
भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील पहिली टेस्ट इंग्लंडनं 227 रन्सने जिंकली आहे. इंग्लंडचा कॅप्टन जो रुटची (Joe Root) डबल सेंच्युरी हे इंग्लंडच्या विजयाचं मुख्य वैशिष्ट्य ठरलं. तर टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरच्या निराशादायक खेळामुळे भारताला इंग्लंडचं आव्हान पेलवलं नाही. चेन्नईमध्ये 1999 नंतर पहिल्यांदाच भारतानं टेस्ट मॅच गमावली (India Lost Chennai) आहे. विराट कोहलीच्या कॅप्टनसीत टीम इंडियानं सलग चौथी टेस्ट गमावली आहे.
टीम इंडिया कोणत्या कारणामुळे पराभूत झाली ते पाहूया
पहिल्या टेस्टचा शिथिलपणा : इंग्लंड विरुद्ध 2017 साली 4-0 नं सीरिज जिंकल्यानंतर टीम इंडिया पुण्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 333 रन्सनं पराभूत झाली होती. 2017 पासून क्रिकेटमधील SENA (South Africa, England, New Zealand आणि Australia) या चार देशांविरुद्धच्या सात पैकी फक्त 2 वेळेस टीम इंडियानं पहिल्या टेस्टमधील पराभव टाळला आहे. पहिल्या टेस्टमधील शिथिलता या टेस्टमध्ये देखील कायम दिसली.
टॉस गमावला : भारतीय पिचवर निर्णायक ठरणारा टॉस विराट कोहली (Virat Kohli) पुन्हा एकदा हरला. इंग्लंडविरुद्ध सलग नवव्या टेस्टमध्ये विराट टॉस हरला आहे. टॉस जिंकल्यावर इंग्लंडला पहिल्या दोन दिवशी शांतपणे बॅटिंग करण्याची गरज होती. ती जो रुट, डॉम सिबले आणि बेन स्टोक्स या त्रिकुटानं पूर्ण केली. अगदी डॉब सिबले आणि रॉरी बर्न्स यांनी पहिल्या दिवशी 20 ओव्हर खेळून काढत विकेट न फेकण्याचा इंग्लंडचा निर्धार दाखवला होता.
जो रुटचा फॉर्म : श्रीलंकेतील 2 टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये 426 रन काढून जो रुट भारतामध्ये आला होता. चेन्नईमध्ये देखील रुटचा तो फॉर्म कायम होता. रुटनं या टेस्टमध्ये 377 बॉलमध्ये 218 रनची खेळी केली. शंभराव्या टेस्टमध्ये डबल सेंच्युरी करणारा रुट हा टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील पहिलाच बॅट्समन ठरला आहे. रुटच्या खेळानं पहिल्या दिवसापासूनच इंग्लंडचं मॅचवर वर्चस्व राहिलं. त्यानंतर ते वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्नात टीम इंडिया शेवटच्या दिवसापर्यंत होती.
( वाचा : IND vs ENG : जो रुटचा ‘ड्रीम रन’ कायम, या वर्षात झळकावली सलग तिसरी सेंच्युरी )
टॉप ऑर्डरची निराशा : इंग्लंडनं पहिल्या इनिंगमध्ये 578 रनचा डोंगर उभा केला होता. त्याला उत्तर देण्यासाठी भारताची टॉप ऑर्डर चांगली खेळणं आवश्यक होतं. पहिल्या इनिंगमध्ये रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे या चौघांनी मिळून फक्त 47 रन केले.
चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी हाफ सेंच्युरी झळकावत टीमला 300 चा पल्ला ओलांडून दिला. पण त्यांच्या खेळी फॉलोऑन वाचवू शकली नाही ((India Lost Chennai)). इंग्लंडनं फॉलो ऑन दिला नसला तरी टीम इंडियाचा पराभव तिथंच जवळपास नक्की झाला होता.
अँडरसनचा दणका : इंग्लंडचा सर्वात अनुभवी फास्ट बॉल जेम्स अँडरसननं (James Anderson) निर्णायक क्षणी टीम इंडियाला दणके दिले. पाचव्या दिवशी अँडसनननं त्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये शुभमन गिल आणि अजिंक्य रहाणे यांना चार बॉलच्या अंतरानं आऊट केलं. तर त्यानंतर ऋषभ पंतला देखील आऊट करत टीम इंडियाच्या फॅन्सच्या उरलेल्या आशा देखील संपुष्टात (India Lost Chennai)आणल्या.
( वाचा : जेम्स अँडरसनचा टीम इंडियाला धोक्याचा इशारा, लवकरच अनिल कुंबळेचा रेकॉर्ड मोडणार? )
टीम निवडीवर प्रश्नचिन्ह : इंग्लंडच्या अनअनुभवी स्पिनर्सनं 20 पैकी 11 विकेट्स घेत टीमच्या विजयात निर्णयाक वाटा उचलला. भारताचे शाहबाज नदीम आणि वॉशिंग्टन सुंदर या स्पिनर्सना इंग्लंडवर जरब बसवता आली नाही. पहिले दोन्ही दिवस पिचची मदत नसताना हे स्पिनर्स निस्तेज भासले. त्यामुळे कुलदीप यादवचा (Kuldeep Yadav) पर्याय टीम मॅनेजमेंट पुढील टेस्टमध्ये स्विकारणार का? हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.
You must be logged in to post a comment.