फोटो – ट्विटर, बीसीसीआय

टीम इंडियाने मुंबई टेस्टमध्ये न्यूझीलंडचा 372 रनने (India vs New Zealand Mumbai Test) पराभव करत 2 टेस्टची सीरिज 1-0 ने जिंकली आहे. कानपूर टेस्टमध्ये ‘वर्ल्ड चॅम्पियन’ ला साजेसा खेळ न्यूझीलंडनं केला होता. कानपूर टेस्ट ड्रॉ झाली. त्यानंतर मुंबईत त्यांच्या टीमबद्दलची अपेक्षा वाढली होती. वानखेडेच्या पिचवर न्यूझीलंडने त्यांच्या परंपरेला जागत 4 दिवसांमध्ये गुडघे टेकले. या सीरिजनंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यातील बदलाबाबत टीम इंडियाचा हेड कोच राहुल द्रविडने (Rahul Dravid on changes) मोठे संकेत दिले आहेत.

पहिला विजय

राहुल द्रविड हेड कोच झाल्यानंतर टीम इंडियानं टेस्ट क्रिकेटमध्ये पहिला विजय मिळवला आहे. भारतीय टीमनं या विजयात एक जबरदस्त रेकॉर्ड करत नव्या कोचला भेट दिली आहे. हा टीम इंडियाचा टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक रनने मिळालेला विजय आहे. या विजयानंतर द्रविड खूश असला तरी त्यानं त्याचवेळी भविष्यील टीमची कल्पना दिली आहे.

राहुल द्रविड यावेळी म्हणाला की, ‘तरुण खेळाडू चांगलं खेळत आहेत. ही निवड करण्यासाठी असलेली चांगली डोकेदुखी आहे. प्रत्येकाचीच चांगलं प्रदर्शन करण्याची इच्छा आहे. त्याचबरोबर त्यांची एकमेकांशी चुरशीची स्पर्धा आहे. आमची डोकेदुखी आणखी वाढणार याची मला खात्री आहे. आम्हाला काही कठोर निर्णय घ्यावे लागू शकतात. पण आमचे कम्युनिकेशन चांगले असेल आणि एखादा निर्णय का घेतला (Rahul Dravid on changes) हे खेळाडूला आम्ही समजावून सांगू शकत असू तर काही अडचण येणार नाही.’

टीम इंडियाच्या ‘क्रायसिस मॅन’ला अखेरची संधी

अजिंक्य – पुजारा In Danger

राहुल द्रविडने त्याच्या स्वभावाला साजेशी संयमी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेत त्यानं कुणाचंही नाव घेतलेलं नाही. पण, ‘आम्हाला काही कठोर निर्णय घ्यावे लागू शकतात’ या शब्दात द्रविडने सध्या फॉर्मात नसलेल्या सिनिअर खेळाडूंना इशारा दिल्याचं मानलं जात आहे. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) हे ते सिनिअर खेळाडू आहेत.

द्रविडच्या कारकिर्दीमधील पहिल्याच टेस्ट सीरिजमध्ये श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि मयांक अग्रवाल (Mayank Agarwal) यांनी सेंच्युरी झळकावली. पहिल्या टेस्टमध्ये श्रेयस आणि दुसऱ्या टेस्टमध्ये मयांकने बॅटींगचा भार वाहिला. त्यामुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील पहिल्या टेस्टमधील प्लेईंग 11 मध्ये त्यांची जागा पक्की मानली जात आहे.

काय होणार बदल?

टीम इंडियाचा आणखी एक तरुण खेळाडू शुभमन गिल (Shubman Gill) याने या सीरिजमध्ये चांगली कामगिरी करत आफ्रिका सीरिजमधील प्लेईंग 11 साठी दावेदारी सादर केली आहे. त्यातच या सीरिजमध्ये विश्रांती दिली होते असे रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) ही जोडी दक्षिण आफ्रिका सीरिजमध्ये परतणार आहे.

रोहित आणि राहुल टीममध्ये परतल्यानंतर मुंबई टेस्टमध्ये चांगलं खेळलेल्या शुभमन गिलची जागा देखील धोक्यात येणार आहे. त्यामुळे अजिंक्य आणि पुजाराचं नाव आणखी मागे पडणार आहे, द्रविडने टीम इंडियातील याच बदलाचे संकेत (Rahul Dravid on changes)  मुंबई टेस्टमधील विजयानंतर दिले आहेत.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: