फोटो – ट्विटर, बीसीसीआय

भारत विरूद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात मोहालीमध्ये झालेली टेस्ट ही रवींद्र जडेजाच्या स्वप्नवत (Jadeja Epic Show) कामगिरीसाठी लक्षात राहणार आहे. जडेजानं बॅट आणि बॉल या दोन्ही जोरावर श्रीलंकन टीमला लोळवलं. 150 पेक्षा जास्त रन आणि इनिंगमध्ये 5 पेक्षा जास्त विकेट्स घेणारा जडेजा हा सहावा क्रिकेटपटू ठरला आहे. जडेजाच्या या कामगिरीमुळे टीम इंडियानं श्रीलंकेचा 1 इनिंग आणि 222 रननं दणदणीत पराभव केला.

जडेजा, जडेजा आणि जडेजा

मोहाली टेस्टमध्ये 3 दिवसांमध्ये 3 इनिंग झाल्या. या तीन्ही इनिंग जडेजानं गाजवल्या. अस्सल ऑल राऊंडर काय असतो हे जडेजानं या टेस्टमध्ये पुन्हा एकदा दाखवून दिलं. तो सातव्या क्रमांकावर बॅटींगला आला. त्यानं सुरूवातीला ऋषभ पंतला (Rishbah Pant) साथ दिली. पंतच्या फटकेबाजीचा दुसऱ्या साईडनं मनसोक्त आनंद घेतला.

जडेजानं मोहाली टेस्टच्या दुसऱ्या दिवशी बॅटींगनं भांगडा केला. दुसऱ्या दिवसाच्या अगदी सुरूवातीपासूनच त्यानं श्रीलंकन बॉलर्सवर वर्चस्व गाजवले. टेस्ट करिअरमधील दुसरी सेंच्युरी झळकावली. त्या सेंच्युरीनंतरही तो थांबला नाही.

जडेजानं पहिल्या इनिंगमध्ये नाबाद 175 रन (Jadeja Epic Show)  केले. हे रन करण्यासाठी त्यानं 228 बॉल घेतले. त्याचा स्ट्राईक रेट 76.75 इतका होता. यामध्ये त्याने 17 फोर आणि 3 सिक्सचा वर्षाव केला. सेंच्युरी करण्याठी 160 बॉल घेणाऱ्या जडेजानं पुढील 75 रन हे 78 बॉलमध्ये पूर्ण केले. त्याचबरोबर डबल सेंच्युरीच्या मोहात न पडता मॅनेजमेंटला टीम घोषित करण्याचा निरोपही पाठवला.

श्रीलंकेला कोंडले

मोहाली टेस्टचा पहिला बॉल पडण्यापूर्वीच टीम इंडियाचे पारडे जड होते. पहिल्या इनिंगमध्ये 8 आऊट 574 रन केल्यानंतर भारतीय टीम मॅच जिंकणार हे स्पष्ट झाले होते. पण, ही मॅच 3 दिवसांच्या आत संपवण्याची कामगिरी भारतीय बॉलर्सनं केली. त्यांनी श्रीलंकेला मोठ्या स्कोअरच्या ओझ्यात दाबून टाकले.

श्रीलंकेची पहिली इनिंग 174 रनवर संपुष्टात आली. एकट्या जडेजानं संपूर्ण टीमपेक्षा पहिल्या इनिंगमध्ये जास्त रन केले. त्याने दुसऱ्या दिवशी श्रीलंकेचा कॅप्टन करूणारत्नेची सर्वात मोठी विकेट घेतली. त्यानंतर तिसऱ्या दिवशी श्रीलंकेची लोअर ऑर्डर संपवत त्या इनिंगमध्ये 5 विकेट्स (Jadeja Epic Show) घेतल्या.

ऋषभ पंतनं गाजवला पहिला दिवस, टीम इंडियाची भक्कम सुरूवात

दिवसभरात 16 विकेट्स

श्रीलंकेनं तिसऱ्या दिवशी फक्त 67 ओव्हर्समध्ये 16 विकेट्स गमावल्या. जडेजा आणि अश्विननं गाजवलेल्या या दिवसाची सुरूवात जसप्रीत बुमराहनं (Jasprit Bumrah)  महत्त्वाची विकेट मिळवून केली. दिवसाच्या पहिल्या तासामध्ये भारतीय बॉलर्सना एकही विकेट मिळाली नव्हती. ती कोंडी फोडण्याचं काम बुमराहनं केलं. बुमराहनं कोंडी फोडली आणि त्यानंतर जडेजा आणि अश्विननं त्यांचं नेहमीचं काम केलं.

श्रीलंकेच्या दुसऱ्या इनिंगमध्ये जडेजा आणि अश्विन या दोघांनीही 4-4 विकेट्स घेतल्या. अश्विननं यावेळी कपिल देव (Kapil Dev) य़ांचा 434 टेस्ट विकेट्सचा रेकॉर्ड मोडला. तो आता टेस्ट क्रिकेटच्या इतिहासाती भारताचा दुसरा यशस्वी बॉलर बनला. विराट कोहलीची 100 वी टेस्ट म्हणून सुरू होण्यापूर्वी गाजलेली ही टेस्ट अश्विनचा ऐतिहासिक रेकॉर्ड आणि जडेजाची स्वप्नवत ऑल राऊंड कामगिरी (Jadeja Epic Show) यामुळे लक्षात राहणार आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error: