टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी (India Tour Of South Africa) टीम इंडिया A सध्या आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. दोन्ही देशांच्या A टीममध्ये सध्या अनधिकृत टेस्ट मॅच (India A vs South Africa first unofficial test) सुरु आहे. या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी भारताच्या अभिमन्यू इश्वरननं सेंच्युरी झळकावली (Abhimanyu Easwaran Century) आहे. टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्यात अभिमन्यू स्टँडबाय खेळाडू होता. त्यावेळी टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) जोडीनं त्याच्या निवडीवर नाराजी व्यक्त केली होती.

कॅप्टनची सेंच्युरी हुकली

दक्षिण आफ्रिका A नं पहिल्यांदा बॅटींग करत 7 आऊट 509 असा विशाल स्कोअर केला आहे. त्याला उत्तर देताना इंडिया A नं 1 आऊट 125 वरुन पुढे खेळण्यास सुरूवात केली. खराब प्रकाशामुळे तिसऱ्या दिवशी खेळ उशीरा सुरू झाला. अभिमन्यूनं कॅप्टन प्रियांक पांचाळ (Priyank Panchal) सोबत पुढे खेळण्यास सुरूवात केली.

दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस 45 रनवर नाबाद असेल्या प्रियांकनं हाफ सेंच्युरी लगेच पूर्ण केली. त्याची सेंच्युरी मात्र फक्त 4 रननं हुकली. त्यानं 171 बॉलमध्ये 14 फोरच्या मदतीनं 96 रन केले. जॉर्ज लिंडेनं त्याला आऊट केलं. अभिमन्यू आणि प्रियांक या जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी 142 रनची पार्टनरशिप केली.

निवड समिती आणि कॅप्टनमध्ये यापूर्वीही झालाय वाद, वाचा कोण ठरलं तेव्हा सरस

अभिमन्यूची सेंच्युरी

कॅप्टन प्रियांक आऊट झाल्यानंतरही अभिमन्यूनं त्याचा चिवट खेळ कायम ठेवला. त्यानं सिडनी टेस्टचा हिरो हनुमा विहारी (Hanuma Vihari) सोबत 42 रनची पार्टनरशिप केली. विहारीला यावेळी मोठा स्कोअर करण्यात अपयश आले. तो 25 रन काढून आऊट झाला.

विहारी आऊट झाल्यानंतर अभिमन्यूनं त्याची सेंच्युरी (Abhimanyu Easwaran Century)  पूर्ण केली. त्यानं 209 बॉलमध्ये 16 फोरसह 109 रन काढले.सिमापालानं त्याला आऊट केले. दक्षिण आफ्रिकेकडून जॉर्ज लिंडे आणि सिमापालेनं प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर मुंबई इंडियन्सच्या मार्को जेन्सनला (Marco Jancen) तिसऱ्या दिवसाच्या अखेरपर्यंत एकही विकेट मिळाली नव्हती. तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस टीम इंडिया A नं 4 आऊट 308 रन केले आहेत. सध्या बाबा अपराजित 19 तर उपेंद्र यादव 5 रन काढून खेळत आहेत.

मुंबई इंडियन्सनं पहिल्या मॅचमध्ये निवडलेला Marco Jansen कोण आहे?

अभिमन्यूची कारकिर्द

बंगालकडून देशांतर्गत स्पर्धेत खेळणाऱ्या 26 वर्षांच्या अभिमन्यूनं आजवर 64 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 43.57 च्या सरासरीनं 4401 रन केले असून यामध्ये 13 सेंच्युरींचा समावेश आहे. तर 62 लिस्ट A मॅचमध्ये 48.72 च्या सरासरीनं 2875 रन काढले आहेत. 21 T20 मॅचमध्ये त्यानं 39.57 च्या सरासरीनं 554 रन काढले (Abhimanyu Easwaran Century) आहेत.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: