फोटो – ट्विटर

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील टेस्ट सीरिज सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. या सीरिजचा निर्णय आता केपटाऊनमध्ये होणाऱ्या तिसऱ्या आणि शेवटच्या टेस्टमध्ये होणार आहे. गेल्या 30 वर्षात दक्षिण आफ्रिकेनं केपटाऊनमध्ये टीम इंडियाविरुद्ध एकही टेस्ट गमावलेली नाही. दोन्ही देशांमध्ये इथे आजवर 5 टेस्ट झाल्या असून यामध्ये 3 आफ्रिकेनं जिंकल्या आहेत, तर 2 ड्रॉ झाल्या आहेत. या मैदानात भारतीय खेळाडूंनी खेळलेल्या 3 अविस्मरणीय खेळी कोणत्या (Team India Cape town memory) आहेत ते पाहूया

सचिन तेंडुलकर – 169 (1996-97)

टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील पहिल्या टेस्टमध्ये भारतीय बॅटींग सपशेल अपयशी ठरली होती. टीम इंडिया पहिल्या इनिंगमध्ये 100 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 66 रनवर ऑल आऊट झाली. 328 रनचा पराभव सहन करत भारतीय टीम केपटाऊन टेस्टमध्ये उतरली होती,

केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेनं पहिल्यांदा बॅटींग करत 7 आऊट 529 असा विशाल स्कोअर केला. आफ्रिकेकडून गॅरी कस्टर्न, ब्रायन मॅकमिलन आणि लान्स क्लुसनर यांनी सेंच्युरी झळकावली होती. त्याला उत्तर देताना टीम इंडियाची अवस्था 5 आऊट 58 अशी बिकट झाली होती.

टीम इंडियावर ‘फॉलो ऑन’चे संकट होते. त्यावेळी कॅप्टन सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendular) अविस्मरणीय सेंच्युरी झळकावली. त्याने डोनाल्ड, पोलॉक, मॅकमिलन, क्लुसनर या आफ्रिकेच्या फास्ट बॉलर्सवर प्रतिहल्ला चढवत 169 रन (Team India Cape town memory) काढले. मोहम्मद अझहरूद्दीननं (Mohammad Azharuddin) सचिनला चांगली साथ दिली. अझरनं 114 रन काढले. या दोघांच्या सेंटच्युरीमुळे टीम इंडियाने ‘फॉलो ऑन’ वाचवला. पण भारतीय टीमला पराभव काही टाळता आला नाही.

सचिन तेंडुलकर – 146 (2010-11)

सचिन तेंडुलकरनं 14 वर्षांनी पुन्हा एकदा केपटाऊनमध्ये एक अविस्मरणीय सेंच्युरी झळकावली. दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या इनिंगमध्ये 362 रन केले होते. यामध्ये जॅक कॅलीसच्या (Jacques Kallis) 161 रनच्या खेळीचा समावेश होता. त्याला उत्तर देताना टीम इंडियाच्या 2 विकेट्स झटपट पडल्या.

3 भारतीय ज्यांनी दक्षिण आफ्रिकेत केले दमदार पदार्पण

सचिननं गौतम गंभीरच्या (93) मदतीनं टीम इंडियाची इनिंग सावरली. सचिननं परिस्थितीची जाणीव ठेवत संयमी खेळ केला. त्याने 314 बॉलमध्ये 17 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीनं 146 रन काढले. या शतकाच्या जोरावरच सचिननं टेस्ट क्रिकेटमधील 50 वी सेंच्युरी (3 memorable inning for Team India)  पूर्ण केली. हा रेकॉर्ड करणारा सचिन हा एकमेव क्रिकेटपटू आहे. त्याचप्रमाणे केपटाऊनमध्ये 2 सेंच्युरी करणारा सचिन हा एकमेव भारतीय आहे.

हरभजन सिंग – 7 विकेट्स (2010-11)

सचिन तेंडुलकरच्या 146 रनच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या इनिंगमध्ये 364 रन काढले. भारतीय टीमला 2 रनची नाममात्र आघाडी मिळाली होती. दुसऱ्या इनिंगमध्ये हरभजन सिंग (Harbhajan Singh) टीम इंडियाचा सर्वात यशस्वी बॉलर ठरला. त्याने 120 रन देत 7 विकेट्स घेतल्या. जॅक कॅलिसने दुसऱ्या इनिंगमध्येही सेंच्युरी (नाबाद 109) झळकावली. त्यामुळे टीम इंडियाला टेस्ट जिंकता आली नाही. पण हरभजन सिंगने भारताबाहेरचा सर्वोत्तम स्पेल (Team India Cape town memory) त्या टेस्टमध्ये केपटाऊमध्ये केला.

3 कारणांमुळे हनुमा विहारी तिसऱ्या टेस्टमध्ये खेळणे आवश्यक

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: