फोटो – ट्विटर, आयसीसी

टीम इंडियानं गेल्या वर्षी विदेशात जिंकलेल्या टेस्टमध्ये शार्दुल ठाकूरच्या (Shardul Thakur) खेळाचा मोठा वाटा आहे. ब्रिस्बेन टेस्टमध्ये प्रमुख खेळाडू जखमी झाल्यानंतर त्याला संधी मिळाली. शार्दुलने हाफ सेंच्युरी झळकावत त्या संधीचे सोने केले. ओव्हलमध्ये सर्व टॉप ऑर्डर कोसळल्यानंतर आक्रमक हाफ सेंच्युरी झळकावत टीम इंडियाला लढण्यासाठी आवश्यक स्कोर दिला. ब्रिस्बेन आणि ओव्हल या दोन्ही टेस्ट टीम इंडियानं जिंकल्या. त्यानंतर सध्या जोहान्सबर्गमध्ये सुरु असलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) टेस्टमध्ये शार्दुल ठाकूरनं 5 विकेट्स (Shardul Thakur 5 Wickets) घेत आफ्रिकेला हादरा दिला आहे.

शार्दुलचा टॉप स्पेल

दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या दिवशी 1 आऊट 36 या स्कोअरवरुन सावध सुरूवात केली होती. डीन एल्गार (Dean Elgar) आणि किगन पीटरसननं 50 पेक्षा जास्त रनची पार्टनरशिप केली. त्यांनी पहिले सेशन खेळून काढले. ही जोडी टीम इंडियासाठी अडचणीची ठरत आहे, असे दिसत होते. त्यावेळी कॅप्टन राहुलनं शार्दुलच्या हातामध्ये बॉल दिला.

शार्दुलने दुसऱ्या ओव्हरमध्ये टीम इंडियाला यश मिळवून दिले. त्याने सर्वप्रथम कॅप्टन एल्गारला आऊट केले. या धक्क्यातून आफ्रिकेला सावरण्याची संधीच त्याने दिली नाही. त्यानं  पहिली हाफ सेंच्युरी झळकावलेल्या पीटरसनला (62) आऊट केले. मयांक अग्रवालने त्याचा कॅच पकडण्यात कोणतीही चूक केली नाही. पीटरसन आऊट झाल्यानंतर शार्दुलचा उत्साह आणखी वाढला. त्याने लगेच रासी व्हेन डेर डुसेनला आऊट करत लंचपूर्वी आफ्रिकेला अडचणीत आणले. शार्दुलने दक्षिण आफ्रिकेला 3 झटपट धक्के दिले. त्यामुळे आफ्रिकेची लंचपर्यंत अवस्था 4 आऊट 102 अशी झाली (Shardul Thakur 5 Wickets) होती.

असा घडला ‘पालघर एक्स्प्रेस’ शार्दुल ठाकूर!

लंचनंतर पुन्हा कमाल

दक्षिण आफ्रिकेनं लंचनंतर पुन्हा एकदा पार्टनरशिप करण्यास सुरूवात केली. पहिल्या टेस्टमध्ये आत्मविश्वासनं बॅटींग करणाऱ्या तेम्हा बवूमानं पदार्पण करणारा विकेट किपर काईल वरेनासोबत आफ्रिकेची इनिंग सावरली. त्या दोघांनी 5 व्या विकेटसाठी 60 रनची पार्टनरशिप केली. त्यावेळी शार्दुल पुन्हा एकदा टीमच्या मदतीला धावला.

शार्दुलने सर्वप्रथम वरेनाला आऊट करत ही जोडी फोडली. त्यानंतर त्याने चिवट बावूमाचाही अडथळा दूर करत टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच एका इनिंगमध्ये 5 विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड (Shardul Thakur 5 Wickets) पूर्ण केला.

सहावा भारतीय बॉलर

जोहान्सबर्गमध्ये पाच विकेट्स घेणारा शार्दुल हा सहावा भारतीय बॉलर आहे. यापूर्वी अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ, श्रीसंत, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या पाच बॉलर्सनी या मैदानात एका इनिंगमध्ये पाच विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. आता या मंडळींच्या यादीत शार्दुलही दाखल झाला (Shardul Thakur 5 Wickets) आहे.

जोहान्सबर्गमध्ये टीम इंडियानं आजवर एकही टेस्ट गमावलेली नाही. भारतीय टीमची पहिली इनिंग 202 रनवर संपुष्टात आली होती. त्यानंतर शार्दुलने 5 विकेट्स घेतल्यानं या टेस्टमधील रंगत वाढली आहे. ब्रिस्बेन आणि ओव्हलवर बॅटनं टीम इंडियाला वाचवणाऱ्या शार्दुलनं या टेस्टमध्ये बॉलनं आधार दिला आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: