
भारतीय क्रिकेट फॅन्सना गेल्या काही दिवसांपासून ज्याची प्रतीक्षा होती, त्या श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची (India In Sri Lanka 2021) घोषणा झाली आहे. ‘क्रिकेट मराठी’ ने यापूर्वी एक महिन्यांपूर्वीच दिलेल्या वृत्तानुसार शिखर धवनची (Shikhar Dhawan) या टीमचा कॅप्टन म्हणून घोषणा करण्यात आली आहे. तर, भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) हा व्हाईस कॅप्टन असेल. अनुभवी आणि तरुण खेळाडूंचे संतुलन असलेल्या या 20 जणांच्या या टीममध्ये 5 नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
धवन पहिल्यांदाच कॅप्टन
विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली प्रमुख खेळाडू जुलै महिन्यात इंग्लंडमध्ये आहेत. त्यामुळे या टीममध्ये नव्या खेळाडूंना संधी मिळणार हे उघड होते. या टीमचं नेतृत्त्व अनुभवी शिखर धवनकडे देण्यात आले आहे. अनुभवी शिखर धवन या दौऱ्याच्या निमित्तानं पहिल्यांदाच टीम इंडियाचा कॅप्टन बनला आहे.
धवनकडे 142 वन-डे मॅचचा अनुभव आहे. या फॉरमॅटमध्ये 6000 रनचा टप्पा पूर्ण करण्यासाठी त्याला आणखी 23 रनची गरज आहे. धवननं वन-डे क्रिकेटमध्ये 17 सेंच्युरी आणि 32 हाफ सेंच्युरी झळकावल्या आहेत. या आयपीएल सिझनच्या (IPL 2021) पहिल्या टप्प्यात शिखर धवनने सर्वात जास्त रन काढले आहेत.
भुवनेश्वर कुमार व्हाईस कॅप्टन
टीम इंडियाचा अनुभवी फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमार हा या टीमचा व्हाईस कॅप्टन असेल. भुवनेश्वर कुमारची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड न होणे हे आश्चर्यकारक मानले जात होते. भुवनेश्वरकडे 117 वन-डे आणि 48 T20 सामन्यांचा अनुभव आहे. यामध्ये त्याने अनुक्रमे 138 आणि 45 विकेट्स घेतल्या आहेत. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेल्या लिमिटेड ओव्हर्सच्या सीरिजमध्ये भुवनेश्वरनं दुखापपतीनंतर जोरदार कमबॅक केले होते.
‘सूत्रांच्या नावावर काहीही लिहू नका,’ चुकीच्या बातम्या छापणाऱ्यांना भुवनेश्वर कुमारनं सुनावलं
5 नवे चेहरे
श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियामध्ये (India In Sri Lanka 2021) 5 नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal), ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad), नितीश राणा (Nitish Rana), कृष्णप्पा गौतम (K. Gowtham) आणि चेतन सकारिया (Chetan Sakariya) या पाच जणांना पहिल्यांदाच सीनियर टीममध्ये संधी मिळाली आहे.
देवदत्त, ऋतुराज, नितीश आणि गौतम यांनी गेले काही सिझन देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. या टीममध्ये चेतन सकारिया याची निवड आश्चर्य मानली जात आहे. चेतननं याच आयपीएल सिझनमध्ये राजस्थान रॉयल्सकडून पदार्पण केले होते. 7 आयपीएल मॅचनंतर त्याचा थेट राष्ट्रीय टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.
कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि नवदीप सैनी यांना पुन्हा एकदा टीम इंडियामध्ये संधी मिळाली आहे. तर हार्दिक पांड्या, मनिष पांडे आणि युजवेंद्र चहल या सीनियर खेळाडूंचाही टीममध्ये समावेश आहे. श्रेयस अय्यर आणि नटराजन यांचा दुखापतीमुळे विचार झालेला नाही.
‘क्रिकेट मराठी’ ने एक महिन्यापूर्वी म्हणजेच 11 मे रोजी 16 जणांची संभाव्य टीम जाहीर केली होती. यापैकी 15 जणांचा टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला आहे.
‘Cricket मराठी’ ने एक महिन्यांपूर्वी निवडलेली श्रीलंका दौऱ्याची टीम
काय आहे वेळापत्रक?
टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर ( India In Sri Lanka 2021) 3 वन-डे आणि 3 T20 मॅचची मालिका खेळणार आहे. 13 ते 18 जुलै दरम्यान वन-डे तर 21 ते 25 जुलैच्या दरम्यान T20 सीरिज होईल. कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता सर्व मॅच कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहेत.
श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडिया
ओपनिंग बॅट्समन | शिखर धवन (कॅप्टन), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड |
मिडल ऑर्डर | मनिष पांडे, सूर्यकुमार यादव, नितीश राणा |
विकेट किपर | संजू सॅमसन, इशान किशन |
ऑल राऊंडर | हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, कृष्णप्पा गौतम |
फास्ट बॉलर | भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन सकारिया |
स्पिन बॉलर्स | युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, राहुल चहर, वरूण चक्रवर्ती |
नेट बॉलर्स | इशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंग, साई किशोर, समरजीत सिंह |
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.