
टीम इंडिया (Team India) पाव वर्षानंतर निळ्या रंगाच्या जर्सीमध्ये शुक्रवारी इंग्लंड विरुद्ध पहिली T20 खेळण्यासाठी उतरेल. पाच मॅचच्या या T20 सीरिजपासून यावर्षी होणाऱ्या T20 वर्ल्ड कपची तयारी सुरु होईल. भारतीय टीममधील अंतिम 11 जागांसाठी 19 खेळाडू उपलब्ध आहेत. त्यामुळे भारतीय टीम मॅनेजमेंटसमोर निवडीचा पेच (Selection Challenge) असणार आहे. वास्तविक भारतीय टीममधील प्रत्येक जागेसाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत. पण यामधील तीन जागांसाठी सहा खेळाडूंमध्ये जोरदार चुरस असेल.
धवन की राहुल?
टीम इंडियाचा एक ओपनर हा रोहित शर्मा (Rohit Sharma) असणार हे नक्की आहे. रोहितचा जोडीदार म्हणून के.एल. राहुल आणि शिखर धवन या दोघांमध्ये स्पर्धा (Selection Challenge) आहे. राहुल मर्यादीत ओव्हरच्या गेल्या काही सीरिजमध्ये ओपनर आणि विकेट किपर अशा दोन्ही भूमिका पार पाडत होता. यापूर्वी ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या सीरिजमध्ये रोहित शर्मा आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) हे दोघेही नव्हते. सध्या हे दोन्ही खेळाडू फॉर्मात आहेत. त्यामुळे राहुलला शिखर धवनसोबत ओपनिंगच्या जागेसाठी स्पर्धा करावी लागणार आहे.
शिखर धवनकडे मोठा अनुभव असला तरी त्याचा स्ट्राईक रेट हा चिंतेचा विषय आहे. पण रोहित आणि धवन या जोडीचा रेकॉर्ड चांगला आहे. त्याचबरोबर ओपनिंगला उजवे-डावे हे कॉम्बिनेशन देखील वापरण्याची संधी धवनला खेळवल्यास मिळू शकते.
( वाचा : T20 सीरिजसाठी इंग्लंडची टीम जाहीर, फॉर्मातील खेळाडूकडं पुन्हा दुर्लक्ष )
श्रेयस की सूर्यकुमार?
श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) या दोन मुंबईकरांमध्ये टीम इंडियातील मीडल ऑर्डरच्या एका जागेसाठी स्पर्धा आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) श्रेयसनं 4 मॅचमध्ये 86.66 च्या सरासरीनं 260 रन केले आहेत. त्याचबरोबर स्पिनर्सला चांगलं खेळण्याचा श्रेयसचा रेकॉर्ड आहे.
गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं चांगली कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमार यादवची यंदा प्रथमच टीम इंडियात निवड झाली आहे. आगामी T20 वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून त्याची निवड केली असेल तर सूर्यकुमारला या संपूर्ण सीरिजमध्ये खेळवणे आवश्यक आहे. सूर्यकुमारही चांगल्या फॉर्ममध्ये असून त्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत 5 मॅचमध्ये 66.40 च्या सरासरीनं 332 रन केले आहेत.
( वाचा : मॅचसाठी कारनं केला 700 किलो मीटर प्रवास, 12 बॉलमध्ये काढले 60 रन! )
भुवनेश्वर की चहर?
फास्ट बॉलर्सच्या जागेसाठी भुवनेश्वर कुमार (Buvneshwar Kumar) आणि दीपक चहर (Deepak Chahar) या दोघांपैकी एकाची निवड (Selection Challenge) करावी लागणार आहे. अनुभवी भुवनेश्वर मोठ्या कालावधीनंतर टीम इंडियामध्ये पुनरागमन करतोय. त्याच्याकडं मॅचच्या सुरुवातीला आणि शेवटी देखील उत्तम बॉलिंग करण्याची क्षमता आहे. त्यामुळे या स्पर्धेत भुवनेश्वरचं पारडं जड आहे. मात्र त्यानं हल्लीच्या काळात फारसं क्रिकेट खेळलेलं नाही. ही बाब भुवनेश्वरसाठी अडचणीची ठरु शकते.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.
You must be logged in to post a comment.