
भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील पहिल्या टेस्टममध्ये टीम इंडिया 227 रननं पराभूत झाली. चौथ्या इनिंमध्ये 420 रनचं अवघड आव्हान टीम इंडियाला पेलवलं नाही. भारताची दुसरी इनिंग 192 रनवर संपुष्टात आली. भारताकडून दुसऱ्या इनिंगमध्ये विराट कोहलीनं एका बाजूनं संघर्ष करत 72 रनची खेळी केली. विराटनं दुसऱ्या इनिंगमध्ये लढा देण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या कॅप्टनसीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. विशेषत: पहिल्या टेस्टमध्ये कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) बाहेर ठेवण्याच्या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.
मॅचपूर्वी काय झालं?
चेन्नईमध्ये होणाऱ्या पहिल्या टेस्टमध्ये अक्षर पटेलचा (Axar Patel) समावेश नक्की मानला जात होता. मॅच सुरु होण्यापूर्वी काही तास आधी अक्षर जखमी झाल्यानं भारतीय टीममध्ये शाहबाज नदीम (Shahbaz Nadeem) आणि राहुल चहर (Rahul Chahar) यांचा टीममध्ये समावेश करण्यात आला. त्या परिस्थितीत कुलदीप यादव (Kuldeep Yadav) अंतिम 11 मध्ये असेल हे जवळपास नक्की मानले जात होते, मात्र अंतिम 11 मध्ये टीम मॅनेजमेंटमेनं दीड तासांपूर्वी टीममध्ये निवड झालेल्या नदीमचा समावेश करत सर्वांना धक्का दिला.
( वाचा : IND vs ENG : ‘या’ कारणांमुळे झाला टीम इंडियाचा चेन्नई टेस्टमध्ये मोठा पराभव! )
विराटनं सांगितलं कारण
विराट कोहलीनं मॅचनंतर कुलदीपला बाहेर बसण्याचं कारण सांगितलं आहे. “तुम्ही जेंव्हा दोन ऑफ स्पिनर खेळवता तेंव्हा कुलदीप देखील एकाच पद्धतीता बॉलर बनतो. जो बॉल बाहेर काढू शकतो. कुणाला खेळवायचं आहे, याबाबत आम्ही स्पष्ट होतो. या निर्णयाचा आम्हाला कोणताही पश्चाताप होत नाही.’’ असं विराटनं स्पष्ट केलं. त्याचबरोबर पुढील टेस्टमध्ये बॉलिंग अटॅकमध्ये विविधता येईल, असं कॉम्बिनेशन निवडण्याचा विचार करु असं सांगत विराटनं आणखी काही बदलाचे देखील संकेत दिले आहेत. पहिल्या इनिंगमध्ये बॅट्समन्सची निराशा हेच टीम इंडियाच्या पराभवाचे मुख्य कारण असल्याचं विराटनं यावेळी स्पष्ट केलं.
( वाचा : Explained: विराट कोहलीच्या कॅप्टनसीमध्ये आर. अश्विनवर खरंच अन्याय झाला आहे का? )
नदीमची कामगिरी कशी?
शाहबाज नदीमनं पहिल्या टेस्टमध्ये एकूण पाच विकेट्स घेतल्या. अर्थात त्याची पहिल्या इनिंगमध्ये चांगलीच धुलाई झाली. त्यानं पहिल्या इनिंगमध्ये 44 ओव्हरमध्ये 167 रन दिले. इंग्लंडचा कॅप्टन जो रुट (Joe Root) आणि ऑल राऊंडर बेन स्टोक्सची (Ben Stokes) विकेट घेत नदीमनं पहिल्या इनिंगमध्ये याची काही प्रमाणात भरपाई करण्याचा प्रयत्न केला. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरी टेस्ट 13 फेब्रुवारीपासून चेन्नईमध्येच खेळवली जाणार आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.
You must be logged in to post a comment.