फोटो – ट्विटर /BCCI

भारत ‘अ’ विरुद्ध ऑस्ट्रेलिया ‘अ’ (India A vs Australia A) यांच्यात सिडनीमध्ये झालेला दुसरी प्रॅक्टीस मॅच ड्रॉ झाली. या ड्रॉ मॅचमधून भारतीय टीमनं पिंक बॉल टेस्टसाठी (Pink Ball Test) चांगली तयारी केली आहे. या तयारीचा फायदा त्यांना परीक्षेत म्हणजेच 17 तारखेपासून सुरु होणा-या पहिल्या टेस्टमध्ये होणार आहे. टीम इंडियासाठी या मॅचमध्ये काय सकारात्मक गोष्टी घडल्या पाहूया

शुभमन गिलचा दम

रोहित शर्माच्या (Rohit Sharma)  अनुपस्थितीमध्ये निर्माण झालेल्या दुसऱ्या ओपनरच्या जागेवर शुभमन गिलनं (Shubman Gill) बळकट दावेदारी सादर केली आहे. गिलचा प्रतिस्पर्धी पृथ्वी शॉ ला पहिल्या इनिंगमध्ये चांगल्या सुरुवातीचा फायदा घेता आला नाही. तर दुसऱ्या इनिंगमध्ये तो झटपट परतला. गिलनं पहिल्या इनिंगमध्ये 43 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 65 रन्स काढत ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर्सना खेळण्याचा दम त्याच्यामध्ये असल्याची चुणूक दाखवली आहे.   

(वाचा – ऑस्ट्रेलियात धोनी श्रेष्ठ की कोहली? : वाचा सविस्तर आकडेवारी )

विहारीचा संयम

टीम इंडियाचा टेस्ट स्पेशालिस्ट बॅट्समन हनुमा विहारीनं (Hanuma Vihari)  दुसऱ्या इनिंगमध्ये नाबाद 104 रन्स काढले. त्यासाठी त्यानं 194 बॉल्सचा सामना केला. विहारीनं ऋषभ पंतसोबत पाचव्या विकेट्ससाठी 147 रन्सची भागिदारी केली. त्याचबरोबर नंतर ऑफ स्पिन बॉलिंगवर कॅरीला देखील आऊट केले. विहारीची बॉलिंग ही त्याची जमेची बाजू आहे. त्याच्या बॉलिंगचा फास्ट बॉलर्स आणि आर. अश्विन यांना विश्रांती देण्यासाठी विराटला उपयोग होऊ शकतो. विहारीची अंतिम 11 मध्ये स्थान मिळवण्यासाठी के. एल. राहुलशी स्पर्धा आहे. राहुलनं यावर्षी सातत्यानं रन्स केले आहेत. त्यामुळे राहुल की विहारी?  हा एक अवघड प्रश्न आता शास्त्री आणि कोहली जोडीपुढे उभा राहिला आहे.

ऋषभ पंतचा झंझावात

ऋषभ पंतनं (Rishabh Pant) प्रॅक्टीस मॅचच्या दुसऱ्या इनिंगमध्ये आक्रमक सेंच्युरी ठोकत अंतिम 11 साठी दावेदारी सादर केली आहे. या प्रॅक्टीस मॅचपूर्वी ऋद्धीमान साहाची टीममधील जागा पक्की होती. प्रॅक्टीस मॅचनंतरही साहाचं नाव पंतपेक्षा आघाडीवर आहे. मात्र पंतचा प्रॅक्टीस मॅचमधली सेंच्युरी पाहून आणि त्याचा मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील खेळाचा इतिहास आठवून टीम मॅनेजमेंट या सीरिजमध्ये पंतला खेळवण्याचा आता गांभीर्यानं विचार करणार आहे.

( वाचा – व्वा पंत! 73 बॉल्समध्ये झळकावली सेंच्युरी, टीकाकारांची तोंडं केली गप्प )

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.

error: