
श्रीलंकेतील दोन विजय आणि भारताला पहिल्या टेस्टमध्ये हरवल्यानंतर इंग्लंडचं (England) हवेत असलेलं विमान आता जमिनीवर आलं आहे. भारताविरुद्ध चेन्नईमध्ये (Chennai Test) सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडची टीम पूर्ण दिवसभर देखील खेळू शकली नाही. त्यामुळे त्यांना आता अखेर भारतामध्ये (England In India) टेस्ट मॅच खेळताना उडणाऱ्या भंबेरीची जाणीव झाली असेल.
पहिल्या ओव्हरपासून दबाव
भारतीय बॉलर्सनी अगदी पहिल्या ओव्हरपासून इंग्लंडवर दबाव ठेवला. इशांत शर्मानं (Ishant Sharma) पहिल्याच ओव्हरमध्ये रोरी बर्न्सला आऊट केलं. इंग्लंडचा हा ओपनर सलग दुसऱ्यांदा शुन्यावर आऊट झाला. त्यानंतर भारताचा टेस्ट मॅचमधील मोठा मॅच विनर असलेल्या आर. अश्विननं (R. Ashwin) इंग्लंडला कोंडीत पकडलं. पहिल्या टेस्टमध्ये चिवट खेळ करणाऱ्या डॉम सिबलेला त्यानं आऊट केलं. पहिलीच टेस्ट खेळणाऱ्या अक्षर पटेलनं (Axar Patel) सर्वात मोठी विकेट घेतली. इंग्लंडचा कॅप्टन जो रुटला (Joe Root) अक्षरनं चकवलं. रुटला सलग चौथ्या टेस्टमध्ये सेंच्युरी करण्यासाठी 94 रन कमी पडले. विशेष म्हणजे 2021 मध्ये पहिल्यांदाच पहिल्या इनिंगमध्ये रुट सेंच्युरी न करता आऊट झाला.
सिराजचं स्वप्नवत पदार्पण
रुट आऊट झाल्यानं मुळापासून हललेल्या इंग्लंडची टीम लंचनंतर आणखी खाली गेली. अश्विननं बेन स्टोक्सला (Ben Stokes) आऊट केलं. त्यानंतर इंग्लंडचा फॉलो ऑन वाचवण्यासाठी संघर्ष सुरु झाला. ओली पोप आणि दोन वर्षांनंतर टेस्ट मॅच खेळणाऱ्या बेन फोक्स (Ben Foakes) यांनी काही काळ मैदानात स्थिरावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भारतामध्ये पहिलीच टेस्ट मॅच खेळणाऱ्या मोहम्मद सिराजनं (Mohammed Siraj) स्वप्नत पदार्पण केलं. त्यानं पहिल्याच बॉलवर ओली पोपला आऊट करत ही जोडी फोडली. यापूर्वी खराब विकेट किपिंगसाठी सातत्यानं टीका झालेल्या ऋषभ पंतनं (Rishabh Pant) गोलकिपरला शोभेल अशी उडी मारत कॅच पकडला.
( वाचा : मोहम्मद सिराजची संघर्षगाथा : वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘तो’ सर्व संकटात ठाम उभा होता! )
बेन फोक्सनं अखेर केलेल्या धडपडीमुळे फॉलोऑन टाळण्यासाठी आवश्यक असलेला 130 चा आकडा इंग्लंडनं (England In India) कसाबसा ओलांडला. भारताकडून आर. अश्विन हा सर्वात यशस्वी बॉलर ठरला. त्यानं 43 रन देत पाच विकेट्स घेतल्या. अश्विन आता 400 विकेट्सपासून फक्त 9 विकेट्स दूर आहे. अश्विननं स्टुअर्ट ब्रॉडला शून्यावर आऊट करत इंग्लंडची इनिंग संपवली. टेस्ट क्रिकेटमधील ब्रॉडचे हे 36 वे शून्य आहे. ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर ग्लेन मॅकग्राला त्यानं याबाबतीत मागे टाकले आहे. आता त्याच्यापुढे फक्त वेस्ट इंडिजचा कर्टली वॉल्श (43 शून्य) आहे.
भारताची मजबूत पकड
पहिल्या इनिंगमध्ये सेंच्युरी करणाऱ्या रोहित शर्मानं भारताला पुन्हा एकदा सकारात्मक सुरुवात करुन दिली. भारतानं दिवसअखेर शुभमन गिललं गमावून 54 रन केले आहेत. टीम इंडियाकडं सध्या 249 रनची आघाडी आहे.
( वाचा : IND vs ENG : चेन्नईच्या फिरत्या पिचवर, रोहित शर्माच्या सेंच्युरीनं टीम इंडियाची आघाडी )
यापूर्वी सकाळी मोठा स्कोअर करण्याची भारताची योजना काही यशस्वी झाली नाही. मोईन अलीनं दिवसाच्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये मोईन अलीनं दोन विकेट्स घेतल्या. ऋषभ पंतनं एका बाजूनं चार फोर लगावत त्याची हाफ सेंच्युरी पूर्ण केली. चांगला खेळत असलेल्या पंतला ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी चांगला जोडीदार न मिळाल्यानं नाबाद परत यावं लागलं. भारताची पहिली इनिंग 329 रनवर संपुष्टात आली. पण तेवढे रन हे इंग्लंडला आपण आता भारतामध्ये आलो आहोत (England In India) ही जाणीव करुन द्यायला पुरेसे आहेत.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.