फोटो – ट्विटर

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातील वन-डे आणि टी20 टीमची घोषणा झाली आहे. या टीममध्ये मुंबईकर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) कडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. पहिल्याच टेस्टमध्ये सेंच्युरी झळकावणाऱ्या टीम इंडियाच्या बॅटरमध्ये पृथ्वीचा समावेश होतो. आक्रमक ओपनर असलेल्या पृथ्वीकडे भारतीय क्रिकेटचे भविष्य म्हणून पाहिले जाते. पण त्याच्याकडे टीम निवडीत दुर्लक्ष करण्यात आले आहे. या दुर्लक्षामुळे पृथ्वी निराश झाला (Prithvi Shaw Unhappy) असून त्याने एका व्हिडीओतून त्याची भावना मांडली आहे.

काय आहे VIDEO?

पृथ्वी शॉ ने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. त्याला ‘अकेले है खडे’, हे कॅप्शन त्याने दिले आहे. पृथ्वीने या व्हिडीओत जुन्या गाण्यावर त्याच्या कारकिर्दीमधील फोटो लावले आहेत. लहानपणीच्या काळातील क्रिकेट, अंडर 19 वर्ल्ड कप, टीम इंडियातील पदार्पण या वेगवेगळ्या प्रवासातील फोटो त्याने या गाण्यावर लावले आहेत. या व्हिडीओमधून पृथ्वीच्या मनाची निराश अवस्था दिसत आहे. निवड समितीनं संधी न दिल्यानं पृथ्वी निराश झाल्याचे (Prithvi Shaw Unhappy) मत हा व्हिडीओ पाहून फॅन व्यक्त करत आहेत.

कधी मिळली शेवटची संधी

पृथ्वी शॉ गेल्या वर्षी श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाचा सदस्य होता. त्या सीरिजमध्ये (India vs Sri Lanka) त्याला वन-डे आणि T20 क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळाली. श्रीलंकेविरूद्ध त्याने T20 इंटनॅशनलमध्ये पदार्पण केले. पदार्पणातील मॅचमध्ये तो पहिल्याच बॉलवर आऊट झाला.

पृथ्वीचा वन-डे क्रिकेटमधील रेकॉर्ड चांगला आहे. त्याने आजपर्यंत 6 वन-डेमध्ये 31.50 च्या सरासरीनं 189 रन केले आहेत. त्यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट 113.85 आहे. तर पृथ्वीने 5 टेस्टमध्ये 42.37 च्या सरासरीनं 339 रन केले आहेत. यामध्ये एक सेंच्युरी आणि दोन हाफ सेंच्युरीचा समावेश आहे.

पृथ्वी शॉ ने मागील वर्षी झालेल्या विजय हजारे करंडक स्पर्धेत (Vijay HazareTrophy)ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्याने त्या स्पर्धेतील 8 मॅचमध्ये 827 रन केले. हा एक रेकॉर्ड आहे. या स्पर्धेत त्याची सरासरी ही 165.40  तर स्ट्राईक रेट 138.29 इतका जबरदस्त होता. 

U19 World Cup: लॉर्ड्सवर विजय ते देश सोडण्याची वेळ वर्ल्ड कप विजेते कॅप्टन सध्या काय करतात?

 पृथ्वी शॉ ने निराश होऊ नये कारण…

टीम इंडियात निवड न झाल्याने वाईट वाटणे स्वाभाविक आहे. पण, पृथ्वीला निराश होण्याची गरज नाही. पृथ्वीला दिल्ली कॅपिटल्सनं (Delhi Capitals) रिटेन केले आहे. आयपीएलमधील एका बड्या टीमनं विश्वास दाखवलेल्या 4 खेळाडूंपैकी तो आहे. आगामी आयपीएलमध्ये (IPL 2022) ओपनर म्हणून पृथ्वीला स्वत:ला सिद्ध कऱण्याची संधी आहे. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली तर त्याला टीम इंडियाच्या बाहेर फार काळ ठेवता येणार नाही.

त्याचबरोबर पृथ्वी ओपनर म्हणून खेळतो. या जागेसाठी टीम इंडियात रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन आणि ऋतूराज गायकवाड यांची निवड झाली आहे. त्यामुळे देखील पृथ्वीला वेस्ट इंडिज दौऱ्यात संधी मिळाली नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पृथ्वी सध्या फक्त 22 वर्षांचा आहे. तो त्याच्या नैसर्गिक पद्धतीनं खेळला आणि त्या खेळीत सातत्य टिकवलं तर त्याच्यासाठी टीम इंडियाचे दार नक्की उघडेल. त्यामुळे ही वेळ पृथ्वीसाठी निराश होण्याची (Prithvi Shaw Unhappy) नाही, तर बॅटनं मैदान गाजवण्याची आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

    

error: