फोटो – ट्विटर

भारतीय क्रिकेट फॅन्सची इच्छा अखेर पूर्ण झालीय. रोहित शर्मा (Rohit Sharma) फिटनेसचा अडथळा पार करुन ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. बंगळुरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये झालेली फिटनेस टेस्ट रोहित पास झालाय. आता तो ऑस्ट्रेलियात रवाना होणार आहे. ऑस्ट्रेलियात 14 दिवस विलिगीकरणात राहिल्यानंतर शेवटच्या दोन टेस्टसाठी तो उपलब्ध असेल.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी (Australia Tour) टीम इंडियाची (Team India) निवड झाल्यापासून रोहित शर्माची सर्वात जास्त चर्चा होत आहे. रोहित शर्मा अनफिट असल्यानं त्याचा टीममध्ये समावेश करण्यात आला नाही, असं बीसीसीआयनं (BCCI) जाहीर केलं होते. त्यामुळे जोरदार चर्चा सुरु झाली. अनफिट रोहित आयपीएलमधील शेवटच्या तीन मॅच खेळल्यानं ती आणखी पेटली. आयपीएल स्पर्धा संपली त्यानंतर भारतीय टीम ऑस्ट्रेलियात दाखल झाली, तरीही ही चर्चा सुरुच होती. आता रोहित फिट झाल्यानंतर ही चर्चा थांबली आहे. या प्रकरणात गेल्या दीड महिन्यांमध्ये काय-काय घडलं आहे पाहूया

18 ऑक्टोबर:  रोहित शर्मा दुखापतग्रस्त

किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध मुंबई इंडियन्स मॅचमध्ये पहिल्या सुपर ओव्हरमध्ये बॅटिंग करताना रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे तो दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये फिल्डिंगला आला नाही.

26 ऑक्टोबर:  ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून रोहित ‘आऊट’

ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या तीन वन-डे, तीन T20 आणि चार टेस्टसाठी टीम इंडियाची निवड. यामधील एकाही टीममध्ये रोहित शर्माला स्थान नाही. रोहितच्या दुखापतीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले. त्यामुळे रोहित शर्मा आयपीएल स्पर्धेतून आऊट झाल्याची चर्चा सुरु झाली.

26 ऑक्टोबर: रोहित शर्माचा नवा व्हिडिओ

बीसीसीआयने टीमची निवड जाहीर केल्यानंतर काही वेळातच मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा नेटमध्ये सराव करत असल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला.

1 नोव्हेंबर:  कोच रवी शास्त्रींचा इशारा!

टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री यांची या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया. रोहित शर्माची दुखापत गंभीर असून तो खेळला तर ती आणखी गंभीर होऊ शकते असा इशारा शास्त्री यांनी दिला. शर्माचे मेडिकल रिपोर्ट पाहिल्याचेही शास्त्री यांनी यावेळी स्पष्ट केले.

3 नोव्हेंबर: बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीचा सल्ला

रोहित शर्मा टीममध्ये लवकर परत यावा यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जाणार असल्याचं बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने सांगितलं. रोहितची दुखापत गंभीर आहे. त्याच्यापुढे बरंच करियर आहे, फक्त आयपीएल नाही, असं सांगून गांगुलीने एक प्रकारे रोहितला आयपीएलमधील उर्वरित मॅच न खेळण्याचा सल्ला दिला.

3 नोव्हेंबर:  रोहितने धुडकावला गांगुलीचा सल्ला

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीचा सल्ला धुडकावून रोहित शर्मा सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध साखळी स्पर्धेतील शेवटची मॅच खेळण्यासाठी उतरला. रोहितच्या दुखापतीबद्दल बीसीसीआय आणि मुंबई इंडियन्समध्ये समन्वय नसल्याचं स्पष्ट.

9 नोव्हेंबर:  रोहितचा टेस्ट टीममध्ये समावेश

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टेस्ट टीममध्ये रोहित शर्माचा समावेश. वन-डे आणि T20 टीममध्ये मात्र स्थान नाही.

11 नोव्हेंबर:  रोहित मुंबईला परतला

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडिया दुबईमधून विशेष विमानाने रवाना. रोहित शर्मा मात्र टीमसोबत न जाता मुंबईत परतला.

19 नोव्हेंबर:  रोहित बंगळुरुत दाखल

रोहित शर्मा पुढील उपचारासाठी बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये दाखल.

21 नोव्हेंबर:   रोहितने मौन सोडले

रोहित शर्माकडून संपूर्ण प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया. दुखापतीबाबत बीसीसीआय आणि मुंबई इंडियन्सशी नियमित संपर्कात आहे. ऑस्ट्रेलियातील टेस्ट सीरिजसाठी तयार होईल असे रोहितचे स्पष्टीकरण

22 नोव्हेंबर:  कोच शास्त्रींचा अल्टीमेटम

रोहित शर्माने येत्या तीन-चार दिवसांत ऑस्ट्रेलियाचे विमान पकडले नाही तर त्याला पहिली टेस्ट खेळणे अशक्य असल्याचे कोच रवी शास्त्री यांनी सांगितले.

26 नोव्हेंबर:  रोहितची पुढील चाचणी 11 डिसेंबरला होणार

रोहित शर्मा आजारी वडिलांना भेटण्यसाठी मुंबईत आला होता. सध्या तो बंगळुरुत फिटनेस ट्रेनिंग घेत आहे. त्याच्या फिटनेसची पुढील चाचणी 11 डिसेंबर रोजी होणार असल्याची बीसीसीआयची माहिती. बीसीसीआयच्या या माहितीमुळे रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया सीरिजमधील पहिल्या दोन टेस्ट खेळणार नसल्याचे स्पष्ट.

11 डिसेंबर: रोहित शर्मा फिटनेस टेस्टमध्ये पास

बंगळुरुतील ‘एनसीए’चे प्रमुख राहुल द्रविड आणि अन्य फिजिओच्या उपस्थितीमध्ये रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली. ही फिटनेस टेस्ट रोहित पास झाला. त्यामुळे रोहितचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.

error: