
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये (IND vs AUS) टीम इंडियानं ऐतिहासिक विजय मिळवला. त्यानंतर आता भारताची पुढील लढत इंग्लंडशी (IND vs ENG) आहे. इंग्लंड विरुद्ध पहिल्या दोन टेस्टसाठी टीम इंडियाची निवड (Team Selection) झाली आहे. या दोन्ही टेस्ट चेन्नईमध्ये होणार आहेत. यामधील पहिली टेस्ट 5 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे.
कोहली, इशांतचं कमबॅक
विराट कोहलीनं (Virat Kohli) ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सीरिजमधून पहिल्या टेस्टनंतर कौटुंबिक कारणांमुळे माघार घेतली होती. विराट आता इंग्लंड सीरिजसाठी उपलब्ध असून तोच या टीमचा कॅप्टन असेल.
विराट प्रमाणेच इशांत शर्माचंही (Ishant Sharma) टीममध्ये पुनरागमन झालं आहे. इशांतला आयपीएल (IPL 2020) स्पर्धेत दुखापत झाली होती. त्यामुळे तो ऑस्ट्रेलिया सीरिजमध्ये खेळला नाही. सय्यद मुश्ताक अली T20 स्पर्धेत (Syed Mushtaq Ali Trophy 2021) फिटनेस सिद्ध केल्यानंतर त्याची टीममध्ये निवड करण्यात आली आहे.
( वाचा : IND vs AUS : असा घडला ब्रिस्बेन टेस्टचा हिरो ‘पालघर एक्स्प्रेस’ शार्दुल ठाकूर! )
हार्दिक पांड्या टेस्ट टीममध्ये!
हार्दिक पांड्या (Hardik Pandya) इंग्लंड विरुद्ध 2018 साली शेवटची टेस्ट मॅच खेळला होता. हार्दिक 2019 साली वर्ल्ड कपनंतर बहुतेक काळ दुखापतीमुळे टीमच्या बाहेर होता. ऑस्ट्रेलियातील मर्यादीत ओव्हर्सच्या सीरिजमध्ये त्यानं चांगली कामगिरी केली होती.
‘हार्दिकला टेस्ट टीममध्ये येण्यासाठी बॉलिंग करावी लागेल’ अशी अट विराटनं घातली होती. निवड समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत विराटनं ती अट बाजूला ठेवली आहे. इंग्लंडमध्ये यावर्षी ऑगस्टमध्ये देखील भारताची टेस्ट सीरिज होणार आहे. ही टेस्ट सीरिज डोळ्यासमोर ठेवून त्याचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.
( वाचा : उथळपणाचा शिक्का बसलेला हार्दिक पांड्या ठरला ‘बडा दिलवाला’! )
अक्षर पटेल नवा चेहरा!
गुजरातचा अक्षर पटेलला (Axar Patel) पहिल्यांदा टेस्ट टीममध्ये संधी देण्यात आली. रवींद्र जडेजाच्या अनुपस्थितीमध्ये त्याच्यासारखाच खेळ करणाऱ्या अक्षरचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. या सीरिजमधल्या शेवटच्या दोन टेस्ट अहमदाबादमध्ये आहेत. अहमदबादच्या होम ग्राऊंडवर अक्षरचा रेकॉर्ड चांगला आहे.
नटराजनला विश्रांती, पृथ्वीला वगळले
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात नेट बॉलर म्हणून टी नटराजन (T. Natarajan) गेला होता. त्यानं या दौऱ्यात वन-डे, T20 आणि टेस्ट या तिन्ही प्रकारात पदार्पण केले. नटराजनला पहिल्या दोन टेस्टसाठी विश्रांती देण्यात आली आहे. आयपीएल स्पर्धा (IPL 2020) सुरु असतानाच नटराजनला मुलगी झाली होती. नटराजननं अजून मुलीचा चेहरा प्रत्यक्ष पाहिलेला नाही. आता या ब्रेकमध्ये त्याला मुलीच्या सहवासाचा आनंद घेता येणार आहे.
पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) ला अपेक्षेप्रमाणे वगळण्यात आलं आहे. पृथ्वीला खराब कामगिरीचा फटका बसला. आता त्याला देशांतर्गत स्पर्धेत स्वत:ला सिद्ध करावं लागेल.
इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या दोन टेस्टसाठी भारतीय टीम
रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कॅप्टन), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, वृद्धीमान साहा, हार्दिक पांड्या, के.एल. राहुल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, आर. अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल.
स्टँडबाय खेळाडू – के.एल. भरत, अभिमन्यू ईश्वरन, शाहबाज नदीम, राहुल चहर आणि प्रियंक पांचाल
नेट बॉलर – अंकित राजपूत, आवेश खान, संदीप वॉरियर, कृष्णप्पा गौतम आणि सौरव कुमार
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.