फोटो – सोशल मीडिया

टीम इंडियाचा फास्ट बॉलर आणि कर्नाटकचा (Karnataka) यशस्वी कॅप्टन विनय कुमारनं (Vinay Kumar) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. विनय कुमारची आंतरराष्ट्रीय कारकीर्द  लहान असली तरी कर्नाटककडून त्यानं दीर्घकाळ चांगली कामगिरी केली.  2004 पासून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या या ‘दावणगिरी एक्स्प्रेस’नं आता विश्रांतीची वेळ असल्याचं सांगत रिटायरमेंट जाहीर केली आहे.

चौथ्या क्रमांकाचा यशस्वी बॉलर

विनय कुमारनं (Vinay Kumar) 139 प्रथम श्रेणी मॅचमध्ये 504 विकेट्स घेतल्या. यामध्ये 442 रणजी ट्रॉफीमधील विकेट्सचा समावेश आहे. रणजी ट्रॉफीच्या (Ranji Trophy) इतिहासात राजेंदर गोयल (637), एस. व्यंकटराघवन (530) आणि सुनील जोशी (479) यांच्यानंतर तो चौथ्या क्रमांकाचा यशस्वी बॉलर आहे.

रणजी क्रिकेटमध्ये तो बॉलर म्हणून यशस्वी झालाच. त्याचबरोबर एक कॅप्टन म्हणूनही त्यानं कर्नाटकला देशांतर्गत क्रिकेटमध्ये अजिंक्य बनवलं. कर्नाटकची क्वार्टर फायनल किंवा सेमी फायनलमध्ये पराभूत होण्याची परंपरा विनय कुमारच्या कॅप्टनसीमध्येच मोडली. त्याच्या कॅप्टनसीमध्ये कर्नाटकनं 2013-14 च्या सिझनमध्ये 14 वर्षांनंतर रणजी ट्रॉफी स्पर्धा जिंकली. त्यानंतर त्यानं पुढच्या वर्षी देखील कर्नाटकला अजिंक्यपद मिळवून दिलं.

विनय कुमारच्या कॅप्टनसीखालील 2014-15 चा सिझन कर्नाटकसाठी ड्रीम सिझन होता. त्यावर्षी कर्नाटकनं रणजी ट्रॉफी, इराणी ट्रॉफी (Irani Trophy) आणि विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) या तीन मोठ्या स्पर्धा जिंकल्या होत्या. 2019 साली तो एक सिझनसाठी कर्नाटक सोडून पुद्दुच्चेरी (Puducherry) कडून क्रिकेट खेळला. त्या सिझनमध्येही त्यानं 45 विकेट्स घेतल्या होत्या.

आंतरराष्ट्रीय कारकीर्द

विनय कुमारची आंतरराष्ट्रीय कारकीर्द तेवढी बहरली नाही. त्यानं 2010 साली झिम्बाब्वे विरुद्ध वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर 2011-12 च्या सिझनमध्ये तो ऑस्ट्रेलिया विरुद्ध पर्थमध्ये त्याच्या क्रिकेट करियरमधील एकमेव टेस्ट मॅच खेळला.

विनय कुमार (Vinay Kumar) भारताकडून 31 वन-डे आणि 9 T-20 मॅच खेळला. यामध्ये त्यानं अनुक्रमे 38 आणि 10 विकेट घेतल्या. 2013 साली त्याच्या होम ग्राऊंडवर बंगळुरुमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच खेळला. त्या वन-डे मध्ये रोहित शर्मानं (Rohit Sharma) त्याच्या वन-डे करियरमधील पहिली डबल सेंच्युरी झळकावली होती.

( वाचा : भुवनेश्वर कुमार, स्विंगच्या राजाला दुखापतींचा शह! )

आयपीएलचा मोठा अनुभव

विनय कुमार तब्बल 11 वर्ष आयपीएल खेळला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, कोची टस्कर्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स या चार टीमचं त्यानं प्रतिनिधित्व केलं. या कालावधीमध्ये त्यानं 20.20 च्या सरासरीनं 105 विकेट्स घेतल्या. कोलकाता नाईट रायडर्स (2014) आणि मुंबई इंडियन्स (2015, 2017) या आयपीएल विजेत्या टीमचाही तो सदस्य होता.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: