला.

( वाचा : Explained: 4 मॅचमध्ये 1 रन काढल्यानंतरही केएल राहुल टीम इंडियामध्ये का हवा? )

मागच्या वर्षीच्या आयपीएलमध्ये जे घडलं ते पाहून विराट आणि सूर्यकुमार एकत्र खेळण्याची अनेकांनी हाईप केली होती. अनेक मीम (Meme) मास्टर प्रत्येक क्षण टिपण्यासाठी सज्ज होते. या मीम मास्टर्सच्या दुर्दैवाने त्यांना ती संधी फार मिळाली नाही. गेल्या दोन मॅचमध्ये नाबाद हाफ सेंच्युरी काढणारा विराट फक्त 1 रनवर आऊट झाला. विराट बॅटींगला आला की लगेच लेग स्पिनर आणला तर तो फसतो हे एक गृहितक झाले आहे. ते पुन्हा एकदा सिद्ध झाले. आदिल रशिदने (Adil Rashid) आणखी एकदा आऊट केले.

समजदार सूर्या

राहुल आणि कोहली झटपट आऊट झाल्यानंतर मॅच मधील परिस्थिती भारतासाठी प्रतिकूल झाली होती. सूर्यासोबत त्याच्यासारखं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सिक्सनं सुरुवात केलेला ऋषभ पंत (Rishabh Pant) होता. पंत आणि सूर्याने काही बॉल शांतपणे खेळून काढले. ही वेळ थोडं थांबण्याची आहे. हा समजदारपणा ज्याच्यावर सतत उथळपणा शिक्का मारण्यात आलेला आहे, असा ऋषभ पंत आणि पहिलीच मॅच खेळणाऱ्या सूर्यकुमारने दाखवला.

( वाचा – IPL 2021 MI : मजबूत मुंबई इंडियन्स झाली आणखी भक्कम! )

याच कालावधीमध्ये सूर्यकुमारने T20 क्रिकेटमधील पहिल्याच इनिंगमध्ये पहिली हाफ सेंच्युरी पूर्ण केली. सूर्याने फक्त 28 बॉलमध्ये 6 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने हाफ सेंच्युरी झळकावली. दुसऱ्या T20 मध्ये इशान किशननं त्याच्या पहिल्याच इनिंगमध्ये हाफ सेंच्युरी केली होती. त्यापाठोपाठ सुर्याने देखील हाफ सेंच्युरी (Suryakumar Yadav Shine) झळकावली.

सॉफ्ट सिग्नलची गरज काय?

हाफ सेंच्युरीनंतर सुर्याकुमार यादवने सॅम करनला सिक्स खेचून पुन्हा एकदा आक्रमक खेळणार असल्याचं जाहीर केले होते. त्यानंतर तो आणखी एक आक्रमक फटका मारला. त्यावेळी डेव्हिड मलाननं त्याचा कॅच पकडला असा सॉफ सिग्नल मैदानातील अंपायरनं दिला. वास्तविक तो बॉल मलाननं व्यवस्थित पकडला आहे का? हे अनेक कॅमेऱ्याच्या मदतीनं पाहणारा थर्ड अंपायर आणि लाखो प्रेक्षकांना शेवटपर्यंत समजलं नाही. यावेळी अखेर मैदानातील अंपायरचा निर्णय ग्राह्य धरत थर्ड अंपायरनं सूर्यकुमार आऊट असल्यावर शिक्कामोर्तब केले.

मैदानातील अंपायरला जर इतकं स्पष्ट दिसत असेल तर तो थर्ड अंपायरकडे निर्णयासाठी का जातो? थर्ड अंपायरला अनेक कॅमेऱ्यातून वेगवेगळ्या पद्धतीनं बघून आऊट आहे याची खात्री वाटत नसेल आणि तरीही तो मैदानावरील अंपायरचा सॉफ्ट सिग्नल ग्राह्य धरत असेल तर मग त्याला मदतीसाठी असलेल्या यंत्रांची गरज काय? हा प्रश्न सूर्यकुमारची प्रकाशमान इनिंग संपताना उपस्थित झाला आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: