फोटो – ट्विटर

भारताने श्रीलंकेविरूद्ध झालेल्या पहिल्या T20 मध्ये 62 रननं विजय मिळवला. लखनौमध्ये झालेल्या या T20 मध्ये (India vs Sri Lanka 1st T20) टीम इंडियानं सर्वच पातळीवर वर्चस्व गाजवले. वेस्ट इंडिजच विरूद्धच्या दोन्ही सीरिज दणदणीत जिंकल्याचा आत्मविश्वास भारतीय टीममध्ये दिसला. भारताने पहिल्यांदा बॅटींग करत 2 आऊट 199 रन केले. त्याला उत्तर देताना श्रीलंकेची टीम निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 6 आऊट 137 रनच करू शकली. टीम इंडियाच्या या विजयात 3 सकारात्मक गोष्टी (3 Positive for India) घडल्या आहेत.

इशानची आक्रमक खेळी

विकेटकिपर बॅटर इशान किशनसाठी वेस्ट इंडिज विरूद्धची सीरिज (India vs West Indies ) खराब गेली होती. त्याला त्या सीरिजमध्ये रन काढण्यासाठी चांगलेच झगडावे लागले. त्यानंतरही टीम मॅनेजमेंटला त्याच्यावर विश्वास कायम ठेवत त्याला ओपनिंगला संधी दिली. इशाननं श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या मॅचमध्ये या संधीचा फायदा उठवला.

इशानने मुक्तपणे फटकेबाजी केली. त्याने सुरूवातीपासून आक्रमण करत श्रीलंकेला बॅक फुटवर ढकलले. T20 इंटरनॅशनलमधील त्याची दुसरी हाफ सेंच्युरी फक्त 30 बॉलमध्ये पूर्ण केली. रोहित शर्मा आऊट झाल्यानंतर इशान काही काळ स्लो झाला होता. पण, त्याने 16 ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये 15 रन करत त्याची भरपाई केली. तो 56 बॉलमध्ये 10 फोर आणि 3 सिक्ससह 89 रन काढून आऊट झाला. T20 इंटरनॅशनलमध्ये कोणत्याही भारतीय विकेट किपरचा हा सर्वोच्च वैयक्तिक स्कोअर (3 Positive for India) आहे.

Explained: इशान किशन विराट कोहलीपेक्षाही महागडा का ठरला?

श्रेयसची फटकेबाजी

श्रीलंकेविरूद्ध टीम इंडियानं आक्रमक सुरूवात केली होती. रोहित शर्मा 12 व्या ओव्हरमध्ये आऊट झाला त्यावेळी टीम इंडियाचा स्कोअर 1 आऊट 111 असा होता. या चांगल्या सुरूवातीचा फायदा घेण्यासाठी व्यंकटेश अय्यर किंवा संजू सॅमसन हा आक्रमक बॅटर नंबर 3 वर खेळण्यासाठी येईल असा अंदाज होता. पण, टीम मॅनेजमेंटनं मुळ योजनेनुसार श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) तीन नंबरवर बॅटींगला पाठवले.

श्रेयसनं सुरूवात संथ केली. त्याने पहिल्या 10 बॉलमध्ये फक्त 11 रन काढले होते. त्यावेळी हा डावपेच फसला असंच वाटत होतं. पण, श्रेयसनं नंतर त्याची भरपाई केली. इशान किशन आऊट झाल्यानंतर त्याने शेवटच्या दोन ओव्हर्समध्ये दमदार फटकेबाजी केली. त्याने फक्त 28 बॉलमध्ये नाबाद 57 रन काढले. T20 टीममधील श्रेयसची जागा अद्याप अनिश्चित आहे. श्रेयसला यंदा तीन नंबरवर बॅटींग करण्याची मोठी संधी मिळाली. त्याने या संधीचा फायदा घेत Playing 11 मधील भक्कम दावेदारी (3 Positive for India) सादर केली.

बॉलर्सचा भेदक मारा

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) या अनुभवी बॉलर्सच्या पुनरागमनानंतर भारतीय टीमचा मारा अधिक संतुलीत झाला आहे. जडेजाला बॅटींगमध्ये फार संधी मिळाली नाही. पण, त्यानं मिडल ओव्हर्समध्ये अचूक बॉलिंग करत श्रीलंकेला जखडून ठेवले आणि दिनेश चंडीमलची विकेट घेत निकालाची उत्सुकता शेवटच्या ओव्हरपर्यंत राहणार नाही, याची काळजी घेतली.

जसप्रीत बुमराहला वेस्ट इंडिज विरूद्ध विश्रांती देण्यात आली होती. श्रीलंकेविरूद्धच्या मॅचमध्येही व्यंकटेश अय्यर आणि दीपक हुड्डा यांना बॉलिंगचा सराव अधिक व्हावा म्हणून बुमराहला संपूर्ण 4 ओव्हर्स मिळाल्या नाहीत. पण, त्यातही त्याने अचूक यॉर्कर आणि स्लोअर वन टाकत श्रीलंकन बॅटर्सना अडचणीत आणले. बुमराहाच्या समावेशानंतर भारतीय बॉलिंग वेगळी भासते हे पहिल्या T20 मध्ये (3 Positive for India) दिसले.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

 

error: