फोटो – ट्विटर / ICC

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात अ‍ॅडलेडमध्ये (Adelaide) झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाची (Team India) दुसरी इनिंग 36 रन्सवरच संपुष्टात आली. टीम इंडियाचा हा निचांक आहे. टीम इंडियाचा यापूर्वीचा टेस्टमधील सर्वात कमी स्कोअर 42 होता. जो भारताने 1974 साली इंग्लंडविरुद्ध (England) लॉर्ड्सवर (Lords) नोंदवला होता. या दोन लज्जास्पद कामगिरीतही काही विलक्षण साम्य आहे.

  1. इंग्लंडमध्ये 1974 साली दौऱ्यावर गेलेल्या अजित वाडेकरच्या (Ajit Wadekar) टीमचा क्रिकेट विश्वात मोठा दबदबा होता. या टीमनं यापूर्वी इंग्लंड, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजमध्ये टेस्ट सीरिज जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती. ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज जिंकण्याचा ऐतिहासिक पराक्रम केल्यानंतर विराट कोहलीच्या (Virat Kohli) टीमचा पहिलाच ऑस्ट्रेलिया दौरा होता. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या टेस्टमध्ये भारतीय टीम तुल्यबळ लढत देईल असाच सर्वांचा अंदाज होता.
  2. लॉर्ड्स आणि अ‍ॅडलेड या दोन्ही टेस्टमध्ये सकाळाच्या एकाच सत्रात टीम इंडियाची इनिंग संपली.
  3. दोन्ही टेस्टमधील तिसऱ्या इनिंगमध्ये भारतानं निचांकी स्कोअरची नोंद केली. लॉर्ड्समध्ये टीम इंडियावर ‘फॉलो ऑन’ची नामुश्की ओढावली होती. अ‍ॅडलेडमध्ये टीम इंडियानं पहिल्यांदा बॅटिंग घेतली. पहिल्या इनिंगमध्ये 52 रन्सची आघाडी घेतली. मात्र त्यानंतर टेस्टच्या तिसऱ्या इनिंगमध्ये लोटांगण घातले.

( वाचा: IND vs AUS : अ‍ॅडलेडमध्ये टीम इंडियाचा ‘काळा शनिवार’! )

4. लॉर्ड्स टेस्टमध्ये शेवटचा बॅट्समन भागवत चंद्रशेखर दुखापतीमुळे बॅटींग करु शकला नाही, तर  अ‍ॅडलेडमध्ये 11 व्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या मोहम्मद शमीला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. त्यामुळे दोन्ही ठिकाणी 9 आऊट झाल्यानंतरच भारताची इनिंग संपुष्टात आली.

5. आणखी एक महत्तवाची समानता म्हणजे या दोन्ही टेस्टमध्ये प्रतिस्पर्धी टीमच्या बॉलरनी एकही अतिरिक्त रन दिला नाही.

6. लॉर्ड्स टेस्टमध्ये ख्रिस ओल्ड याने 5 तर जेफ अरनॉल्ड यांनी 4 विकेट्स घेतल्या. इंग्लंड टीमचा तिसरा फास्ट बॉलर माईक हेंड्रीकला एकही विकेट मिळाली नाही. अ‍ॅडलेडमध्ये जोश हेजलवुडने ( Josh Hazelwood ) पाच तर पॅट कमिन्सने (Pat Cummins) चार विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाचा तिसरा फास्ट बॉलर मिचेल स्टार्कला (Mitchell Starc) एकही विकेट मिळवता आली नाही.

( वाचा : लज्जास्पद पराभवानंतर टीम इंडियाला आणखी एक धक्का, मोहम्मद शमी टेस्ट सीरिजमधून आऊट )

7. इंग्लंडचा तेंव्हाचा दिग्गज स्पिनर डेरेक अंडरवुडला लॉर्ड्स टेस्टच्या त्या इनिंगमध्ये  बॉलिंग करण्याची गरज भासलीच नाही. अ‍ॅडलेडमध्येही ऑस्ट्रेलियाचा भारताविरुद्धचा सर्वात यशस्वी बॉलर नॅथन लायन याला बॉलिंग देण्याची वेळ टीम पेनवर आली नाही.

8. लॉर्ड्स प्रमाणेच अ‍ॅडलेडमध्येही भारताने संपूर्ण इनिंगमध्ये चार फोर लगावले. फक्त लॉर्ड्सवर एकनाथ सोलकर यांनी एक सिक्सर खेचला होता. अ‍ॅडलेडमध्ये एकाही भारतीय बॉलरला सिक्सर मारता आला नाही. विशेष म्हणजे लॉर्ड्स टेस्टच्या निचांकाची बरोबरी करण्यासाठी टीम इंडियाला अ‍ॅडलेडमध्ये फक्त सहा रन्स कमी पडले!

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: