
भारतीय क्रिकेट टीमनं (Team India) 2021 या वर्षात आणखी एका संस्मरणीय विजयाची नोंद केली आहे. गाबामध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव, अहमदाबादमध्ये 2 दिवसांमध्ये इंग्लंडचा फडशा पाडल्यानंतर टीम इंडियानं लॉर्ड्सवर इंग्लंडचा 151 रननं (India win’s Lords Test) पराभव केला आहे. एकीचे बळ काय असतं, हे भारतीय टीमनं लॉर्ड्सवर दाखवून देत या सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या टेस्टमध्ये पावसामुळे ‘झाकली मूठ’ राहिलेल्या इंग्लंडचा हा पराभव चांगलाच छळ करणार आहे.
राहुल-रोहितचा पाया
पाचव्या दिवशी शेवटच्या सेशनमध्ये मिळवलेल्या या विजयाचा पाया टीम इंडियानं पहिल्या दिवशीच रचला होता. टॉसपूर्वी आलेल्या पावसाचा फायदा घेण्यासाठी इंग्लंडचा कॅप्टन जो रूटनं (Joe Root) फिल्डिंग घेतली. पहिल्या दिवशी ढगाळ वातावरणात जेम्स अँडरसन (James Anderson) आणि कंपनीचा केएल राहुल (KL Rahul) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) या जोडीनं नियोजनबद्ध सामना केला.
या दोघांनी 126 रनची ओपनिंग विकेटला पार्टनरशिप केली. रोहितची सेंच्युरी हुकली. राहुलनं रोहितचं अर्धवट काम पूर्ण करत लॉर्ड्सच्या सेंच्युरी बोर्डावर स्वत:चं नाव नोंदवलं. टीम इंडियानं पहिल्या इनिंगमध्ये 364 रन केले. इंग्लंडमधील वातावरणात हा चांगला स्कोअर (India win’s Lords Test) होता.
पाचव्या दिवसापूर्वीची परिस्थिती
लॉर्ड्स टेस्टमधील नंतरचे तीन दिवस मॅचचं पारडं समान होते. जो रुटच्या जोरदार सेंच्युरीमुळे इंग्लंडला आघाडी मिळाली. चौथ्या दिवशी राहुल, रोहित आणि विराट परतल्यानंतर चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) या फॉर्मात नसलेल्या जोडीनं चांगली पार्टनरशिप केली. त्यांनी टीम इंडियाला मॅचमध्ये मागे पडू दिलं नाही.
चौथ्या दिवसाच्या अखेर आपल्या 6 विकेट्स गेल्या होत्या आणि 154 रनची आघाडी होती. पाचव्या दिवशी ऋषभ पंत (Rishabh Pant) एक तास खेळू दे, ही प्रार्थना करुन त्या रात्री भारतीय फॅन्स झोपले.
शमी-बुमराहाचे सत्र
पाचव्या दिवशी सकाळी रॉबिन्सननं ऋषभ पंतला झटपट आऊट केले. त्यानंतर इशांत शर्माही परतला. मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ही जोडी मैदानात एकत्र आली. इंग्लंडच्या बॉलर्सनी बुमराहवर बाऊन्सर टाकले. त्याला घाबरवण्याचा प्रयत्न केला. मैदानात नेहमी शांत असलेल्या बुमराहाचा पारा देखील चढला. त्याचा आणि इंग्लंड टीमचा मैदानात वाद झाला.
मॅच हातातून निसटताच इंग्रज बिथरले, बुमराहशी केले भांडण, पाहा VIDEO
बुमराहवर मानसिक दबाव निर्माण करण्याचा इंग्लंडचा प्रयत्न अंगाशी आला. त्यांनतर त्यानं आणखी निर्धारानं बॅटींग केली. मोहम्मद शमी देखील अगदी सहज खेळत होता. या दोघांनी इंग्लंडचे सर्व प्लॅन उधळून लावले. त्यांनी आपल्या सर्वोच्च स्कोर केले. नवव्या विकेटसाठी नाबाद 89 रनची पार्टनरशिप केली. या पार्टनरशिपमुळे टीम इंडिया मॅच हरणार नाही, हे स्पष्ट झाले (India win’s Lords Test) होते. आता इंग्लंडला हरवण्यासाठी भारतीय बॉलर्सकडं दोन सेशनचा वेळ होता.
इंग्लंडला धक्के, धक्के आणि धक्के!
भारतामधील टेस्ट सीरिजमधे, न्यूझीलंडनं हरवताना, नॉटिंघममध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये इंग्लंडच्या टॉप ऑर्डरचा ‘दर्जा’ काय आहे हे सिद्ध झालं होतं. भारतामध्ये पिच वाकडे असल्याचं रडगाणं गाऊन झालं होतं. इंग्लंडमध्ये आणि ते देखील लॉर्ड्सवर हे रडण्याची सोय नव्हती. लॉर्ड्सवर इंग्लंड टीम त्यांच्या परंपरेला जागली.
बॅटनंतर हातामध्ये बॉल आलेल्या शमी-बुमराह जोडीनं इंग्लंडच्या ओपनर्सना भोपळा देखील फोडू दिला नाही. 2014 मध्ये लॉर्ड्सवरील विजयाचा हिरो असलेल्या इशांत शर्मानं (Ishant Sharma) बॉलिंगला येताच जो रुटला साथ देण्याचा प्रयत्न करणाऱ्या हसीब हमीदला दूर केलं. त्यानंतर विराट कोहलीनं मायकल गॉफच्या निर्णायवर घेतलेला DRS यशस्वी झाला आणि जॉनी बेअरस्टो परतला.
खेळता येईना पिच वाकडे : चेन्नईला नावं ठेवण्यापूर्वी जरा ‘या’ महान पिचवरील रेकॉर्ड्सही पाहा
रुट परतला आणि….
टीम इंडिया आणि विजयात आता जो रुटचा अडथळा होता. या सीरिजमधील पहिल्या तीन इनिंगमध्ये त्यानं 50 पेक्षा जास्त रन केले होते. टी टाईमनंतर तिसऱ्याच बॉलवर बुमराहनं रुटचा नेहमी रुतणारा काटा (India win’s Lords Test) दूर केला. त्यानंतर जोस बटलर, मोईन अली आणि सॅम करन या इंग्लंडच्या T20 स्टार्सवर मॅच वाचवण्याची जबाबदारी होती.
बटलर आणि मोईन अली जोडी काही काळ रेंगाळली. त्यावेळी सिराजनं मोईनला आऊट करत ही जोडी फोडली. त्यानंतरच्या बॉलवर सॅम करनलाही सिराजनं आऊट केलं. मागील इंग्लंड दौऱ्यात सॅम करनची बॅटींग टीम इंडियाला भारी पडली होती. लॉर्ड्स टेस्टमधील दोन्ही इनिंगमध्ये करन पहिल्याच बॉलवर आऊट झाला.
करन आऊट झाल्यानंतर इंग्लंडचे डोळे बटलर पेक्षा मैदानातील सूर्यप्रकाशाकडे होते. शेवटच्या तासात ढग दूर झाले. त्यामुळे इंग्लंडची ती देखील संधी गेली. रॉबिन्सनच्या निर्णयाविरुद्ध विराटनं घेतलेला DRS यशस्वी झाला. त्यानंतर सिराजनं एकाच ओव्हरमध्ये बटलर आणि अँडरसनला आऊट करत भारताच्या विजयावर (India win’s Lords Test) शिक्कामोर्तब केले.
एकीचा विजय
लॉर्ड्सवरील विजयात प्रत्येकानं योगदान दिलं. रोहित-राहुलनं पहिल्या इनिंगमध्ये चांगली बॅटींग केली. पुजारा-राहाणे जोडीनं दुसऱ्या इनिंगमध्ये सर्वात मोठ्या प्रेशरमध्ये तारले. पंतनं विकेट किपिंगचं काम चोख केलं. जडेजानं पहिल्या इनिंगमध्ये लोअर ऑर्डरसह किल्ला लढवला. इशांतनं दोन्ही इनिंगमध्ये महत्त्वाच्या क्षणी विकेट घेतल्या. शमी आणि सिराजनं दोन्ही इनिंगमध्ये जीव ओतून बॉलिंग करत इंग्लंडच्या बॅट्समन्सना निवांत होऊ दिलं नाही. पहिल्या इनिंगमध्ये 13 नो बॉल टाकणाऱ्या बुमराहनं दुसऱ्या इनिंगमध्ये आधी बॉल अंगावर झेलले. त्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये तीन विकेट्स घेतल्या. इंग्लंडनं बुमराहला कॉर्नर करण्याचा प्रयत्न केला. भारतीय टीमनं एकत्र येऊन इंग्लंडला पराभवाच्या दरीत ढकलून दिले.
“You go after one of our players, all eleven of us come back at you” हे मॅच संपल्यानंतरचे केएल राहुलचं वाक्य भारतीय टीमची मानसिकता सांगण्यासाठी परफेक्ट आहे. याच मानसिकतेनं टीम इंडियानं ऑस्ट्रेलियात विजय मिळवला. आता इंग्लंडमध्ये सीरिज जिंकण्यासाठी (India win’s Lords Test) ही टीम सज्ज झाली आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.