
भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील टेस्ट सीरिज ही दोन देशांप्रमाणेच दोन कॅप्टनमधील देखील आहे. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि जो रुट (Joe Root) यांच्यातही कोण अधिक रन करणार यामध्ये ही स्पर्धा रंगणार आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सहा महिन्यांपूर्वी झालेली टेस्ट सीरिज भारताने 3-1 ने जिंकली होती. पण त्यावेळी या दोन कॅप्टनच्या लढतीमध्ये रुटनं बाजी मारली होती. रुटनं 4 टेस्टमध्ये 46 च्या सरासरीनं 368 रन काढले. तर विराटला 4 टेस्टमध्ये 28.66 च्या सरासरीनं फक्त 172 रन करता आले होते. जो रुटनं त्या सीरिजमध्ये फक्त विराट कोहलीपेक्षा नाही तर दोन्ही देशांमधील कोणत्याही बॅट्समनपेक्षा जास्त रन काढले होते. तर विराट कोहली या यादीमध्ये सातव्या नंबरवर होता. आता इंग्लंडमधील सीरिजमध्ये विराट याची भरपाई करणार का? याकडे देखील सर्वांचे लक्ष असेल.
( वाचा : IND vs ENG : जो रुटचा ‘ड्रीम रन’ कायम, या वर्षात झळकावली सलग तिसरी सेंच्युरी )
सरासरीत कोण सरस?
विराट कोहली हा जो रुट सारखा फक्त टेस्ट क्रिकेट खेळणारा बॅट्समन नाही. तो सर्व प्रकारचे फॉरमॅट खेळतो. तसंच आयपीएल स्पर्धेतही खेळतो. रुटनं आयपीएल स्पर्धेतून नुकतीच माघार घेतली आहे.
विराटनं 92 टेस्टमध्ये 52.04 च्या सरासरीनं 7547 रन केले आहेत. या वर्षी पहिल्या तीन टेस्टमध्ये तीन सेंच्युरी करणाऱ्या जो रुटनं 105 टेस्टमध्ये 46.68 च्या सरासरीनं 8714 रन केले आहेत.
नाव | टेस्ट | सरासरी | रन्स |
विराट कोहली | 92 | 52.04 | 7547 |
जो रुट | 105 | 46.68 | 8714 |
घरच्या मैदानावर कुणाची आघाडी?
विराट कोहलीनं घरच्या मैदानावर 43 टेस्टमध्ये 64.31 च्या सरासरीनं 3730 रन केले आहेत. यामध्ये 13 सेंच्युरींचा समावेश आहे. तर जो रुटनं घरच्या मैदानावर 55 टेस्टमध्ये 49.38 च्या सरारसरीनं 4,445 रन केले आहेत. रुटनं 20 पैकी 11 सेंच्युरी या घरच्या मैदानावर झळकावल्या आहेत.
नाव | टेस्ट | सरासरी | रन्स | सेंच्युरी |
विराट कोहली | 43 | 64.31 | 3730 | 13 |
जो रुट | 55 | 49.38 | 4445 | 11 |
घराबाहेर कुणाचा दबदबा?
विराट कोहलीनं विदेशातील 48 टेस्टमध्ये 44.23 च्या सरासरीनं 3760 रन केले आहेत. विशेष म्हणजे घरच्या मैदानापेक्षा एक सेंच्युरी जास्त म्हणजे एकूण 14 सेंच्युरी विराटनं घराबाहेर झळकावल्या आहेत.
जो रुटची घराबाहेरची सरासरी ही विराटपेक्षा जास्त आहे. रुटनं घराबाहेर 47 टेस्टमध्ये 47.40 च्या सरासरीनं 3982 रन केले आहेत. विशेष म्हणजे यावर्षी सलग तीन सेंच्युरी घराबाहेर करुनही रुटच्या विदेशातील मैदानात एकूण 9 सेंच्युरीच आहेत.
नाव | टेस्ट | सरासरी | रन्स | सेंच्युरी |
विराट कोहली | 48 | 44.23 | 3760 | 14 |
जो रुट | 47 | 47.40 | 3982 | 9 |
एकमेकांच्या देशांविरुद्ध योगदान
भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट सीरिज सुरु असल्यानं विराट कोहली आणि जो रुट ( Virat Kohli, Joe Root) हे एकमेकांच्याविरुद्ध कसं खेळतात याला देखील महत्व आहे.
विराटनं इंग्लंडविरुद्ध 23 टेस्टमध्ये 5 सेंच्युरीसह 45.84 च्या सरासरीनं 1742 रन काढले आहेत. तर जो रुटनं भारताविरुद्ध 20 टेस्टमध्ये 54.21 च्या सरासरीनं 1789 रन केले आहेत. यामध्ये 5 सेंच्युरींचा समावेश आहे.
नाव | टेस्ट | सरासरी | रन्स | सेंच्युरी |
विराट कोहली | 23 | 45.84 | 1742 | 5 |
जो रुट | 20 | 54.21 | 1789 | 5 |
विजयामधील योगदान
विराट कोहलीच्या एकूण 92 पैकी 47 टेस्ट भारतानं जिंकल्या आहेत. या टेस्टमधील विराटची सरारसरी ही 60.50 इतकी असून त्यामध्ये त्यानं 13 सेंच्युरीसह 3961 रन केले आहेत.
( वाचा : IND vs ENG: स्वातंत्र्य, सन्मान आणि स्वामित्वाची 89 वर्षांची लढाई! )
जो रुटच्या 105 पैकी इंग्लंडनं 46 टेस्ट जिंकल्या आहेत. यामध्ये रुटची सरासरी 63.85 इतकी आहे. रुटच्या 20 पैकी 16 सेंच्युरीमध्ये इंग्लंडची टीम विजयी झाली आहे. या टेस्टमध्ये रुटचं योगदान 4789 रनचं आहे.
नाव | विजयी टेस्ट | सरासरी | रन्स | सेंच्युरी |
विराट कोहली | 47 | 60.50 | 3961 | 13 |
जो रुट | 46 | 63.85 | 4789 | 16 |
कॅप्टन म्हणून कुणाचं वर्चस्व
विराट कोहलीनं आजवर एकूण 61 टेस्टमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलं आहे. यापैकी 36 टेस्ट भारतानं जिंकल्या असून 15 टेस्ट गमावल्या आहेत. 10 टेस्ट ड्रॉ झाल्या आहेत. विराट कोहलीची या टेस्टमधील सरासरी 57.96 इतकी आहे. जो रुटची विजयी सरासरी ही विराटपेक्षा कमी आहे. रुटची सध्याची सरासरी 50 इतकी आहे. रुटनं आजवर एकूण 52 टेस्टमध्ये इंग्लंडची कॅप्टनसी केली असून त्यापैकी 26 टेस्टमध्ये विजय मिळवला आहे, तर 19 टेस्ट गमावल्या आहेत. तर 7 टेस्ट या ड्रॉ झाल्या आहेत.
नाव | टेस्ट | विजयी | पराभूत | ड्रॉ | सरासरी |
विराट कोहली | 61 | 36 | 15 | 10 | 57.96 |
जो रुट | 52 | 26 | 19 | 7 | 50 |
टिप – लेखातील सर्व आकडेवारी ही 3/8/2021 पर्यंतची आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.