फोटो – ट्विटर

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील T20 सीरिजमध्ये (India vs England T20 Series 2021) दुसरी मॅच जिंकून भारताने बरोबरी केली आहे. पाच मॅचच्या या सीरिजमधील तिसरी मॅच मंगळवारी (16 मार्च 2021) रोजी होणार आहे. या मॅचपूर्वी टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याची डोकेदुखी (Problem for Virat) वाढली आहे.

रोहित कुणाच्या जागी येणार?

टीम इंडियाचा व्हाईस कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma)  याला या सीरिजमध्ये पहिल्या दोन मॅचमध्ये विश्रांती देण्यात आली आहे, असे विराटने जाहीर केले होते. रोहितच्या अनुपस्थितीमध्ये पहिल्या मॅचमध्ये केएल राहुल (KL Rahul) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) यांनी ओपनिंग केली. त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये धवनला वगळून भारतीय टीम मॅनेजमेंटनं इशान किशनला (Ishan Kishan) संधी दिली.

इशान किशनने त्याच्या पहिल्याच मॅचमध्ये हाफ सेंच्युरी झळकावली. तो ‘मॅन ऑफ द मॅच’ देखील ठरला. इशान फॉर्मात आहे. त्याचा स्वाभाविक खेळ हा आक्रमक असल्याने T20 फॉरमॅटला साजेसा आहे. त्याचबरोबर टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरमध्ये डावखुरा बॅट्समन हवा ही गरज देखील इशान पूर्ण करतो. त्यामुळे त्याला तिसऱ्या मॅचमध्ये वगळणे विराटसाठी अशक्य आहे.

( वाचा : IND vs ENG: किशनची कमाल, कोहलीचा हल्ला! भारताने घेतला इंग्लंडचा बदला )

राहुलला वगळणार का?

केएल राहुल हा मागील वर्षी मर्यादीत ओव्हर्समध्ये भारताचा पहिल्या पसंतीचा ओपनर आणि विकेट किपर होता. ऋषभ पंत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्धची टेस्ट सीरिज उत्तम खेळला. त्याच्या बॅटींगमधील फॉर्मचा सकारात्मक परिणाम त्याच्या विकेट किपिंगमध्ये झाला. त्याच्या विकेट किपिंगमध्ये देखील सुधारणा झाली आहे. त्यामुळे साहजिकच पंतचा T20 टीममध्ये समावेश झाला.

पंत टीममध्ये आल्याने राहुलला विकेट किपिंगचे ग्लोज काढावे लागले. त्यातच या सीरिजमधील दोन्ही मॅचमध्ये तो अपयशी ठरला आहे. राहुलनं पहिल्या दोन मॅचमध्ये मिळून फक्त 1 रन काढला आहे. राहुल दोन मॅचमध्ये अपयशी ठरला असला तरी तो भारतीय टीममधील महत्त्वाचा प्लेयर आहे. आगामी T20 वर्ल्ड कपमध्ये रोहित आणि राहुल हे भारताचे ओपनर असतील, असं विराटनं जाहीर केलं आहे. या वर्ल्ड कपपूर्वी भारताकडे अगदी मोजक्या T20I आहेत. त्यामुळे आता या सीरिजमधील उर्वरित 3 मॅचमध्ये रोहित-राहुल ही जोडी एकत्र  खेळणार की रोहितसाठी राहुलला वगळणार हा प्रश्न विराटसमोर (Problem For Virat) आहे.

( वाचा : राहुल द्रविडच्या गावातील सेहवागला कन्फर्म जागेची प्रतीक्षा! )

सूर्यकुमारचा बळी देणार?

रोहितला खेळवण्यासाठी विराट कोहलीसमोर आणखी एक पर्याय आहे. तो म्हणजे भारतीय टीममधील नवोदीत खेळाडू सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याला वगळणे. सूर्याला दुसऱ्या T20 मध्ये बॅटींग मिळाली नाही. भारतीय टीमची टॉप ऑर्डर फिक्स आहे. त्यामुळे त्याला टीममध्ये सध्या तरी लोअर ऑर्डरमध्येच खेळावे लागेल. त्यामुळे मोठी बॅटींग करण्याच संधी मिळण्याची शक्यता कमी असलेल्या सूर्यकुमारला रोहितसाठी वगळण्याचा पर्याय टीम इंडियासमोर आहे.

पण, हे केले तर सूर्यकुमारवर अन्याय ठरेल. देशांतर्गत स्पर्धा आणि आयपीएलमधील चांगल्या फॉर्ममुळेच सूर्यकुमारची भारतीय टीममध्ये निवड झाली आहे. आगामी T20 वर्ल्ड कपचा विचार करुन त्याचा भारतीय टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे बॅटींगची संधी ही न मिळताच त्याला अंतिम 11 मधून वगळणे हा त्याच्यावर अन्याय ठरेल. त्यामुळे रोहित शर्माचा समावेश कुणाच्या जागेवर करायचा हा गंभीर प्रश्न विराट कोहलीसमोर (Problem For Virat) समोर आहे. रोहित समावेशासाठी विराटला आता कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

                                    

error: