फोटो – ट्विटर, बीसीसीआय

टीम इंडियानं बेंगळुरूमध्ये झालेल्या डे-नाईट टेस्टमध्ये (India vs Sri Lanka, Pink Ball Test) श्रीलंकेचा 238 रननं दणदणीत पराभव केला. भारतीय टीमनं मोहालीप्रमाणेच ही टेस्ट देखील फक्त 3 दिवसांमध्ये संपवली. 447 रनच्या टार्गेटचा पाठलाग करताना श्रीलंकेची दुसरी इनिंग 208 रनवर संपुष्टात आली. त्याचबरोबर भारताने ही सीरिज 2-0 अशी जिंकली. तब्बल 28 वर्षांनी भारतानं श्रीलंकेवर टेस्ट सीरिजमध्ये क्लीन स्वीप (India clean Sweep Sri Lanka) केला आहे.

करूणारत्ने झुंजला

श्रीलंकेच्या या मोठ्या पराभवातही कॅप्टन दिमुख करूणारत्ने (Dimuth Karunaratne) याने सेंच्युरी झळकावली. बॅटींगसाठी अवघड असलेल्या बेंगळुरूच्या पिचवर करूणारत्ने भारतीय बॉलर्सच्या विरूद्ध एकटा लढला. त्याने 166 बॉलमध्ये 14 फोरच्या मदतीनं टेस्ट क्रिकेटमधील 14 वी सेंच्युरी पूर्ण केली. भारताविरूद्धची त्याची ही पहिलीच सेंच्युरी आहे.

करूणारत्ने आणि कुसल मेंडिस या जोडीनं सुरूवातीच्या सत्रात काही चांगले शॉट्स लगावत भारतीय बॉलर्सवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला. मेंडिसनंही हाफ सेंच्युरी झळकावली. या दोघांनी दुसऱ्या विकेट्ससाठी 97 रनची पार्टनरशिप केली. अश्विननं मेंडिसला (54) आऊट करत ही जोडी फोडली.

श्रीलंकेची घसरगुंडी

अश्विननं तिसऱ्या दिवशी पहिलं यश मिळवून दिल्यानंतर श्रीलंकेची घसरगुंडी उडाली. भारतीय बॉलर्ससमोर श्रीलंकेच्या 11 पैकी 8 बॅटर्सना दोन अंकी रन करता आले नाहीत. करूणारत्ने आणि मेंडिस यांच्या शिवाय फक्त निरोशेन डिकवालानं 12 रन करत दोन अंकी रन केले. श्रीलंकेच्या लोअर ऑर्डरनं पहिल्या इनिंगप्रमाणेच दुसऱ्या इनिंगमध्येही फक्त हजेरी लावण्याचे काम (India clean Sweep Sri Lanka)  केले.

भारताकडून दुसऱ्या इनिंगमध्ये आर. अश्विन (R. Ashwin) सर्वात यशस्वी बॉलर ठरला. त्याने 4 विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराहनं (Jasprit Bumrah) 3 विकेट्स घेत टर्निंग पिचवरही आपण धोकादायक असल्याचे दाखवले. बुमराहनं एका अप्रतिम बॉलवर संपूर्णपणे सेट असलेल्या करूणारत्नेला बोल्ड केले. त्याने 107 रन काढले. अक्षर पटेलला 2 तर रवींद्र जडेजाला 1 विकेट मिळाली.

IND vs SL: बुमराहनं तोडली श्रीलंकेची कंबर, कपिलची केली बरोबरी

नव्या पिढीची कमाल

रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli)  या आजी-माजी कॅप्टननं या टेस्ट सीरिजमध्ये एकही हाफ सेंच्युरी केली नाही. त्यानंतरही भारताने दोन्ही टेस्ट अगदी आरामात जिंकल्या. पहिली टेस्ट रवींद्र जडेजाच्या ऑल राऊंड खेळामुळे गाजली. तर दुसऱ्या टेस्टमध्ये श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत या नेक्स्ट जनरेशनच्या खेळामुळे लक्षात राहणार आहे.

श्रेयसनं बेंगळुरू टेस्टमधील दोन्ही इनिंगमध्ये हाफ सेंच्युरी केली. त्याच्या पहिल्या दिवसाच्या 92 रनच्या खेळीनं मॅचचं पारडं भारताकडं (India clean Sweep Sri Lanka) झुकलं. तर पंतनं दुसऱ्या इनिंगमध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात फास्ट हाफ सेंच्युरीचा भारतीय रेकॉर्ड केला. त्यामुळेच या टेस्टचा ‘प्लेयर ऑफ द मॅच’ श्रेयस अय्यर ठरला. तर ऋषभ पंत हा ‘प्लेयर ऑफ द सीरिज’ चा मानकरी ठरला.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: