फोटो – ट्विटर

जगातील सर्वोत्तम मोठी क्रिकेट लीग म्हणून इंडियन प्रीमिअर लीग (India Premier League 2022) ओळखली जाते. वेगवेगळ्या देशातील स्टार खेळाडू या लीगमध्ये खेळण्यासाठी धडपड करत असतात. सध्याच्या घडीला नॅशनल टीममध्ये जाण्याची वाटही आयपीएलमधून जाते असे मानले जाते. आयपीएलमध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवला की मर्यादित षटकांच्या फॉर्मेटमध्ये नॅशनल टीमचे प्रतिनिधित्व करण्याची संधी वाढते. स्पर्धेत देशविदेशातील स्टार आणि तरुण खेळाडू सहभागी होत असल्याने या लीगची लोकप्रियताही प्रचंड वाढली आहे. 2008 पासून सुरू झालेला हा प्रवास अविरत सुरू असून यंदा आयपीएलच्या 15 व्या सीझनमध्ये लखनौ आणि अहमदाबाद या दोन नवीन टीमही सहभागी होत आहेत. अहमदाबादच्या हेड कोचपदी आशिष नेहराची (Ashish Nehra Ahmedabad Coach) वर्णी लागणार आहे.

10 टीम भिडणार

आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये 10 टीम एकमेकांशी भिडताना दिसणार आहेत. लखनौ आणि अहमदाबाद या दोन टीमची नव्याने एन्ट्री झाली आहे. त्यामुळे आयपीएल अधिक रोमांचक होईल आणि क्रीडा फॅन्सला आणखी स्टार खेळाडूंचा परफॉर्मन्स पाहण्याची संधी मिळणार आहे. यामुळे मॅचची संख्याही वाढणार आहे.

पाकिस्तानी खेळाडूकडून बोर्डाची पोलखोल, फिक्सिंगबाबत केला गंभीर आरोप

विशेष म्हणजे आयपीएलमध्ये 10 टीम खेळवण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी 2011 मध्ये पुणे वॉरिअर्स इंडिया (Pune Warriors India) आणि कोची टस्कर्स केरळा (Kochi Tuskers Kerala) या दोन टीम नव्याने स्पर्धेत उतरल्या होत्या. मात्र यानंतर असा प्रयोग करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

दुसरी सर्वात महागडी टीम

आयपीएलमध्ये आणखी दोन टीम खेळवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतल्यानंतर अनेक बडे ग्रुप लिलावामध्ये उतरले होते. मात्र उद्योगपती संजीव गोयंका यांच्या RPSG  (RP Sanjiv Goenka Group) ग्रुपने तब्बल 7090 कोटी लखनौ टीम खरेदी केली तर सीव्हीसी कॅपिटल पार्टनरने तब्बल 5625 कोटी मोजून अहमदाबाद टीम (Ashish Nehra Ahmedabad Coach) खरेदी केली. लखनौ टीमनंतर अहमदाबाद ही सर्वात महागडी टीम ठरली.

आयपीएलच्या 15 व्या सिझनसाठी या दोन्ही टीम आपली मोट बांधण्याच्या प्रयत्नात आहे. मेगा ऑक्शनपूर्वी हेडकोच, बॉलिंग, बॅटर कोच आणि मेन्टॉरसाठी या टीमने फिल्डिंग लावली आहे. याच दरम्यान अहमदाबाद टीमच्या हेडकोचपदी टीम इंडियाकडून वर्ल्डकप गाजवणाऱ्या गोलंदाजाची निवड होणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

नेहराच्या नावावर लागणार मोहोर

टीम इंडियाचा माजी फास्ट बॉलर आशिष नेहरा अहमदाबाद टीमचा हेडकोच (Ashish Nehra Ahmedabad Coach) होणार असल्याचे वृत्त आहे. तर इंग्लंडचे माजी ओपनर विक्रम सोलंकी (Vikram Solanki) डायरेक्टर ऑफ क्रिकेट आणि वर्ल्डकप विजेत्या टीम इंडियाचे कोच गॅरी कर्स्टन (Gary Kirsten) या टीमचे मेन्टॉर होणार आहेत. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होईल.

टीम इंडियाच्या तोंडचं पाणी पळवणारा झाला सर्वात महागड्या टीमचा कोच!

आशिष नेहरा आणि गॅरी कर्स्टन हे याआधी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) कोचिंग स्टाफमध्येही दिसले होते. गॅरी कर्स्टन यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने 28 वर्षानंतर वन डे वर्ल्डकप जिंकला होता आणि आशिष नेहरा या टीमचे प्रतिनिधित्व करत होता. गॅरी कर्स्टन हे दिल्ली डेअरडेव्हील्सचे (आता दिल्ली कॅपिटल्स/ Delhi Capitals) हेड कोचही होते.

नेहराचा अविस्मरणीय स्पेल

2003 चा वन डे वर्ल्डकप (2003 ODI World Cup) क्रीडा फॅन्स विसरु शकत नाही. सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) नेतृत्वाखाली मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने फायनलपर्यंत धडक दिली होती. या टीममध्येही आशिष नेहरा (Ashish Nehra) होता. स्पर्धेमध्ये आशिष नेहराने टाकलेला एक स्पेल आजही सर्वांच्या लक्षात आहे.

डर्बनच्या मैदानावर झालेल्या या मॅचमध्ये टीम इंडियाने इंग्लंडचा दारुण पराभव केला होता. या मॅचमध्ये आशिष नेहरा (Ashish Nehra Ahmedabad Coach) याने आपल्या करिअरमधील सर्वोत्तम स्पेल टाकला होता. नेहराने 23 रन देऊन 6 विकेट्स घेतल्या होत्या. विशेष म्हणजे पायाच्या दुखापतीमुळे तो ही मॅच खेळण्याच्या मनस्थितीत नव्हता. परंतु केळी खाऊन नेहरा मैदानात उतरला आणि पुढे त्याने ऐतिहासिक स्पेल टाकला.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading